विभाजन विभीषिका स्मृती दिवस(Partition Horrors Remembrance Day)कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

1 उत्तर
1 answers

विभाजन विभीषिका स्मृती दिवस(Partition Horrors Remembrance Day)कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

1
📣 _*१४ ऑगस्ट आता ‘हा’ दिवस म्हणून ओळखला जाणार; नरेंद्र मोदींनी केली घोषणा*_


रविवारी संपूर्ण देशभरात भारताचा ७५ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याची तयारी सुरु आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक महत्वाची घोषणा केली असून फाळणीच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. 

📌 *विभाजन विभीषिका स्मृति दिवस* :

▪️ देशाच्या फाळणीच्या वेदना विसरल्या जाऊ शकत नाही असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १४ ऑगस्ट हा दिवस ‘फाळणी वेदना स्मृतिदिन’ म्हणून ओळखला जाईल असं सांगितलं आहे.

▪️ “देशाच्या फाळणीच्या वेदना विसरल्या जाऊ शकत नाही. द्वेष आणि हिंसाचारामुळे आपल्या लाखो बंधू-भगिनींना स्थलांतरित व्हावं लागलं आणि काहींना तर आपला जीवही गमवावा लागला. त्या लोकांच्या संघर्ष आणि बलिदानाची आठवण ठेवत १४ ऑगस्टला ‘फाळणी वेदना स्मृतिदिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे”.

▪️ “हा दिवस आपल्याला भेदभाव, शत्रूत्व आणि द्वेष संपवण्यासाठी फक्त प्रेरणा देणार नाही; तर यामुळे एकता, सामाजिक सद्भावना आणि भावना मजबूत होतील,” असंही नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

📍 १४ ऑगस्ट १९४७ रोजी भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली होती. पाकिस्तानात १४ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जातो.
उत्तर लिहिले · 14/8/2021
कर्म · 569125