कायदा प्रॉपर्टी तक्रार अधिकारी जमीन मालमत्ता

जमीन मोजणाऱ्या अधिकाऱ्याने बाक नसताना बाक दाखविला आहे, तर तक्रार कोणाकडे करावी?

2 उत्तरे
2 answers

जमीन मोजणाऱ्या अधिकाऱ्याने बाक नसताना बाक दाखविला आहे, तर तक्रार कोणाकडे करावी?

2
. हद्दकायम मोजणी कामी कोण अर्ज दाखल करु शकतो ?
उत्तर हद्दकायम मोजणीकामी संबंधित गट नंबर/ सर्व्हे नंबर मधील 7/12 वर नाव दाखल असलेली कोणताही हितसंबंधित व्यक्ती अर्ज करु शकते.

2. हद्दकायम मोजणी अर्ज कोठे करावा ?
उत्तर हद्दकायम मोजणी अर्ज संबंधित तालुक्यातील उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयात करावा.

3. निमताना मोजणी साठी अर्ज कोणाकडे करावा ?
उत्तर निमताना मोजणीसाठी अर्ज संबंधित तालुक्यातील उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयात करावा.

4. सुपर निमताना मोजणी अर्ज कोणाकडे करावा ?
उत्तर सुपर निमताना मोजणीसाठी अर्ज संबंधित जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख यांचे कडे करावा.

5. जमिनीची मोजणी कोणत्या नियमाखाली केली जाते?
उत्तर जमिनीची मोजणी महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 चे कलम 136 अन्वये केली जाते.

6. हद्दकायम मोजणी कशासाठी केली जाते ?
उत्तर जेव्हा एखाद्या भूमापन क्रमांकाच्या हित संबंधित धारकास भूमापन क्रमांकाच्या हद्दी बाबत तक्रार असेल तर मोजणी अर्ज करावा.

7. हद्द कायम मोजणी अर्जाकामी कोणते अभिलेख आवश्यक असतात ?
उत्तर हद्द कायम मोजणी अर्जाकामी तीन महाच्या आतील 7/12, कब्जेदारांसह जमिनीच्या चतु:सिमा प्रमाणे लगत कब्जेदारांचे नाव/ पत्ते अर्जात नमुद करावीत.

8. हद्दकायम मोजणी फीचे किती प्रकार आहेत ?
उत्तर अतितातडी, तातडी, नियमित असे तीन प्रकार आहेत.

9. हद्दकायम मोजणी मान्य नसल्यास काय तरतुद आहे ?
उत्तर हद्दकायम मोजणी मान्य नसलेस निमताना (अपिल अर्ज)मोजणीकामी उप अधीक्षक भूमि अभिलेख यांचेकडे अर्ज कराता येतो.

10. हद्दकायम मोजणीचा उपयोग काय ?
उत्तर हद्द कायम नकाशा वरुन अर्जदारांस मालकी हक्क, लगत कब्जेदारांनी अतिक्रमण केल्यास महसूल विभागाकडून ताबा घेणे व इतर न्यायालयीन/ खाजगी महत्वाच्या कामासाठी तसेच आपल्या संबंधित गटाच्या गहाळ खुणा समजून येण्यासाठी होतो.

11. मोजणी नकाशाची " क " प्रत वेळेत न मिळाल्यास काय करावे ?
उत्तर संबंधित कार्यालय प्रमुखांना म्हणजेच उप अधीक्षक भूमि अभिलेख यांना भेटावे.

12. कोर्ट वाटप प्रकरणात कोणकोणते अभिलेख सामिल असणे आवश्यक असते ?
उत्तर प्रकरणात भूमापन/गट नंबर क्रमांकाचे 3 महातील 7/12 (अधिकार-अभिलेख), वाटप दरखास्त तक्ता, हूकुमनामा, व मोजणी फी भरण्याचे चलन इत्यादी

13. कोर्ट वाटप मोजणी प्रकरणी फीची आकारणी कशी केली जाते ?
उत्तर तातडीच्या दराने फी आकारणी केली जाते.

14. कोर्ट वाटप मोजणी करणे कामी किती दिवस मुदतीची नोटीस दिली जाते ?
उत्तर कोर्ट वाटप मोजणी प्रकरणात हुकुमनाम्यातील वादी- प्रतिवादीस या सर्वांना रजिस्टर पोस्टाने 30 दिवस (1 महिना) आगावू मुदतीची नोटीस देणे जरुर असते.

15. कोर्टवाटप मोजणी कशी केली जाते ?
उत्तर कोर्टाच्या हुकुम नाम्याप्रमाणे मोजणीची कार्यवाही करण्यात येते.

16. कोर्ट कमिशन मोजणी प्रकरणात कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते ?
उत्तर मा. दिवाणी न्यायालयाकडील आदेश, तीन महातील अधिकार- अभिलेख (7/12) ,मोजणी फी भरल्याचे चलन, वादी-प्रतिवादींची नावे/ पत्ते चालु परिस्थिती प्रमाणे मोजणी करावयाच्या क्षेत्राच्या चतु:सिमा इत्यादी कागदपत्रे प्रकरणी आवश्यक असतात.

17. कोर्ट कमिशन मोजणी कधी करता येते ?
उत्तर जमिनीचे हद्दीमध्ये धारकामध्ये वाद निर्माण झाल्यास दिवाणी न्यायालयात दावा दाखल करुन वादी - प्रतिवादी यांच्या बाजू/ म्हणणे ऐकुण निप:क्षपाती निर्णय होणेसाठी या विभागातील अधिकारी / कर्मचारी यांची कोर्ट कमिशनर नेमणुक होऊन मोजणीसाठी पाठविले जाते.

18. कोर्ट कमिशन मोजणी प्रकरणात मोजणी फी आकारणी कशी केली जाते ?
उत्तर कोर्ट कमिशन प्रकरण न्यायालयाकडून प्राप्त झालेवर 7/12 अभिलेखाप्रमाणे तातडीच्या दराने मोजणी फी आकारावी .

19. बिनशेती मोजणी प्रकरणात कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते ?
उत्तर बिनशेती मोजणी प्रकरणात सक्षम प्राधिकाऱ्याचे बिनशेती आदेश, मंजुर अभिन्यासाची मूळ प्रत(लेआऊट), चालू तीन महातील 7/12, चतु:सीमेप्रमाणे सहकब्जेदार/ लगत कब्जेदार यांची नावे व पत्ते, मोजणी फी चे मूळ चलन इ. कागदपत्रांची आवश्यक्ता असते.

20. बिनशेती मोजणी कधी करता येते ?
उत्तर एखाद्या जमिनधारकास त्यांच्या जमिनीची अकृषीक प्रयोजनासाठी वापर करावयाचा असलेस महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 कलम 44 अन्वये महसुल विभागाची परवानगी घेऊन कोणत्या प्रयोजनासाठी जमिनीचा वापर करावयाचा आहे. त्यानुसार धारकास मोजणी करणे कामी शर्त घातली जाते व तसे आदेशात नमुद केले जाते.

21. बिनशेती परवानगी बाबत भूमि अभिलेख विभागाने कोणती कार्यवाही करावयाची असते ?
उत्तर संबंधित भूखंडाची बिनशेती परवानगी घेण्यापूर्वी व अभिन्यांस मंजुर झालेनंतर भूमि अभिलेख विभागाकडून मोजणी करुन घेणे आवश्यक असते.

22. बिनशेती मोजणी फी आकारणी कशी केली जाते ?
उत्तर बिनशेती मोजणी फी अतितातडी/ तातडी /साधी या प्रकारे आकरणी करुन चलनाने बँकेत (र.रु.3000/- च्या पुढे) अथवा कार्यालयात रोख पावतीने(र.रु.3000/- चे आत) फी असल्यास भरणा केली जाते.

23. नक्कल अर्ज कोणास व कसा करता येतो ?
उत्तर नक्कल अर्ज कोऱ्या कागदावर,आवश्यक त्या नकला मिळणे कामी , गावांचे नाव, तालुका, जिल्हा इत्यादी नमुद करुन अभिलेखाचा प्रकार नमुद करावा. नकलेचा अर्ज कोणत्याही व्यक्तीस करता येतो. अर्जास 5 रु. कोर्ट फी तिकीट लावावे.

24. नक्कल अर्ज केल्यानंतर किती दिवसात नक्कल मिळते ?
उत्तर नक्कल अर्ज दिल्यानंतर 3 दिवसांचे आत नक्कला मिळतात.

25. नक्कलेचा वापर अर्जदारांस कोठे करता येतो ?
उत्तर नक्कलेचा उपयोग, कोर्ट कामासाठी, खरेदी -विक्रीसाठी , मोजमापे करुन घेण्यासाठी व इतर खाजगी महत्वाचे कामासाठी होतो.
उत्तर लिहिले · 18/8/2020
कर्म · 8640
0
जमीन मोजणीमध्ये अधिकाऱ्याने बाक नसताना बाक दाखविल्यास, तुम्ही खालील ठिकाणी तक्रार करू शकता:
  • उप विभागीय अधिकारी (Sub Divisional Officer): तुमच्या विभागातील उप विभागीय अधिकारी हे जमिनी संबंधित तक्रारींसाठी महत्वाचे अधिकारी असतात. त्यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार दाखल करा.

  • जिल्हाधिकारी (District Collector): तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात देखील तक्रार दाखल करू शकता.

  • तहसीलदार (Tehsildar): तुमच्या तालुक्यातील तहसीलदारांकडे तक्रार दाखल करणे हा देखील एक पर्याय आहे.

  • भूमी अभिलेख विभाग (Land Records Department): भूमी अभिलेख विभागात जमिनीच्या नोंदी व मोजणी संबंधित तक्रारींचे निवारण केले जाते.

तक्रार करताना तुमच्या जमिनीचेdetails जसे कीplot number, location आणि ज्या अधिकाऱ्याने गैरव्यवहार केला आहे त्याचे नाव नमूद करणे आवश्यक आहे. तसेच, तुमच्याकडे काही पुरावे असल्यास ते सादर करा.
अधिक माहितीसाठी, तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाच्या वेबसाइटला भेट देऊ शकता: https://mahabhumi.gov.in/
उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 980

Related Questions

खरेदी प्रमाणे माझी जागा १५ फूट पूर्व पश्चिम २८ फूट आहे, तरी मला माझी जागा पूर्णपणे मिळू शकते का?
खरेदी प्रमाणे माझी जागा पण उत्तर ते दक्षिण?
वजन व समोरच्या व्यक्तीची जागा खरेदी केलेली आहे व माझी जागाही आठ अ प्रमाणे आहे, तर कोणाला कोणाची जागा त्याच्या हक्काप्रमाणे मिळेल?
घरकूल बांधकामास शेजारील व्यक्ती अडथळा आणत आहे?
माझी जागा खरेदी प्रमाणे 15x28 आहे आणि मी माझ्या जागेवर 14x28 प्रमाणे बांधकाम करत आहे, आणि शेजारील व्यक्ती बांधकाम करण्यास अडवत आहे, तर काय करावे लागेल?
खरेदी केलेल्या जागेवर शेजारी व्यक्ती बांधकामास अडथळा आणत आहे, तर काय करावे?
खरेदी केलेल्या जागेवर शेजारी काही अडचण आणू शकतो का?