Topic icon

सूर्यमाला व ग्रह

0

उदाहरण पत्ता:

नाव:

जॉन डो

घर/इमारत क्रमांक:

curiosity rover base, red dust colony

शहर:

मंगळ शहर (hypothetical)

राज्य/प्रांत:

वॅलेस व्हॅलेस प्रांत (hypothetical)

ग्रह:

मंगळ ग्रह

टीप: हा केवळ एक काल्पनिक पत्ता आहे. भविष्यात मंगळावर वस्ती झाल्यावर NASA किंवा इतर अंतराळ संस्था अधिकृत पत्ता प्रणाली जाहीर करू शकतात.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 980
0

सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह बुध आहे.

बुध हा ग्रह सूर्याच्या सर्वात जवळचा आणि आपल्या सौरमंडळातील सर्वात लहान ग्रह आहे.

हा ग्रह सूर्याभोवती एक প্রদক্ষিণ पूर्ण करायला फक्त 88 दिवस घेतो.

या ग्रहावर वातावरण नसल्यामुळे तापमान खूप जास्त असते.

अधिक माहितीसाठी, आपण NASA ची वेबसाइट पाहू शकता:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980
0
एका तासात सूर्याच्या समोरून इतके रेखावृत्ते जातात.
उत्तर लिहिले · 22/1/2022
कर्म · 20
0

सूर्याचा दक्षिणायनाचा कालावधी 21 जून ते 22 डिसेंबर असतो.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980
0

सूर्यप्रकाश परावर्तनामुळे शुक्र आणि पृथ्वी यांसारख्या ग्रहांना प्रकाश मिळतो.

स्पष्टीकरण:

  1. परावर्तन: जेव्हा प्रकाश एखाद्या वस्तूवर पडतो, तेव्हा तो काही प्रमाणात परावर्तित होतो.
  2. शुक्र: शुक्राच्या वातावरणात ढगांचे प्रमाण जास्त असल्याने सूर्याचा प्रकाश मोठ्या प्रमाणात परावर्तित होतो. त्यामुळे शुक्र ग्रह तेजस्वी दिसतो.
  3. पृथ्वी: पृथ्वीच्या वातावरणातील ढग आणि जमिनीमुळे देखील प्रकाश परावर्तित होतो.

या व्यतिरिक्त, इतर ग्रहांना देखील सूर्याचा प्रकाश मिळतो, पण तो परावर्तनामुळे कमी प्रमाणात असतो.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980
1
दोनसूर्य मावळताना किंवा उगवताना मोठ्या आकाराचा झाल्याचा जाणवतो. पण हा एक दृष्टीभ्रम आहे. हा परिणाम विज्ञानामध्ये Moon illusion म्हणून ओळखला जातो. या भ्रमाचे कोणतेही एक असे बरोबर स्पष्टीकरण नाही तर त्यातही बऱ्याच आजूबाजूच्या गोष्टींचा आपल्या डोळ्यावर आणि परिणामतः आपल्या मेंदूवर परिणाम होतो आणि आपण जे पाहतो आणि अनुभवतो यात गल्लत होऊ शकते.

यामध्ये एक स्पष्टीकरण असे आहे की आपला मेंदू हा कोणतीही गोष्ट किती मोठी किंवा किती छोटी आहे हे सरळ सांगू शकत नाही तर त्यासाठी त्याला कोणत्यातरी गोष्टीसोबत त्याची तुलना करावी लागते. उदाहरणार्थ एक क्रिकेटचा चेंडू हा फुटबॉलपेक्षा छोटा आहे पण एका लिंबापेक्षा मोठा आहे. म्हणजेच त्या चेंडूच्या खऱ्या आकाराची तुलना दुसऱ्याशी केली तरच त्याचा खरा अंदाज आपल्याला बांधता येतो. तसेच सूर्याबाबतीत सकाळी आणि संध्याकाळी घडून येते. सकाळी आणि संध्याकाळी सूर्य हा आपल्या दृष्टीने क्षितिजावर असतो. त्यावेळी आपल्या नजरेस सूर्यासोबत आपल्या नजरेस आजूबाजूची घरे, झाडे, किंवा डोंगर अशा गोष्टी असतात. त्यामुळे आपला मेंदू आपोआप या सर्व गोष्टीची तुलना करण्यास सुरुवात करतो आणि डोळ्यास दिसणाऱ्या गोष्टींचा आकार ठरवण्यास सुरुवात करतो. आजूबाजूच्या गोष्टी सहाजिकच सूर्यापेक्षा छोट्या असल्याने आपोआप सूर्य आपणास मोठा दिसू लागतो. पण जेव्हा सूर्य दुपारी डोक्यावर येतो तेव्हा आकाशात त्याच्याशी तुलना करण्यासारखे त्याच्या अवतीभवती काहीही नसल्याने सूर्य त्याच्या मूळ आकारात दिसू लागतो. पण हा केवळ भ्रम आहे. याला Ebbinghaus illusion असे म्हंटले जाते.


वरील चित्रात दाखवल्याप्रमाणे केशरी रंगाचे वर्तुळ हे नेहमी एकाच आकाराचे आहे पण आपणास ते मोठे झाल्याचे जाणवते कारण त्याच्या आजूबाजूच्या वर्तुळांचा आकार कमी किंवा जास्त होताना दिसतो आहे. अगदी असेच आपले सूर्याच्या बाबतीत होते.

पण हे स्पष्टीकरण पूर्णपणे बरोबर नाही. कारण याला एक अपवाद म्हणजे जेव्हा समुद्रकिनारी जेव्हा सूर्योदय किंवा सूर्यास्त पाहता तेव्हाही सूर्य तुम्हाला क्षितिजावर मोठा दिसतो त्यावेळी तुलना करण्यासारखे सूर्यासोबत दुसरी कोणतीही वस्तू नाही. तरीही असे का घडले? तर आपला मेंदू अवकाश आणि अंतराला कसा समजून घेतो यात याचे उत्तर दडले आहे. आपले जग हे आपल्या डोळ्यांच्या दृष्टीने आडवे पसरले आहे, उभे नाही. म्हणजे दोन झाडे आपल्या नजरेस असली तर त्यातील जवळचे झाड कोणते आणि लांबचे झाड कोणते हे आपल्या डोळ्यांना पटकन समजू शकते. पण समजा आकाशातून एक विमान आणि एक पक्षी एकाच वेळी आजूबाजूने उडत असल्याचे आपल्याला दिसत असले तरीही आपल्यापासून कमी उंचीवरून कोण उडत आहे हे पटकन ओळखता येत नाही. आणि याचा परिणाम आपल्या दृष्टीतून होणाऱ्या अंतराच्या आकलनावर होतो. तसेच आपल्याला डोळ्यांना होणारा भास असा की पृथ्वी ही सपाट आहे आणि आकाश हे वक्र. त्यामुळे क्षितिजावर आपले सर्व एकवटत असल्यामुळे क्षितिज हे आपल्यासाठी कमी अंतरावर आहे आणि डोक्यावरचे आकाश हे जास्त अंतरावर आहे. त्यामुळे आपल्याला क्षितिजावर सूर्य हा मोठा दिसतो आणि जसजसा तो वर जात राहील तसतसे त्याचे आपल्याशी असलेले अंतर वाढेल आणि तो बारीक बारीक होत जाईल. पण अर्थातच हा भ्रम आहे. पृथ्वी आणि आकाश हे दोन्ही वक्र आहेत आणि सूर्यापासून आपले असलेले अंतर हे नेहमी समानच असते.

पण हेसुद्धा पूर्ण बरोबर उत्तर मानले जात नाही. कारण भ्रम हा मुळात भौतिकशास्त्र किंवा अवकाश विज्ञानाचा भाग नसून एक मानसशास्त्राचा भाग आहे. त्यामुळे त्या दृष्टीने अजून विचार होणे गरजेचे आहे.


उत्तर लिहिले · 30/12/2021
कर्म · 121765