
बाल विमा
2
Answer link
LIC ची New Children's Money Back Plan ही पॉलिसी सर्वात लोकप्रिय आहे.
या पॉलिसीचा नंबर (UIN: 512N296V01) आहे.
० ते १२ वर्षाच्या मुलांसाठी हे पॉलिसी लागू होऊ शकते.
काही फायदे:
१. पालकाचा मृत्यू झाल्यास कमीत कमी भरलेल्या रकमेच्या १०५% रक्कम मुलाला मिळेल.
२. मूल १८, २० आणि २२ वर्षाचे झाल्यानंतर पॉलिसी चालू असेल तर पॉलिसी रकमेच्या २० % रक्कम मिळेल
३. पॉलिसी मॅच्युरिटी च्या वेळेस पॉलिसी रकमेच्या ४० % रक्कम मिळेल.
आणि बऱ्याचदा बोनस मध्येदेखील काही रक्कम मिळू शकेल.
खाली LIC ची अधिकृत साईट आहे. त्यावर जाऊन तुम्ही ही पॉलिसी घेऊ शकता. जर जास्त गोष्टी माहित नसतील तर जवळच्या एजंटकडून पॉलिसी काढून घेऊ शकता.