Topic icon

वैद्यकीय प्रतीके

2
Caduceus हे एक चिंन्ह आहे जे आपल्याला बऱ्याच हॉस्पिटल मध्ये, ऍम्ब्युलन्स वर, डॉक्टरांच्या गाडीवर दिसते.


हे चिन्ह USA Medical Corp ने सर्वप्रथम मेडिकल क्षेत्रात १९०२ साली वापरले. हे चिन्ह ग्रीक देव Hermes याचे चिन्ह आहे. हा देव खरे तर व्यापार, देवाणघेवाणीसाठी ओळखला जातो. परंतु USA आर्मीने हा सिम्बॉल वापरायला सुरवात केल्यापासून सगळीकडेच के चिन्ह वैद्यकीय क्षेत्राशी जोडण्यात येत आहे.

तसेच सुमारे ४००० वर्षांपूर्वी भारत आणि सिरिया देशांच्या इतिहासात वैद्यकीय उपचारासाठी हा सिम्बॉल वापरण्यात येत होता. मुख्यतः त्या काळात Dracunculiasis ह्या आजारादरम्यान हे चिन्ह जास्त प्रसिद्ध होते असे काही पुरावे आहेत. Dracunculiasis ह्या आजारात शरीरात मोठ्या अळी होत असे म्हणुन ह्या काठीभोवती २ साप आहेत असेही म्हणतात.

हे चिन्ह Rod of Asclepius सारखेच दिसते. Rod of Asclepius हे खरे ग्रीक पुराणानुसार वैद्यकीय आणि औषधाच्या संबंधित चिन्ह आहे, त्यामुळे बऱ्याच टीकाकारांनी Caduceus च्या वैद्यकीय क्षेत्रातील वापरावर प्रश्नचिन्हही उभे केले होते.

Rod of Asclepius खालील प्रमाणे दिसते:

संदर्भ
उत्तर लिहिले · 9/12/2016
कर्म · 283280