तुमच्या नावावर कोणते सिम सक्रिय आहेत कसे पहावे?तुम्हाला कॉल येणारा नंबर कोणाचा आहे कसे पहावे?

1 उत्तर
1 answers

तुमच्या नावावर कोणते सिम सक्रिय आहेत कसे पहावे?तुम्हाला कॉल येणारा नंबर कोणाचा आहे कसे पहावे?

3
🧐 *सावधान! तुमच्या नावावर कोण मोबाईल सिम घेऊन वापरतोय ते पहा फक्त दहा सेकंदात.....*

🔰📶 *महा डिजी | तंत्रज्ञान* 

💫एका व्यक्तीच्या आधारवर तसेच इतर कागदपत्रांवर किती मोबाईल नंबर लिंक आहेत, हे पाहण्यासाठी दूरसंचार विभागाने नवा उपक्रम सुरु केलं आहे.

🧐 *ही आहे ती प्रोसेस....*

■ सर्वप्रथम bit.ly/3DgFZx7 या वेबसाईटवर जा. वेबसाईटवर गेल्यानंतर मोबाईल नंबर एंटर करा.
■ त्यानंतर मोबाईलवर एक 6 अंकी ओटीपी येईल. तो ओटीपी एंटर केल्यानंतर तुमच्या आधारवर खरेदी करण्यात आलेले मोबाईल नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतील. 
■ सध्या ही सुविधा तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांसाठीच आहे. मात्र या सुविधेचा लाभ सर्वचं घेऊ शकतात, असं या वेबसाईटवर नमूद करण्यात आलं याहे.

📱 *..आता तुम्हाला कॉल करणाऱ्या व्यक्तीचं खरं नाव कळणार; Truecaller ला टक्कर देणार 'हे' भारतीय ॲप!*

 _*🔰📶महा डिजी | तंत्रज्ञान*_ 

🤔 कोणाचा नंबर आहे हे सांगण्याबरोबरच 'भारत कॉलर' हे ॲप्लिकेशन तुम्हाला आलेल्या बनावटी, धोकादायक नंबर्सची सुद्धा आपल्याला माहिती देणार आहे. भारतीय कंपनी 'किकहेड सॉफ्टवेयर्स'ने 'भारत कॉलर'ची निर्मिती केली आहे. आयआयएम बँगलोरचा विद्यार्थी प्रज्वल सिन्हाने ही कंपनी 2018 मध्ये सुरू केली होती.

💁🏻‍♂️ *तुमची माहिती स्वतःकडे न ठेवता सर्व्हर वरून लोकांपर्यंत खऱ्या कॉल करणाऱ्या व्यक्तीचं नाव पोहोचवणाऱ्या 'भारत कॉलर' ॲपला प्ले-स्टोअरवरून डाऊनलोड करा* 👉 https://jio.sh/C243G

🤙 *भारत कॉलर'ची खास वैशिष्ट्ये:*

▪️ ज्यांनी हे ॲप्लिकेशन डाउनलोड केलं आहे आणि त्यांच्या मोबाईलमध्ये तुमचा नंबर सेव्ह केलेला नसेल, तरी त्यांचं नाव तुम्हाला 'भारत कॉलर'द्वारे आपल्याला स्क्रीनवर लगेच दिसणार आहे.
▪️ तुम्ही ॲप्लिकेशन डाऊनलोड केल्यावर जे नाव, नंबर टाईप कराल तेच नाव 'भारत कॉलर' तुमच्या नावाने सेव्ह करेल आणि त्यासाठी इतर कोणताही शोध करणार नाही असा दावा कंपनीने केला आहे.
▪️ 'भारत कॉलर' वापरतांना तुमचं नाव हे कोणत्याही सर्व्हरवर सेव्ह केलं जाणार नाही, हेच त्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे.
▪️ सध्या या ॲपचा वापर भारतापूरता मर्यादित ठेवण्यात आला आहे. इंग्रजी, हिंदी, तामिळ, गुजराती, बंगाली आणि मराठी या भाषांमध्ये 'भारत कॉलर'चा वापर केला जाऊ केला जाऊ शकतो. 

🤷‍♂️ *'भारत कॉलर'च का हवं?*

2017 मध्ये भारतीय संरक्षक दलाच्या असं लक्षात आलं होतं, की अमेरिकेचं 'ट्रु कॉलर' हे आपल्या भारतीय सैनिकांची वैयक्तिक माहिती चोरत आहे. भारतीय आर्मीने त्वरित सर्व सैनिकांना 'ट्रु कॉलर' आपल्या मोबाईलमधून काढून टाकण्याचे आदेश दिले. मग भारतीय आयटी कंपन्यांना 'ट्रु कॉलर' सारखं काम करणारं आणि लोकांच्या वैयक्तिक माहितीची चोरी न करणारं ॲप्लिकेशन तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. यंदाच्या ऑगस्ट 2021 मध्येच 'भारत कॉलर' ॲप्लिकेशन लॉंच केलं आहे. सध्या जास्त फीचर्स नसले तरीही तुमच्या वैयक्तिक माहितीसाठी 'भारत कॉलर' हे सर्वात सुरक्षित आहे, असं कंपनीने सांगितलं आहे.
उत्तर लिहिले · 27/8/2021
कर्म · 569125