शब्दाचा अर्थ शब्द

राष्ट्र म्हणजे नेमके काय?

1 उत्तर
1 answers

राष्ट्र म्हणजे नेमके काय?

1



 
राष्ट्र म्हणजे काय ?

राष्ट्र ही मानवी समूहातील एकात्मतेची भावना व्यक्त करणारी संकल्पना आहे. भौगोलिक, भाषिक, धार्मिक, वांशिक किंवा सांस्कृतिक समानता, समान ऐतिहासिक परंपरा, राजकीय

आणि आर्थिक हितसंबंध या किंवा यांपैकी काही कारणांमुळे एकात्मतेची भावना निर्माण झालेला मानवी समूह स्वत:चे स्वतंत्र राज्य निर्माण करतो किंवा तसा प्रयत्न करतो, तेव्हा त्या मानवी समूहाला राष्ट्र असे म्हणतात. राष्ट्र निर्मितीसाठी समाजात एकात्मतेची आणि इतर मानवी समूहांपासून आपण वेगळे असल्याची भावना निर्माण होणे महत्त्वाचे असते.


 
रॅम्से मूर यांनी राष्ट्राची व्याख्या करताना म्हटले आहे की, “विशिष्ट आत्मीयतेच्या भावनेने एकत्र जोडला गेलेला लोकसमूह म्हणजे राष्ट्र. अशा लोकसमूहाच्या दृष्टीने ही आत्मीयतेची भावना एवढी प्रबळ आणि खरी असते की त्या समूहातील लोक समाधानाने एकत्र राहतात आणि त्यांना एकमेकांपासून अलग केल्यास असंतुष्ट बनतात. तसेच आपल्याहून वेगळ्या लोकांचे वर्चस्व ते सहन करू शकत नाहीत.”


उत्तर लिहिले · 5/6/2022
कर्म · 48335

Related Questions

ज्ञान संपादनाची व्याख्या कोणती येईल?
स्वयं अध्यायन म्हणजे काय?
ताम्रपट म्हणजे नेमके काय?
कथा म्हणजे काय ते सांगून कथेचे स्वरूप कसे स्पष्ट कराल?
आधूनिक भारतात सर्व प्रथमता नागरिकत कशा प्रकारे घोषित झाली?
समतेचा अधिकार कसा स्पष्ट कराल?
'कृष्णावळ' म्हणजे काय?