
दीपावली
3
Answer link
शुभ दीपावली 🙏🙏
शुभ दीपावलीच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
दिवाळी किंवा दीपावली हा एक प्रमुख हिंदू सण आहे. दिवाळी हा पवित्र सण जो वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतिक मानलं जातो. परंतु सलग दुसऱ्या वर्षीही दिवाळीवर कोरोनासह मलेरिया आणि डेंग्यूचं सावट आहे. सरकारने कोरोनाचे निर्बंध शिथिल केले आहेत. खबरदारी राखणं तितकंच महत्त्वाचं असल्याचं सांगितलं आहे. थेट भेटी-गाठी टाळाव्या लागत आहेत. म्हणून तुम्ही जिथे आहात तिथुनच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रियजन, नातेवाईक आणि मित्रमंडळींना दिवाळीच्या शुभेच्छा देऊ शकतात.
दिवाळी निमित्ताने आपल्यासाठी खास मराठी शुभेच्छा संदेश
: कधी करावे महालक्ष्मी पूजन? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा नियम
आज दिवाळीनिमित्त व्रत विधी, पूजा मुहूर्त आणि नैवद्य
नरक चतुर्दशी…लक्ष्मी पूजन (
नरक चतुर्दशीचं मोठं महत्त्व आहे. पहाटे सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंग स्नान केला जातो. यंदा नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन 4 नोव्हेंबरला आहे. सायंकाळी घरातील सगळे सदस्य एकत्र येऊन लक्ष्मी पूजन करतात.
– पहाटे सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंग स्नान
लक्ष्मी-कुबेर पूजनाचा मुहूर्त-
सकाळी 6 वाजून 50 मिनिटं ते 8 वाजून 10 मिनिटांपर्यंत.
सकाळी 11 ते दुपारी 3 वाजून 10 मिनिटांपर्यंत.
सायंकाळी 4 वाजून 40 मिनिटं ते रात्री 9 वाजून 5 मिनिटांपर्यंत.
मध्यरात्री 12 वाजून 30 मिनिटं ते 2.00 वाजेपर्यंत.
मध्यरात्री 3 वाजून 40 मिनिटं ते 6 वाजून 30 मिनिटांपर्यंत.
(स्वाती नक्षत्र- सकाळी 7 वाजून 44 मिनिटं ते 9 वाजून 8 मिनिटांपर्यंत. 5 नोव्हेंबर 2021)
वसुबारस चे प्रसन्न वात्सल्य, धनत्रयोदशीची संपन्न संपत्ती,
नरकचतुर्दशीची अपार शक्ती, लक्ष्मीपूजनाचे सौंदर्यवैभव..
पाडव्याचे भरभरून गोड गोड प्रेम,
भाऊबीजेचा जिव्हाळा...
दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा...!
सोन्याच्या पावलांनी दीपावली आली
दीपज्योतीच्या तेजातून उमलावी लाली
कणा रांगोळी ही सजली अंगणी
गुंफूनी फुले तोरणे बांधू या दारी
चिंरजीव असोत हे हर्षभरले दिवस !
दिवाळीच्या लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा...!
लक्ष्य लक्ष्य दिव्यांनी उजळू दे आसमंत,
होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश,
पडे सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा लख्ख प्रकाश,
खास दिवाळी सणाच्या खूप साऱ्या सदिच्छा आपणास... !
सोज्वळ-सोनेरी किरणांनी उजळली सकाळ
घरावर सजली दिव्याची माळ..
दारावर सजलं फुलपानांचं तोरण...
दिवाळी सण उत्साहाचा...
प्रेम, स्नेहानं भरू दे मन..
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..!
मराठी अस्मितेची मराठी शान
मराठी परंपरेचा मराठी मान
आज सोन्यासारखा दिवस घेऊन येईल,
आयुष्यात तुमच्या सुख, समृद्धी आणि समाधान...
!!..शुभ दिपावली..!!
दीपावलीच्या पणत्यांमध्ये आहे,
आनंदाचा साक्षात्कार, मोठ्यांचं प्रेम
आणि जिव्हाळा
आपल्या सुखी आशीर्वादानं अंगणात येवो सोनेरी
दीपावली पहाट..!!
आपल्या सर्वांना दीपावलीच्या मनापासून शुभेच्छा..!