क्रीडा व्यक्तिमत्व फायदे

खेळामुळे कोणकोणते गुण अंगी येतात?

3 उत्तरे
3 answers

खेळामुळे कोणकोणते गुण अंगी येतात?

4
खेळल्यामुळे शारीरिक विकास साधतो व मानसिकता प्रबळ बनते. खेळ ही एक शारीरिक कला आहे. दररोज किमान अर्धा ते एक तास खेळ खेळला पाहिजे. खेळामुळे चपळता वाढते.खेळाचे विविध प्रकार आहेत. विविध खेळ विविध पद्धतींनी खेळले जातात. खेळांमध्ये बैठे खेळ व मैदानी खेळ असे दोन प्रकार आहेत. आज जगभरात विविध स्तरांवर विविध खेळ खेळले जातात. आणि सोबतच आपला व्यक्तिमत्त्व विकास घडतो. खेळ हा माणसासाठी महत्त्वाचे आहे.खेळामुळे मानसिक स्वास्थ्य लाभते...खेळल्यामुळे शारीरिक विकास साधतो व मानसिकता प्रबळ बनते. खेळ ही एक शारीरिक कला आहे. दररोज किमान अर्धा ते एक तास खेळ खेळला पाहिजे. खेळामुळे चपळता वाढते.खेळाचे विविध प्रकार आहेत. विविध खेळ विविध पद्धतींनी खेळले जातात. खेळांमध्ये बैठे खेळ व मैदानी खेळ असे दोन प्रकार आहेत. आज जगभरात विविध स्तरांवर विविध खेळ खेळले जातात. आणि सोबतच आपला व्यक्तिमत्त्व विकास घडतो. खेळ हा माणसासाठी महत्त्वाचे आहे.खेळामुळे मानसिक स्वास्थ्य लाभते.


खेळ
==इतिहास== प्राचीन काळी राजे रजवाडे यांचे काळात मनोरंजनासाठी विविध खेळांचे आयोजन केले जात असे. रेडयांच्या शर्यती, बैलांच्या झुंजी, त्या सोबत कुस्त्या , तलवारबाजी, दांडपट्टा, तिरंदाजी ... असे अनेक खेळ खेळले जात होते .



                       खेळाचे महत्व
व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने शारीरिक क्षमता म्हणजे फक्त श्रम नव्हे तर कोणत्याही व्यवसायात दीर्घकाळपर्यंत कार्यरत राहण्याची क्षमता. व्यक्तीचे आरोग्य चांगले असेल तरच हे होऊ शकते. याचाच अर्थ आरोग्य हा व्यक्तिमत्वाचा महत्वाचा भाग आहे.
चांगले आरोग्य म्हणजे कोणत्याही प्रसंगी व कोणत्याही वातावरणात न थकता दीर्घकाळ काम करण्याची क्षमता. हे काम शारीरिक किंवा बौध्दिक श्रमाचे असू शकते. विेक्रेत्याला भरपूर फिरण्याकरिता शारीरीक क्षमतेची गरज असते, तर कार्यालयातील लेखापलकाकडे एका जागी बसून दीर्घकाळापर्यंत बौध्दिक श्रम करण्याची क्षमता असली पाहिजे.
दीर्घकाळपर्यंत काम करण्याच्या क्षमतेतून व्यक्ितमध्ये आत्मविश्र्वास निर्माण होतो. चांगल्या व्यक्तिमत्वाकरिता आत्मविश्र्वास हा एक मूलभूत गुण आहे. याशिवाय निरोगी शरीरामुळे मनाची एकाग्रतासुध्दा टिकून राहते व व्यक्ती त्या कामात कार्यकुशल बनते. याचाच अर्थ चांगले आरोग्य व्यक्ितमध्ये आत्मविश्र्वास व मनाची एकाग्रता निर्माण करते.
आरोग्य जोपासण्यासाठी व्यक्ितने नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. यासाठी उपलब्ध साधनांचा वापर करुन परिस्थितीनुसार कोणताही व्यायाम केला तरी चालू शकतो. त्यासाठी व्यायाम शाळेतच गेले पाहिजे असे नाही तर चालणे, पळणे, योगासने इत्यांदी साध्या व सोप्या व्यायामाने सुध्दा शारीरिक क्षमता निर्माण होते. लोकमान्य टिळकांसारख्या महान व्यक्ितने सुध्दा आरोग्याचे महत्व लक्षात घेऊन एक वर्ष फक्त शरीर कमावण्यासाठी खर्च केले होते.
चांगल्या शरीरदृष्टीमुळे व्यक्तीचे बाहयस्वरुप सुध्दा खूलून दिसते. चांगली शरीरयष्टी असणार्‍या व्यक्ितला कोणताही पोषाख चांगला दिसतो. व समोरच्या व्यक्तिवर त्याचा प्रभाव पडतो. नीटनेटका व चांगला पोषाख हा सुध्दा व्यक्तिमत्वाचा एक भाग आहे.
वरील सर्व गोष्टी पाहता शारीरिक क्षमतेसाठी नियमीत व्यायाम करणे अतिशय गरचेचे आहे.
 i


खेळ :-
जीवनामध्ये खेळालासुध्दा महत्व आहे. कारण शारिरीक क्षमतेबरोबरच व्यक्तितील इतर महत्वाच्या गुणांचा विकास खेळामुळे घडतो. बहुतेक लोक खेळाकडे मनोरंजन व शारीरीक व्यायाम या दृष्टीकोनातून पाहतात. खरे पाहता खेळामुळे व्यक्तितील इतर सुप्त गुण सुध्दा विकसित होत असतात. म्हणूनच व्यक्तिमत्व विकासात शारीरीक क्षमता वाढवताना खेळाला महत्व दिले पाहिजे. खेळामूळे खालील गुणांचा विकास होतो.
१. खिलाडू वृज्ञ्ल्त्
२. सांघिक वृज्ञ्ल्त्
३. सहकार्य करण्याची वृज्ञ्ल्त्
४. नेतृत्व .
५. स्पर्धात्मक वृज्ञ्ल्त्
६. एकाग्रता.
७. सहनशीलता.
८. आत्मविश्र्वास.


उत्तर लिहिले · 16/9/2021
कर्म · 121765
2
खेळामुळे अनेक गुण अंगी येतात. तसेच शारीरिक व मानसिक आरोग्यही निरोगी राहते. चंचलता येते. सांघिक भावना निर्माण होते. बारिक निरिक्षण करण्याची सवय होते. सूक्ष्म लक्ष्य ठेवण्याची कला आत्मसात होते. जिंकण्याची जिद्द निर्माण होते. हारण्याचे दुःख पचवण्याची क्षमताही प्राप्त होते. इत्यादी.
उत्तर लिहिले · 16/9/2021
कर्म · 25830
0

खेळामुळे अनेक गुण अंगी येतात, त्यापैकी काही महत्त्वाचे गुण खालीलप्रमाणे:

  • शारीरिक तंदुरुस्ती (Physical Fitness):

    नियमित खेळ खेळल्याने शारीरिक क्षमता वाढते, स्नायू बळकट होतात आणि वजन नियंत्रणात राहते.

  • मानसिक विकास (Mental Development):

    खेळ खेळताना रणनीती (strategy) आखावी लागते, ज्यामुळे विचारशक्ती आणि निर्णय घेण्याची क्षमता सुधारते.

  • सामाजिक कौशल्ये (Social Skills):

    खेळामुळे टीमवर्क (teamwork) आणि सहकार्याची भावना वाढते. इतरांशी संवाद साधण्याची आणि जुळवून घेण्याची सवय लागते.

  • धैर्य आणि चिकाटी (Courage and Perseverance):

    खेळात हार-जीत होत असते, त्यामुळे खिलाडूवृत्ती (sportsmanship) आणि परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी होते.

  • नेतृत्व क्षमता (Leadership Skills):

    टीममध्ये खेळताना नेतृत्व करण्याची संधी मिळते, ज्यामुळे आत्मविश्वास वाढतो.

  • वेळेचे व्यवस्थापन (Time Management):

    खेळ आणि इतर कामे यांचा समन्वय साधताना वेळेचे महत्त्व समजते.

याव्यतिरिक्त, खेळामुळे सहनशीलता, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन (positive attitude) यांसारखे गुणही विकसित होतात.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 980

Related Questions

ब्रह्मचर्य पालन केल्यावर नेमके काय फायदे होतात?
HKvital चे फायदे?
हिरवे मूग खाण्याचे फायदे?
कंपनीचे लाभ विशद करा?
उद्योगाचे फायदे कोणते आहेत?
हरित क्रांतीचे फायदे कोणते आहेत?
माठातील (मातीच्या मडक्यातील) पाणी पिण्याचे फायदे कोणते आहेत?