2 उत्तरे
2
answers
खेळाचे फायदे काय?
4
Answer link

मनुष्याला रोगांपासून दूर राहण्यासाठी निरोगी शरीर असणे आवश्यक आहे. एका निरोगी शरीरातूनच निरोगी मन व बुद्धीचा विकास होतो. शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी खेळांचे भरपूर महत्त्व आहे. खेळांमुळे शरीर व मन दोघेही निरोगी राहतात. खेळ खेळल्याने मनुष्यात धैर्य, सहनशीलता आणि मानवी गुणांचा विकास होती. खेळ आजच्या व्यस्त जीवनात महत्त्वाची भूमिका बजावते. खास करून विद्यार्थ्यांच्या जीवनात खेळांचे महत्त्व भरपूर आहे. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला दिवसातून थोडा वेळ काढून खेळायला हवे. खेळ खेळल्याने तंदुरुस्ती सोबत मनोरंजनही होते.
कोणताही खेळ खेळल्याने व्यक्तीचा शारीरिक विकासासोबत मानसिक विकासही होतों. खेळताना डोळे, मेंदू व शरीराच्या प्रत्येक अवयवाचा वापर करावा लागतो. खेळांमुळे शरीराचे संतुलनही वाढते. नियमित कोणतातरी खेळ खेळल्याने चित्त प्रसन्न राहते. शारीरिक अवयवांचा व्यवस्थित विकास होतो. मनात उल्हास आणि उत्साह वाढून आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात यश मिळते.
खेळांचे देखील वेगवेगळे प्रकार असतात काही खेळ शारीरिक तर काही मानसिक असतात. शारीरिक खेळ खेळण्यासाठी शरीराला श्रम करावे लागते, तर मानसिक खेळांमध्ये मेंदूचे कार्य असते. फुटबॉल, हॉकी, व्हॉलीबॉल, क्रिके, टेनिस, कबड्डी इत्यादी शारीरिक खेळ आहेत. या खेळांना खेळण्यासाठी शारीरिक ताकत लागते. दुसरीकडे बुद्धिबळ, पत्ते, चौपट इत्यादी मानसिक खेळ आहेत, ज्यांना खेळण्यासाठी मानसिक शक्तीचा वापर करावा लागतो.
या शिवाय इनडोर आणि आऊटडोर खेळांचे प्रकार आहेत. आजकाल इनडोर खेळांमध्ये कॉम्प्युटर व मोबाईल गेम्स मोठ्या प्रमाणत खेळले जात आहेत. परंतु हे खेळ तुमचे स्वस्थ सुधारणा ऐवजी बिघडवित आहेत.
खेळ कोणताही असो तो आपल्या शरीराला स्वस्थ आणि मनाला प्रसन्न करतो. खेळ मनुष्याचा व्यक्तिमत्त्व विकास करतात. ते एकमेकांमध्ये सहकार्य व बंधुता वाढवतात. खेळांमुळे परंपरा सन्मान आणि प्रेम देखील वाढते. अश्या पद्धतीने खेळ आपल्याला गुणवान, चारित्र्यवान आणि एक खरा व्यक्ती बनवतात.
0
Answer link
खेळ खेळण्याचे अनेक शारीरिक, मानसिक आणि सामाजिक फायदे आहेत. त्यापैकी काही खालीलप्रमाणे:
शारीरिक फायदे:
- शारीरिक तंदुरुस्ती: खेळ खेळल्याने हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्य सुधारते, स्नायू मजबूत होतात आणि वजन नियंत्रणात राहते. Better Health Channel
- रोगप्रतिकारशक्ती वाढते: नियमित खेळ खेळल्याने रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि आजारांपासून बचाव होतो.
- हाडे मजबूत होतात: खेळ खेळल्याने हाडांची घनता वाढते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात.
मानसिक फायदे:
- तणाव कमी होतो: खेळ खेळल्याने तणाव कमी होतो आणि मन शांत राहते. National Institutes of Health (NIH)
- एकाग्रता वाढते: खेळ खेळताना लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता असते, ज्यामुळे एकाग्रता वाढते.
- आत्मविश्वास वाढतो: खेळात यश मिळाल्याने आत्मविश्वास वाढतो.
सामाजिक फायदे:
- सामूहिक भावना: सांघिक खेळ खेळल्यानेTeam spirit वाढते.
- सामाजिक कौशल्ये: लोकांबरोबर कसे वागावे आणि संवाद कसा साधावा हे खेळातून शिकायला मिळते.
- नेतृत्व क्षमता: काही खेळांमध्ये नेतृत्व करण्याची संधी मिळते, ज्यामुळे नेतृत्व क्षमता विकसित होते.
याव्यतिरिक्त, खेळ खेळणे एक मजेदार आणि आनंददायी अनुभव असतो, जो आपल्या जीवनात सकारात्मकता आणतो.