भारत लोकसंख्या लोकसंख्या वाढ

भारतातील लोकसंख्या वाढीची कारणे स्पष्ट करा?

2 उत्तरे
2 answers

भारतातील लोकसंख्या वाढीची कारणे स्पष्ट करा?

0
लोकसंख्या वाढीचे कारणे 
१) जन्म-मृत्युदर :- आपल्या देशात मृत्युदरात घट झालेली आढळून येते. परंतु जन्मदर मात्र त्या मानाने घटलेली नाही. आपल्या देशाचा १००० लोकांमध्ये जन्मदर २७.५ आहे व मृत्युदर ०.५ आहे. त्यामुळे लोकसंख्येत वाढ होते.

२) अज्ञान, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा :- समाजामध्ये काही अंधश्रद्धा असतात. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, मेल्यावर पाणी पाजण्यास व अग्नी देण्यास इस्टेटीला वारस पाहिजे, मुलगाच पाहिजे, त्यामुळे मुलाची वाट पहात कुटुंबात माणसे वाढतात. मुलगी ही परक्याचे धन समजले जाते त्यामुळे मुलगा होईपर्यंत कुटुंब नियोजन केले जात नाही. काही वेळेस पहिल्या पत्नीला मुलीच झाल्या तर दुसरा विवाह केला जातो व त्या पत्नीकडूनही कुटुंब वाढविले जाते. त्यामुळे लोकसंख्येत वाढ होताना दिसून येते.

३) जन्म ही ईश्वरी देणगी आहे :- काही समाजामध्ये कुटुंब नियोजन करणे पाप मानले जाते. जन्म ही ईश्वरीय देणगी समजले जाते. या अंधश्रद्धेपोटी लोकसंख्या वाढ होताना आढळून येते.

४) वैद्यकीय सुविधांचा अभाव व अज्ञान :- वैद्यकीय सुविधा असून देखील त्या ग्रामीण भागामध्ये पोहोचत नाहीत. काही वेळेस कुटुंब नियोजनांच्या साधनांची माहिती असते. परंतू त्याची उपलब्धता नसल्यामुळे म्हणजेच या सुविधांचा अभाव असल्यामुळे तीचा वापर केला जात नाही. गैरसमजुती व अज्ञानामुळे माहिती देवून देखील त्याचा वापर केला जात नाही. या कारणांमुळे लोकसंख्येमध्ये वाढ होताना दिसून येते.

५) बालमृत्यू व अर्भक मृत्यूचे प्रमाण :- ग्रामीण भागांमध्ये बालमृत्यूचे व अर्भक मृत्यूचे प्रमाण जास्त असल्यामुळे अनेक मुलांना जन्म दिला जातो. त्यामुळेही लोकसंख्येमध्ये वाढ होते.

६) मुलीच्या लग्नाचे वय :- ग्रामीण भागामध्ये १५ ते १६ व्या वर्षीच मुलीचे लग्न करून दिले जाते. लग्न झाल्यावर लवकर मुले होतात. त्यावर नियंत्रण करण्याकरिता तिला कुटुंबनियोजनाबद्दलच्या साधनांचा व माहितीचा अभाव व अज्ञान असते. या वयामध्ये ती कोणत्याही गोष्टींचे निर्णय कुटुंबामध्ये घेऊ शकत नाही. त्याचप्रमाणे वयाच्या पस्तीसाव्या वर्षापर्यंत ती गर्भधारणा करू शकते. त्यामुळे अनेक अपत्य जन्माला येतात. हे देखील लोकसंख्या वाढीमध्ये भर घालणारे घटक आहेत.

७) निरक्षरता :- आपल्या देशात निरक्षरतेचे प्रमाण जास्त आहे. निरक्षरतेमुळे अंधश्रद्धा वाढतात. अशी लोकसंख्या वाढली तर माणसाला अनेक अडचणींना तोंड दयावे लागते. शिवाय शासनालासुद्धा आरोग्य सुविधा व इतर सुविधा पुरविणे अवघड होते. तेव्हा ही लोकसंख्यावाढ थांबविण्यासाठी विविध स्तरावर अनेक प्रयत्न चालू आहेत. ग्रामीण तसेच शहरी भागातील स्त्री पुरुषामध्ये जागृती निर्माण करणे गरजेचे आहे. लोकसंख्यावाढीमुळे अनेक अडचणी उभ्या राहतात. त्या संबंधीची जाणीव लोकांमध्ये निर्माण करायला हवी.
उत्तर लिहिले · 2/2/2023
कर्म · 53715
0

भारतातील लोकसंख्या वाढीची कारणे खालीलप्रमाणे आहेत:

  1. जन्मदर जास्त: भारतात जन्मदर अजूनही जास्त आहे. यामागे अनेक कारणे आहेत, जसे की:
    • गरिबी आणि अज्ञान: गरीब व अशिक्षित कुटुंबांमध्ये जास्त मुले जन्माला घालणे हे भविष्यातील उत्पन्नाचे साधन मानले जाते.
    • कुटुंब नियोजन पद्धतींचा অভাব: अनेक लोकांना कुटुंब नियोजन पद्धतींबद्दल माहिती नसते किंवा ते त्या वापरण्यास तयार नसतात.
    • मुलांची जास्त अपेक्षा: काही ठिकाणी, लोकांना मुलगा हवा असतो आणि त्यामुळे मुलगा होईपर्यंत ते मुले जन्माला घालत राहतात.
  2. मृत्युदर घट: आरोग्य सेवा सुधारल्यामुळे मृत्युदर घटला आहे.
    • रोग नियंत्रण: अनेक रोगांवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.
    • वैद्यकीय सुविधा: चांगली वैद्यकीय सेवा उपलब्ध असल्याने लहान मुले आणि गर्भवती महिलांचा मृत्युदर कमी झाला आहे.
  3. सामाजिक आणि सांस्कृतिक कारणे:
    • विवाह: भारतात विवाह हा एक सामाजिक नियम मानला जातो आणि बहुतेक लोक लवकर विवाह करतात.
    • धार्मिक मान्यता: काही धार्मिक मान्यता कुटुंब नियोजनाच्या विरोधात आहेत.
  4. स्थलांतर:
    • ग्रामीण भागातून शहरी भागाकडे लोकांचे स्थलांतर वाढले आहे. शहरांमध्ये जास्त संधी असल्यामुळे लोकसंख्या वाढते.

या कारणांमुळे भारतातील लोकसंख्या वाढत आहे. लोकसंख्या वाढीचे व्यवस्थापन करणे हे एक मोठे आव्हान आहे.

अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 980

Related Questions

आयुर्मानातील वाढ व लोकसंख्येची वाढ यांचा सहसंबंध असतो की, असल्यास कसा?
लोकसंख्येचे दोन गट कोणते केले जातात?
भारतातील लोकसंख्या वाढीचे कारण काय आहे?
जन्मदर हा मृत्युदरापेक्षा अधिक असल्यास लोकसंख्या वाढते का?
संक्रमणाच्या कोणत्या अवस्थेत लोकसंख्या तीव्र वाढते?
कोणत्या काळात भारताच्या लोकसंख्येत विक्रमी वाढ झाली?
भारत कोणत्या प्रकारचा लोकसंख्येचा देश आहे?