Topic icon

पुनर्वापर

0
महाराष्ट्रामध्ये महिन्याला ५० ते १०० किलो वापरलेले खाद्य तेल विकत घेणाऱ्या कंपन्या मिळणे थोडे कठीण आहे. कारण या कंपन्या मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करतात. तरीही, काही पर्याय खालीलप्रमाणे आहेत:
  • रिसायकलिंग कंपन्या: काही रिसायकलिंग कंपन्या वापरलेल्या खाद्य तेलाचा वापर करून बायोडि Diesel बनवतात. त्यांच्याशी संपर्क साधल्यास तुम्हाला योग्य माहिती मिळू शकेल.
  • लहान स्तरावरील उत्पादक: साबण बनवणारे किंवा तत्सम लहान स्तरावरील उत्पादक तुमच्याकडून तेल खरेदी करू शकतात.
  • तेल उत्पादक कंपन्या: मोठ्या तेल उत्पादक कंपन्या रिसायकलिंगसाठी तेल घेत असतील, त्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधा.

तुम्ही Google Maps आणि Justdial सारख्या वेबसाइट्सवर 'used cooking oil buyers in Maharashtra' असे शोधू शकता.

उत्तर लिहिले · 19/4/2025
कर्म · 980
0

तुमच्या प्रश्नाचा अर्थ स्पष्ट होत नाही. "घरकोंबडा असलेला पुरुष टाकाऊ वस्तू तरी परित सांभाळणे या खेड्यात?" या वाक्याचा रोख नेमका काय आहे, हे समजणे कठीण आहे. कृपया तुमचा प्रश्न अधिक स्पष्टपणे मांडा जेणेकरून मी तुम्हाला योग्य माहिती देऊ शकेन.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980
0
पर्यावरणपूरक दृष्टिकोन म्हणून 3R खालील प्रमाणे:

1.Reduce (कमी करा): वस्तूंचा वापर कमी करणे, गरजेपुरतेच खरेदी करणे आणि अतिवापर टाळणे.

2. Reuse (पुनर्वापर करा): शक्य असेल तेव्हा वस्तू पुन्हा वापरणे, त्यामुळे नवीन वस्तू बनवण्यासाठी लागणारी ऊर्जा आणि नैसर्गिक संसाधने वाचतात.

3. Recycle (पुनर्चक्रण करा): वस्तूंचे विघटन करून त्यापासून नवीन वस्तू तयार करणे, ज्यामुळे कचरा कमी होतो आणि नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण होते.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 980
2



 |  
कपाटातील जुन्या कपड्यांचा असाही करता येऊ शकतो वापर
 प्रत्येक महिलेच्या कपाटात इतके कपडे असतात की, ते काढून टाकायचा विचार केला तरी मन ते कपडे फेकून द्यायला तयार होत नाही. काही कपडे बोहारी घेतात. त्या बदल्यात एखादं भांड, बादली,टब अशा काही वस्तू तुम्हाला परत देतो. त्यात साड्या, पँट, शर्ट अशा काही कपड्यांचा समावेश असतो. लहान मुलांचे कपडे, टिशर्ट वगैरे अशा वस्तू सहसा कोणी घेत नाही (म्हणजे तुम्ही गरीबांना देता, पण हल्ली त्यांनाही फार गरज नसते.)अशा कपड्यांचा उपयोग तुम्ही वेगळ्या पद्धतीने करु शकता. कदाचित तुम्ही या आधी याचा असा वापर कधीच करुन पाहिला नसेल.


होजिअरीपासून बनवता येतील या वस्तू
सिथेंटिक कपड्यांचा करता येईल हा उपयोग
 कॉटन मटेरिअलचे उपयोगच उपयोग
जुन्या साड्यांपासून बनवा असे मस्त ड्रेस की तुम्हालाही विश्वास बसणार नाही

होजिअरीपासून बनवता येतील या वस्तू
कपाटात टिशर्ट म्हणजेच होजिअरी मटेरिअलच्या अनेक कपडे असतात. त्यांचे बरेच उपयोग आतापर्यंत तुम्ही केले असतील.म्हणजे होजिअरी टिशर्टचा पायपुसण हा वापर अगदी सगळ्याच घरात सर्रास केला जातो. जुना टिशर्ट घेतला की, तो टाकला बाथरुम बाहेर… हो ना.. पण ‘कुछ अलग सोचो यार’ त्या प्लेन टिशर्टपासून तुम्हाला एखादे फॅन्सी पायपुसणे बनवता येऊ शकते. जे तुमच्या घराची शोभा देखील वाढवू शकते. आता या टिशर्टपासून आपल्याला काय काय बनवता येईल ते देखील पाहुयात

पायपुसण

  आता टिशर्ट असाच बाथरुम किंवा वॉशरुम बाहेर टाकण्यापेक्षा थोडा काहीतरी नवा विचार करा ना… टिशर्टचं पायपुसण यात काय नवी असे तुम्हाला वाटत असेल तर आहे ना. तुमच्याकडे जर खूप टिशर्ट असतील तर तुम्ही हे मल्टीकलर आणि सुंदर डीझाईन्सच पायपुसण बनवूच शकता. असे डोअरमॅट हल्ली अनेक ठिकाणी रेडिमेडसुद्धा मिळतात किंवा तुमचे जुने टिशर्ट घेऊन असे डोअरमॅट बनवून देणारेही अनेक जण सध्या आहेत. 

कसे बनवाल पायपुसण:

तुम्हाला जे टिशर्ट फाडायचे असतील. त्यांचे 4 ते 5 इंचाचे कपडे लांब लांब तुकडे करुन घ्या. तुम्हाला वेणी घालणे माहीतच असेल असे समजून तुम्हाला आता सगळे लांब लांब तुकडे जोडून घ्यायचे आहेत. तुम्हाला जितक्या मोठ्या आकाराचे पायपुसणे हवे असतील तितके तुकडे तुम्हाला जोडावे लागतील. तीन तुकड्यांच्या सुरुवातीला एक टाका घालून तुम्हाला लांबसडक वेणी बांधायला घ्यायची आहे.  वेणी घालून झाल्यानंतर तुम्हाला वेणीचे एक टोक घेऊन गोलाकार आकारात गुंडाळायला घ्यायचे आहे. तुम्हाला पाय पुसण्याचा आकार किती हवा आहे तितके तुम्हाला गुंडाळायचे आहे. तुम्हाला तुमचे क्रिएटिव्ह पायपुसणे तयार झालेले दिसले. जर तुमचे टि-शर्ट कलर फुल असतील तर ते पायपुसणे अधिक सुंदर दिसेल.

 हेअरबँड


पायपुसणं बनवून झाल्यानंतर काही पट्टया शिल्लक असतील. तर त्याचे हेअरबँड चांगले दिसू शकतात. बाजारात मिळणारे हेअर बँड तुम्हाला कानापाठी लागतात. पण टिशर्ट पासून बनवलेले हेअरबँड अजिबात लागत नाहीत. ते दिसायलाही चांगले दिसतात.

कसे बनवाल हेअरबँड:

टिशर्टचा लांब तुकडा कापून तुमच्या डोक्याचे माप घेऊन त्याला खाली गाठ किंवा धाव दोऱ्याने शिलाई मारुन घ्या. झाल तुमचा हेअर बँड तयार. शिवाय तुम्ही बारीक बारीक पट्टा काढून त्याची वेणी बांधूनही हेअरबँड तयार करु शकता.

मुंबईत आलात आणि इथे नाही गेलात तर तुमच्या मुबंई दौऱ्याला नाही अर्थ

 क्लिपहोल्डर

घरात ठिकठिकाणी दिसणार हेअर क्लिप तुम्हाला एकत्र ठेवायचे असतील. तर त्यासाठी घरच्या घरी, वॉशेबल, टिशर्टपासून बनवता येणारे क्लिपहोल्डर बनवा.

कसे बनवाल क्लिप होल्डर:

टिशर्टचे साधारण 4 ते 5 इंचाचे लांब तुकडे काढून घ्या. तुकडे थोडे ताणून घ्या. त्याची सैलसर वेणी घालून घ्या. अगदी आपण केसांची वेणी घालतो.तशी वेणी घाला.  बरं वेणीच्या वरच्या बाजूला टिशर्टपासूनच एक होल्डर करुन घ्या. हे होल्डर तुम्ही खिडक्यांना पडद्याच्या रॉडवर अडकवू शकता आणि त्याला तुमचे सगळे क्लिप लावू शकता.

क्रोकरी क्लिनर 


बनियन, टिशर्टचा कपडा इतका नरम आणि मुलायम असतो की, तुमच्या नाजूक वस्तू साफ करण्याचे काम तो करु शकतो. जर तुमच्या टिशर्ट किंवा बनियनची अगदीच दुरवस्था झाली असेल. तर त्याचे साधारण चौकोनी तुकडे कापून तुम्ही त्यांचा वापर क्रोकरी क्लिनर म्हणून करु शकता. या शिवाय घरी असलेल्या काचेच्या इतर वस्तू पुसण्यासाठी, टेबल टॉप पुसण्यासाठी तुम्ही याचा वापर करु शकता.

ट्रेंडी बॅग


प्लास्टिक बंदी झाल्यापासून अनेक जण कापडी बॅगा वापरायला लागले आहेत. जर तुम्हाला मजबूत आणि हटके बॅग हवी असेल तर तुम्ही जुन्या टिशर्टपासून बॅग बनवू शकता. आता बॅग बनवण्यासाठी अशा टिशर्टची निवड करा. जे टिशर्ट बऱ्यापैकी चांगल्या अवस्थेत असतील. टिशर्ट जर प्रिंटेट असतील तर तुमची बॅग जास्त कलरफुल आणि चांगली दिसू शकेल.

कशी बनवाल बॅग:

तुम्हाला ज्या आकाराची बॅग बनवायची आहे. त्या आकाराचा टिशर्ट तुम्ही घ्या. टिशर्टचा खालील भाग शिवून घ्या. आणि बाह्या कापून टाका… तुमची बॅग तयार… तुम्हाला तुमचे क्रिएटिव्ह डोकं लावूनही बॅगसच्या वेगवेगळ्या डीझाईन्स करता येऊ शकतात.

 उशीचे कव्हर

जर तुम्ही तुमच्या उशीला थेट उशीचे कव्हर घालत असाल तर आतापासून तसे करु नका. कारण उशीला थेट कव्हर घालण्यामुळे उशीवर थेट डाग पडण्याचू शक्यता जास्त असते. तुम्ही तुमची उशी नीट पाहा त्याला घामाचे, तेलाचे डाग असतात. आता हे डाग तुम्हाला कमी करायचे असतील. तर मुख्य कव्हरच्या आत आणखी एक  कव्हर घालणे कधीही चांगले. जुन्या टिशर्टचा उपयोग याच कव्हरसाठी तुम्ही करु शकता.टिशर्टचा गळ्याचा आणि बाहयांचा भाग कापून उरलेला आयताकृती तुकडा तुम्ही तुमच्या उशीभोवती शिवू शकता. त्यावर उशीचे कव्हर चढवू शकता.

 होजिअरी मुलायम असल्यामुळे तुम्हाला तुमच्या उशीचा स्पर्श ही मुलायम लागेल. साधारण दोन महिने सलग तुम्ही हे उशीचे कव्हर वापरले तर चालेल. पण तुम्ही तेलकट केस घेऊन उशीवर झोपत असाल तर तुम्ही होजिअरी मटेरिअलच्या उशीच्या कव्हरना झीप लावू शकता. शिवाय तुम्ही क्रिएटिव्ह असाल तर तुम्ही थेट उशीचे कव्हरही अशा टिशर्टपासून बनवू शकता.

पिरेड्समध्ये फ्लो सुरळीत करण्यासाठी करा हे घरगुती उपाय

सिथेंटिक कपड्यांचा करता येईल हा उपयो

आता हे झाले होजिअरी मटेरिअल संदर्भात… पण सिंथेटिक मटेरिअलचे करायचे काय.? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर  त्याचाही उपयोग तुम्हाला करता येऊ शकतो.

*हल्ली सगळीकडे बेड कव्हर नावाचा प्रकार मिळतो. तो तसा महागही असतो. पावसाळ्यात बाहेरुन आल्यानंतर चादर भिजण्याची शक्यता जास्त असते अशावेळी तुम्ही ओढणी किंवा सिथेंटिक मटेरिएल एकत्र करुन त्याचे बेडकव्हर तयार करु शकता. त्यामुळे बेड भिजण्याची शक्यता थोडी कमी असते. शिवाय हा कपडा पाणी शोषून घेतो आणि लवकर वाळतो.

*जर तुमच्याकडे अशा मटेरिअलच्या साड्या असतील त्याचे उत्तम पडदे बनवता येऊ शकता. पावसाचे चार महिने तुम्ही तुमच्या घरांना या मटेरिअलचे पडदे शिवून लावू शकतात. कारण ते वाळायला अगदी सोपे असतात.

 कॉटन मटेरिअलचे उपयोगच उपयोग
घरात असलेल्या कॉटन कपड्यांचे तर उपयोगच उपयोग असतात. घरी आजी असेल तर तिने जुन्या कॉटनच्या साड्यांपासून गोधड्या बनवलेल्या तुम्ही पाहिल्यात असतील. मग काय अगदी सोपे आहे की, कॉटन मटेरिअलपासून तुम्ही अशाच प्रकार गोधड्या बनवू शकता.


या शिवाय कॉटनच्या बॅग्स, रुमाल, टॉवेल अशा वस्तू देखील तुम्ही यापासून बनवू शकता.

 


 
उत्तर लिहिले · 3/8/2021
कर्म · 121765
0
क्षमस्व, मला ते समजत नाही.
उत्तर लिहिले · 30/7/2021
कर्म · 0
0
नवीन स्टार्टअपसाठी जुन्या किंवा नव्या रिकाम्या drinking bottles (पाण्याच्या बाटल्या) कुठे आणि काय दरात मिळतील याची माहिती खालीलप्रमाणे:

जुन्या बाटल्या (Second hand bottles):

  • स्थानिक भंगारवाला (Local scrap dealer): तुमच्या परिसरातील भंगार दुकानांमध्ये तुम्हाला जुन्या बाटल्या मिळतील. तिथे तुम्हाला बाटल्या किलोच्या भावाने मिळतील.
  • OLX किंवा Quikr: या वेबसाईटवर तुम्हाला जुन्या बाटल्या विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या जाहिराती मिळू शकतात.

नव्या बाटल्या (New bottles):

  • प्लास्टिक उत्पादन कंपन्या: अनेक प्लास्टिक उत्पादन कंपन्या drinking bottles बनवतात. त्यांच्याकडून तुम्हाला मोठ्या प्रमाणात (Bulk quantity) बाटल्या खरेदी करता येतील.
  • ऑनलाईन स्टोअर्स: Indiamart, Amazon, Flipkart यांसारख्या वेबसाईटवर तुम्हाला विविध प्रकारच्या drinking bottles मिळतील.

दर (Rate):

  • जुन्या बाटल्या: साधारणतः रु 5 ते रु 10 प्रति किलो.
  • नव्या बाटल्या: बाटलीच्या प्रकारानुसार आणि आकारानुसार दर बदलू शकतात.

टीप:

  • बाटल्या खरेदी करताना त्या स्वच्छ आहेत की नाही, याची खात्री करा.
  • तुम्ही किती बाटल्या खरेदी करणार आहात, यावर दर अवलंबून असेल.

तुम्हाला तुमच्या स्टार्टअपसाठी योग्य बाटल्या मिळतील, अशी माझी अपेक्षा आहे.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 980
6
  हॉटेलमध्ये एकदा अर्धवट वापरलेल्या साबणांचं नंतर काय होतं?     ⭕*_

  .         *_जगातल्या मोठ-मोठ्या हॉटेल्समध्ये लोकांना वापरण्यासाठी नवीन साबण, शॅम्पू, मॉइश्चरायजर, टूथपेस्ट आणि अशा अनेक वस्तू दिल्या जातात. या मोठ्या हॉटेल्समधील शॅम्पू आणि साबण दररोज बदलले जातात. पण कधी विचार केलाय का की, हॉटेलमध्ये जे साबण, शॅम्पू वापरले जातात किंवा अर्धे वापरले जातात त्यांचं काय होतं?_*

*सामान्यपणे याचं उत्तर हे साबण किंवा शॅम्पू फेकले जात असतील असं मिळू शकतं. तसेच ज्या वस्तू वापरल्याच नाहीयेत त्या दुसऱ्या ग्राहकांना दिल्या जात असतील. ऐकायला हे खरंही वाटतं. पण हे खरं नाहीये.हे तर नक्की आहे की, लाखोंच्या संख्येने असलेल्या हॉटेल्सच्या रुम्समधून रोज अशा वस्तू निघत असतील. ९ वर्षांआधी पर्यंत जास्तीत जास्त हॉटेलवाले या वस्तू कचऱ्यात फेकत होते. म्हणजे दिवसाला हजारो टन कचरा पर्यावरणाचं नुकसान करत होता. यादरम्यान वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा एका रिपोर्ट आला. यात सांगण्यात आलं की, हॉटेलच्या रुम्समधून साबण, शम्पू आणि असेच दररोज वाया जाणारे प्रॉडक्टमुळे एकीकडे कचऱ्यांचा ढिग वाढतोय. तर याचा गरीबांच्या स्वच्छतेची समस्या दूर केली जाऊ शकते.आपण वाचत आहात ⸾⸾मा ⸾⸾हि ⸾⸾ती ⸾⸾ ° ⸾⸾से ⸾⸾वा ⸾ ⸾° ग्रू ⸾⸾प ⸾⸾, ⸾⸾पे ⸾⸾ठ⸾ ⸾व ⸾⸾ड ⸾⸾गा⸾ ⸾व ⸾⸾ची पोस्ट,* *२००९ मध्ये काही संस्थांनी एकत्र येऊन एक मोहिम चालवली होती. एका रिपोर्टनुसार, भारतात दररोज लाखोंच्या संख्येने अशा वस्तू हॉटेलबाहेर निघतात. देशात १ ते १.५ लाख हॉटेल रुम आहेत. यावरुन कल्पना करु शकता की, दररोज किती वस्तू बाहेर पडत असतील.ᴍᵃʰⁱᵗⁱ ˢᵉᵛᵃ ᵍʳᵒᵘᵖ,  ᴘᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃᵒⁿ  या समस्येचं समाधान करण्यासाठी जगभरात 'क्लीन द वर्ल्ड' आणि अशाच काही संस्थांनी मिळून 'ग्लोबल सोप प्रोजेक्ट' नावाचा उपक्रम राबवला. या अंतर्गत अर्धे वापरले गेलेले साबण नवीन साबण तयार करण्यासाठी वापरले जातात. हेच कंडिशनर, शॅम्पू आणि मॉइश्चरायजरसोबत केलं जातं. हे रिसायकल केलेले प्रोडक्ट विकसनशील देशांमध्ये पाठवले जातात.*
*🔹गरीबांना स्वच्छतेसाठी प्रोत्साहन*
या उपक्रमाचा अभाव त्या क्षेत्रांमध्ये मिळतो, जिथे स्वच्छ पाणी, स्वच्छता आणि सॅनिटेशनच्या सुविधांचा अभाव आहे. गरीब देशांमध्ये अस्वच्छतेमुळे अनेक लोक निमोनिया आणि डायरिया या आजाराचे शिकार होत आहेत. रिसायकल केलेले साबण-शॅम्पूने लोकांना स्वच्छतेसाठी प्रोत्साहन मिळतं.
*🔹आधी शुद्ध केलं जातं*
या उपक्रमाला आता जगभरातील सर्वच देशांमध्ये पाठिंबा मिळत आहे. स्थानिय स्तरावरही अनेक संस्था काम करतात. जे हॉटेलमधील अशा वस्तू एकत्र करतात आणि ते रिसायकल करण्यासाठी पाठवले जातात. रिसायकल दरम्यान साबण, शॅम्पू, किंडश्नर या वस्तू किटाणूरहीत केलं जातं. आणि यांच्या शुद्धतेची चाचणीही केली जाते.