Topic icon

मोबाईल ॲप्स

1
मोबाईलचे व्यसन 

पूर्वी ट्रेनमध्ये माणसं पुस्तकात, वर्तमानपत्रात बुडालेली असायची. आता व्हॉट्सअॅपमध्ये गुंगलेली असतात. इयरफोन्स लावल्यावर तर आपण आसपासच्या जगाशी संबंध नसल्यासारखे वावरतो. मोबाइलने आपल्याला लांबच्या माणसांशीही जोडलं हे खरं आहे पण, आसपासच्या माणसांपासून तोडलंय हे नाकारता येणार नाही. या स्मार्टफोनच्या लाटेत वाहवत जायचं की, स्मार्टपणे त्याचा वापर करायचा हे आपलं आपणच ठरवायचंय.


मध्यंतरी कोणीतरी एक ‘एसएमएस’ पाठवला होता. तो वाचून हसायला तर आलंच; पण हसता हसता अंतर्मुखही झालो. पूर्वी एकमेकांना भेटल्यावर लोक विचारत, ‘कसे आहात?’ आजकाल विचारतात, ‘तुमच्याकडे छोट्या पिनचा चार्जर आहे?’

तुमच्यापैकीही बऱ्याच जणांनी हा मेसेज वाचला असेल. खरंच आपण तंत्रज्ञानाच्या एवढ्या आहारी गेलो आहोत का? हा प्रश्न मी स्वतःलाच विचारला आणि उत्तर ‘हो,’ असं आलं.

कोणतंही हॉटेल असो वा कॉफी शॉप! जिथं लोक एकत्र येतात, असं कोणतंही ठिकाण असलं तरी आपण प्रत्येकजण लोकांच्या घोळक्यात एकएकटे असतो. कारण आपण आपल्या फोनसोबत असतो.


तरुणाईमध्ये मोबाइल फोन हा तर ‘स्टेटस सिम्बॉल’ आहे. कोणाचा मोबाइल फोन किती मोठा, किती महाग, ‘अॅप’चं वैविध्य, यावर तुमचं, तुमच्या गटातलं स्थान ठरत असेल, तर थोडं थांबून विचार करायची गरज आहे.


पुनीत, समीर, अॅनी आणि जॉशुआ हे अगदी शाळेपासूनचे मित्र. यांचे आई-वडील पण एकमेकांच्या चांगल्या ‌परिचयाचे असल्यामुळं एकमेकांच्या घरी कधीही आणि कितीही वेळ जाऊन बसण्याबद्दल कोणाचाच आक्षेप नसतो. शाळेत असताना ही मुलं खूप अॅक्टिव्ह होती; पण कॉलेजात गेल्यापासून मात्र ही मुलं सारखी आपापल्या घरात बसून आपल्या मोबाइल फोनवर काहीतरी करत असतात. त्यांचे आई-वडीलही त्यांच्या या सवयीला कंटाळले होते. त्यांच्या या सवयीतून त्यांना बाहेर काढणं गरजेचं होतं. यासाठी चौघांना एकत्र बोलावून त्यांची भेट घेतली. सुरुवातीला या भेटीचं प्रयोजन त्यांना कळलंच नाही; कारण त्यांच्या मते ते मेसेजेसद्वारे ते सततच ‘कनेक्टेड’ असतात; पण ‘व्हर्च्युअली कनेक्टेड’ आणि खरंखुरं कनेक्शन यातला फरक समजावून देण्याची हीच वेळ होती. तरुण वर्गाची एक फार भारी गोष्ट असते. नीट पटवून दिलं, तर कोणताही बदल ते पटकन स्वीकारतात. ही चौघंही त्याला अपवाद नव्हती. बरेच दिवसांत एकमेकांबरोबर ‘क्वालिटी टाइम’ व्यतीत न केल्याचं त्यांच्या आईवडिलांनी निदर्शनास आणून दिलं आणि दुसऱ्याच दिवशीचं एक छोटसं आउटिंग त्यांच्यासाठी योजलं. अट फक्त एवढीच होती, की बाहेर जाताना आपल्या पालकांना फोन करण्याव्यतिरिक्त कोणीही मोबाइल फोन वापरणार नाही. या मोबाइलविनाच्या सहलीने त्यांची त्यांनाच चूक कळून आली. मोबाइलच्या अडथळ्याशिवाय आज कितीतरी ‌महिन्यांनी त्यांनी एकमेकांशी भरभरून संवाद साधला होता. इतक्या दिवसांमध्ये आपल्या आजूबाजूला चाललेल्यापैकी ८० टक्के गोष्टींचा आपल्याला पत्ताही नाहीये, हे त्यांना कळलं. शेवटी ‘एसएमएस’ किंवा ‘व्हॉट्स अॅप’ प्रत्यक्ष भेटीची जागा कशी घेऊ शकणार? मोबाइल फोनमुळे आपण लांब असलेल्यांशी ‘कनेक्टेड’ असतो; पण शेजारी बसलेल्यापासून खूप लांब तर जात नाही ना, हे पाहण्याची हीच ती वेळ.


याविषयी आणखीही काही इंटरेस्टिंग माहिती आहे, ती Nomophobia बद्दल (No mobile phobia अशी या शब्दाची फोड आहे.)


Hydrophobia (पाण्याची भीती), Acrophobia (उंचीची भिती), Claustrophobia (बंद जागांची भीती) याप्रमाणेच Nomophobia ही म्हणे मोबाइल फोनपासून दूर जाण्याची भीती होय.


या Phobia बद्दल मानसशास्त्रीय माहिती अजून पडताळून पाहायची आहे; पण या Nomophobia ची जी लक्षणं सांगितली, ती आपल्याला स्वतःत आढळतात का, हे पाहायला हवं. आढळल्यास आपण मोबाइल फोनचं व्यसन थोडं कमी करायचं, बस्स!


मोबाईल खिशात नसतानाही ‘व्हायब्रेट’ झाल्याचा भास होणं.


रात्री झोपेतून जाग आल्यावर उशाशी ठेवलेला मोबाइल फोन चाचपून पाहणं.


मोबाइल हाताला न लागल्यास, पटकन उठून तो शोधणं.


मोबाइल आपल्या दृष्टीक्षेपापलिकडे जाऊ न देणं.


मोबाइलचा रिंगर आणि मेसेज अलर्ट वाजला नसला, तरीही दर काही मिनिटांनी मोबाइल पाहणं.


अगदी शास्त्रीय किंवा वैद्यकीय बाजूंनी खोलात शिरलं नाही, तरी ‘अति सर्वत्र वर्जयेत’ हे जाणून आपल्या मोबाइल फोनशी संबंधित सवयींमध्ये बदल घडवण्यात तोटा नक्कीच नाही.


मोबाइल फोन ही एक क्रांती आहे, ज्यामुळे आपली खूप मोठी सोय झाली आहे; पण या सोयीचं गरजेत आणि गरजेचं व्यसनात रुपांतर होऊ न देण्यातच हुशारी आहे. मग देऊया का थोडं लक्ष आपल्याही सवयींकडे? विनाअडथळा जेवायला काय हरकत आहे? मित्रांबरोबर कॉफी पिताना गप्पा आणि कॉफीचाच आस्वाद घेऊ या. त्यात मोबाइलची लुडबुड हवी कशाला? घरच्यांना भेटल्यावर मोबाइल थोडे बाजूला ठेऊ ना. एकमेकांच्या फोन्सविषयी माहिती घेण्यापेक्षा आयुष्याविषयी जाणून घेणं जास्त महत्त्वाचं आहे की नाही!

उत्तर लिहिले · 20/2/2024
कर्म · 53710
0

मोबाईलमध्ये ॲप हाईड (hidden) करण्याचे काही सोपे मार्ग:

1. ॲप ड्रॉवर (App Drawer) वापरून:
  • काही स्मार्टफोनमध्ये ॲप ड्रॉवरमध्ये ॲप्स हाईड करण्याची सुविधा असते.
  • ॲप ड्रॉवर उघडा आणि सेटिंग्जमध्ये जा.
  • ‘Hide Apps’ किंवा तत्सम पर्याय शोधा.
  • तुम्हाला जे ॲप हाईड करायचे आहे, ते सिलेक्ट करा.
2. थर्ड-पार्टी लॉन्चर (Third-party Launcher):
  • प्ले स्टोअरवर अनेक थर्ड-पार्टी लॉन्चर उपलब्ध आहेत, जे ॲप्स हाईड करण्याची सुविधा देतात.
  • उदाहरणार्थ, Nova Launcher, Apex Launcher.
  • लाँचर इंस्टॉल करा आणि त्याच्या सेटिंग्जमध्ये ॲप हाईड करण्याचा पर्याय शोधा.
3. सिक्युअर फोल्डर (Secure Folder):
  • Samsung च्या फोनमध्ये ‘Secure Folder’ नावाचे फीचर असते.
  • तुम्ही हे फीचर वापरून ॲप्स आणि डेटा सुरक्षित ठेवू शकता.
  • सिक्युअर फोल्डरमध्ये ॲप्स कॉपी करा आणि होम स्क्रीनवरून ॲप डिलीट करा.
4. ॲप हाईडिंग ॲप्स (App Hiding Apps):
  • प्ले स्टोअरवर ॲप हाईड करण्यासाठी अनेक ॲप्स उपलब्ध आहेत.
  • Hide Apps, App Hider यांसारखे ॲप्स वापरून तुम्ही ॲप्स हाईड करू शकता.
  • ॲप इंस्टॉल करा आणि सूचनांचे पालन करा.

टीप: ॲप हाईड केल्याने ते पूर्णपणे अनइंस्टॉल होत नाही, त्यामुळे ॲपला एक्सेस करण्यासाठी तुम्हाला ते अनहाइड (unhide) करावे लागेल.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1440
0
मोबाईल ॲप संबंधी काही बहुपर्यायी प्रश्न:

1. मोबाईल ॲप म्हणजे काय?
(अ) मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम (Mobile Operating System)
(ब) मोबाईल ॲप्लिकेशन (Mobile Application)
(क) मोबाईल डिव्हाईस (Mobile Device)
(ड) यापैकी काहीही नाही
उत्तर: (ब) मोबाईल ॲप्लिकेशन

2. ॲप डेव्हलपमेंटसाठी (App development) कोणती भाषा वापरली जाते?
(अ) जावा (Java)
(ब) स्विफ्ट (Swift)
(क) कोटलिन (Kotlin)
(ड) वरील सर्व
उत्तर: (ड) वरील सर्व

3. ॲप स्टोअर (App store) कोणत्या कंपनीचे आहे?
(अ) गुगल (Google)
(ब) ॲपल (Apple)
(क) मायक्रोसॉफ्ट (Microsoft)
(ड) सॅमसंग (Samsung)
उत्तर: (ब) ॲपल (Apple)

4. अँड्रॉइड (Android) कोणत्या कंपनीने विकसित केले?
(अ) गुगल (Google)
(ब) ॲपल (Apple)
(क) मायक्रोसॉफ्ट (Microsoft)
(ड) सॅमसंग (Samsung)
उत्तर: (अ) गुगल (Google)

5. ॲप अपडेट (App update) करणे का महत्त्वाचे आहे?
(अ) नवीन फीचर्स मिळवण्यासाठी
(ब) सुरक्षा सुधारण्यासाठी
(क) बग्स (bugs) फिक्स करण्यासाठी
(ड) वरील सर्व
उत्तर: (ड) वरील सर्व

6. खालीलपैकी कोणते ॲप क्लाउड स्टोरेज (Cloud storage) सुविधा पुरवते?
(अ) गुगल ड्राइव्ह (Google Drive)
(ब) ड्रॉपबॉक्स (Dropbox)
(क) वनड्राईव्ह (OneDrive)
(ड) वरील सर्व
उत्तर: (ड) वरील सर्व

7. मोबाईल ॲप डेव्हलपमेंट किट (Mobile App Development Kit) म्हणजे काय?
(अ) ॲप बनवण्यासाठी लागणारी साधने
(ब) ॲप स्टोअरमध्ये ॲप अपलोड करण्याची प्रक्रिया
(क) ॲप डिझाइन (App design) करण्याची प्रक्रिया
(ड) यापैकी काहीही नाही
उत्तर: (अ) ॲप बनवण्यासाठी लागणारी साधने

8. ॲप permission म्हणजे काय?
(अ) ॲपला डिव्हाईसच्या (Device) काही भागांमध्ये प्रवेश करण्याची परवानगी
(ब) ॲप डाउनलोड (App download) करण्याची परवानगी
(क) ॲप वापरण्याची (App use) परवानगी
(ड) यापैकी काहीही नाही
उत्तर: (अ) ॲपला डिव्हाईसच्या काही भागांमध्ये प्रवेश करण्याची परवानगी

हे काही प्रश्न आहेत, ज्यामुळे तुम्हाला मोबाईल ॲप्सबद्दल (Mobile apps) माहिती मिळेल.
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1440
3



मोबाईलवरील खासगी अॅप गायब करायचेय...असे करा

आपल्या मोबाईलमध्ये अशा काही गोपनीय फोटो, फाईल्स असतात ज्या दुसऱ्यांना दिसल्यास गजहब उडू शकतो. त्या लपवण्यासाठी जशी अॅप असतात तशीच गोपनीय अॅपही लपविण्यासाठी आहेत.

मोबाईलवरील खासगी अॅप गायब करायचेय...असे करा
आपल्या मोबाईलमध्ये अशा काही गोपनीय फोटो, फाईल्स असतात ज्या दुसऱ्यांना दिसल्यास गजहब उडू शकतो. त्या लपवण्यासाठी जशी अॅप असतात तशीच गोपनीय अॅपही लपविण्यासाठी आहेत. अॅपचा अॅक्सेस एखाद्याला मिळाल्यास त्यामुळे तुमची गोपनीय माहिती उघड होऊ शकते. यामुळे अशी अॅप लपवूही शकणार आहात. 

यासाठी प्लेस्टोअरवरून अॅपेक्स लाँचर फोनमध्ये डाऊनलोड करावा लागणार आहे. या अॅपची साईज 10 एमबीपेक्षा कमी असेल. आपल्या फोनवर आधीच मोबाईल कंपनीचा लाँचर असतो. अॅपेक्स लाँचरवर क्लिक केल्यानंतर आधीचा लाँचर बदलेल. यानंतर अॅपेक्स सेटिंगमध्ये जाऊन सहाव्या नंबरवर हिडन अॅपचा पर्याय दिसेल. या वर क्लिक केल्यानंतर अॅड असा ऑप्शन येईल. त्यावर गेल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल असलेल्या अॅपची यादी येईल. यानंतर तुम्हाला हवी असलेली अॅप निवडून ओके बटनवर क्लिक करावे. 


लपवलेली अॅप परत पहायची असतील तर पुन्हा अॅपेक्स सेटींगमध्ये जाऊन अनहाईड अॅप असा पर्याय क्लिक करावा व बाहेर पडावे.




उत्तर लिहिले · 17/4/2022
कर्म · 121765
3




​डिलीट झालेले मोबाइलमधील फोन नंबर व एसएमएस परत मिळवा


चुकून आपल्याकडून मोबाईल मधील मेसेजेस आणि नंबर डिलीट होतात. मग अशा वेळेस आपल्यासमोर पुन्हा नंबर शोधून टाईप करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. पण इतके करुन सुध्दा काही महत्वाचे नंबर आणि मेसेज आपणार परत मिळत नाहीत.

​डिलीट झालेले मोबाइलमधील फोन नंबर व एसएमएस परत मिळवा

चुकून आपल्याकडून मोबाईल मधील मेसेजेस आणि नंबर डिलीट होतात. मग अशा वेळेस आपल्यासमोर पुन्हा नंबर शोधून टाईप करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. पण इतके करुन सुध्दा काही महत्वाचे नंबर आणि मेसेज आपणार परत मिळत नाहीत. आता यावर उपाय आहे आणि आता आपण डिलीट केलेले मेसेज आणि नंबर परत मिळवू शकतो.यासाठी Pro Data Doctor SIM याचा वापर करा. *Card files rescure software डाऊनलोड करावे.**PRO DATA DOCTOR .COM*या सॉफ्टवेअर मध्ये आताच डिलीट केलेले टेक्स्ट मेसेज आणि मोबाईल नंबर्स परत मिळवून देण्याची क्षमता आहे. यात मिनिटाच्या आत डिलीट केलेले मेसेज आणि फोन बुक कॉन्टॅक्ट परत मिळवता येतात. यासाठी एक USB SIM card reader लागते, तुमच्या मोबाईलमधील डिलीट केलेले नंबर आणि मेसेज परत मिळविण्यासाठी या सॉफ्टवेअर मध्ये सीम कार्ड मधील माहिती (कॉन्टॅक्ट नंबर, डिलीट केलेले टेक्स्ट मॅसेज आणि त्यांचा पाठविण्याचा आणि येणाच्या वेळेनुसार) वाचता येते.वैशिष्टे: यात डिलीट केलेले सर्व मेसेज (Inbox unread, outbox send, outbox later send Afd¯f deleted messages).यात सर्व कॉन्टॅक्ट नावासोबतच सर्व मोबाईल नंबर वाचता येतात. सीम कार्ड मधील सर्व माहिती एका मिनिटात परत मिळवता येते. कोणत्याही नेटवर्कच्या सीम कार्डसाठी हे वापरता येते. कोणत्याही देशातील जीएसएम सीम कार्डला हे सपोर्ट करते. सीम कार्ड वरील प्रिंट केलेला ICC Identification number आणि सर्व्हिस प्रोव्हायडरचे नांव सुध्दा वाचू शकतो. हे सहज इन्स्टॉल होते आणि वापरण्यास सोपे आहे.



उत्तर लिहिले · 5/11/2021
कर्म · 121765
0
या प्रश्नाचे उत्तर सविस्तर दिले आहे.
उत्तर लिहिले · 3/10/2021
कर्म · 121765
2
मोबाईल फोटो गॅलरीतून फोटो घेण्यासाठी आपल्या उत्तर ॲप वर आपण उत्तर लिहितो तेव्हा प्रश्नाच्या खाली लिंक आहेत त्या लिंक मध्ये शेवटी ही लिंक आहे. इथे टच करावे. फोटो गॅलरी येते, मग जो फोटो टाकायचा आहे तिथे फोटोला टच केल्यावर फोटो अपलोड होतो.


उत्तर लिहिले · 2/10/2021
कर्म · 121765