जात व कुळे प्रजाती समाज माळी समाज

माळी समाजाबद्दल माहिती द्या?

2 उत्तरे
2 answers

माळी समाजाबद्दल माहिती द्या?

7
----------------------------------
*◼माळी समाजाविषयी माहिती*
----------------------------------
नवखंड पुष्कराज येथे भगवान श्री ब्रम्हादेवाचे मंदिर आहे, त्या स्थळी महायज्ञ याचे आयोजन करण्यात आले, तेथे अनेक देव देवता व शंकर आणि पार्वती सुद्धा उपस्थित होते , महादेवाने आपल्या शरीराचा मळ काढून त्या यज्ञात टाकला,त्या नंतर यज्ञा मधून एक तेजस्वी पुरुष बाहेर आला, त्या पुरुषाचे तेज हे सुर्याप्रमाने होते, व त्याच्या हातामधे पांढरे फुल होते ,त्याचे तेज बघून देव देवता भयभीत झाले , नारद मुनिनी भगवान महादेवास विचारले हा तेजस्वी पुरुष कोण आहे तसेच ब्रम्हादेवाने देखिल हाच प्रश्न महादेवास केला , तेव्हा महादेव म्हणाले माझ्या मळ पासून तयार झालेला हा तेजस्वी पुरुष मळ चे माळी व सदैव हातामध्ये पांढरे फुल घेउन माळी समाजात जन्म घेईल, तेव्हा पासून माळी समाजाची उत्पत्ति झाली,
https://m.facebook.com/story.php?story_fbid=858439041220687&id=100011637976439
माळी हा शब्द माला या संस्कृत शब्दापासुन तयार झालेला आहे, महाराष्ट्रातील माळी समाज हा कोणत्याही एका शाखेचा नसून अनेक पोट जाती आणि शाखा , पोट शाखा यांचा समावेश यात केलेला आहे, महाराष्ट्रात प्रामुख्याने फुल माळी, क्षत्रिय माळी , वन माळी , पान  माळी , डांग माळी , हलदी माळी, जीरे माळी , गासे माळी , काशे माळी , काच  माळी ,कोसरे माळी , मरार माळी , पहाड़ माळी , लोनर माळी , पञ्च कलशी ,चौकल्शी , आगरी माळी, लिंगायत माळी या प्रकारच्या पोट जाती व शाखा आहेत,माहिती सेवा ग्रुप पेठवडगावची पोस्ट,मराठा माळी हे कुनबी आहे , पुढे व्यव्सयावारून वेगळी जात बनली , त्यांच्यात फुल माळी , अद्यप्रभू , अद्यशेटी,बावने,हल्दे, जीरे, काच , कडू , क्षीरसागर , लिंगायत , पदे , उंड़े आदि तेरा पोट भेदआहेत , मात्र यात प्रामुख्याने फुल माळी , हळदे ,जीरे, काच माळी यांची संख्या जास्त प्रमाणात आहे,फूल माळी हे फुलांचा व्यवसाय करतात व हे सर्वात उच्च मानले जातात व त्यांनाच सावता माळी असेही म्हणतात, जीरे माळी हे जीरे पिकवित असे व हळदे माळी हळद त्या कारणाने त्यांना या नावाने पोट जाती पडल्याअसाव्यात,फुले , फळ , भाज्या , ऊस , हळद, जिरे आदी बागायती पीके काढने हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे,क्षत्रिय माळी व क्षात्र धर्म या ग्रंथात क्षत्रिय माळी समाजाबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे, उत्तर भारतात मालव, मोहेल, यादव, सोलंकी, चव्हाण, पवार, वाघेला, ही मुळ मराठा व राजपूत यांच्या कुळ गोत्रातिल जमात असून
परकीय हस्तक्षेपामुले देशोधडीला लागले, अन्य प्रांतात जाउन त्यानी मला किंवा शेतीकाम करावयास सुरूवात केली,म्हणून त्याना माळी असे म्हंटले जाऊ लागले, त्यातून 'क्षत्रिय माळी'  ही माळी समाजाची पोट जात मानली जाऊ लागली, या शिवाय त्यांच्यात राजपूत माळी, सैनी माळी, माशी माळी, काशी माळी, जीरे माळी,हळदीमाळी
आदि पोट भेद असे, सैनी, श्रीमाळी, वीर माळी, करमाळी , गंध  माळी , मालव , मालो , माला , काछी , दासी ,
दोसी , बागवान , राउत , सागर , आहार, अहरी , अंध , मैना कहार ,खैरा वाघिल्वाल , आदि मुस्लिम समाजातील
बागवान हे पूर्वीचे माळी असल्याचे बोलले जाते
http://mahitiseva.weebly.com
----------------------------------
-----------------------------------

0

माळी समाज हा भारतवर्ष आणि महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा समाज आहे.

इतिहास:

  • माळी समाज हा मूळचा महाराष्ट्रातील आहे.
  • ह्या समाजाचा मुख्य व्यवसाय शेती आणि बागकाम आहे.
  • अनेक वर्षांपासून हा समाज फळे, फुले आणि भाज्यांची लागवड करत आहे.

संस्कृती:

  • माळी समाजाची स्वतःची अशी वेगळी संस्कृती आहे.
  • त्यांचे पारंपरिक नृत्य, संगीत, आणि लोककला आहेत.
  • हा समाज विविध प्रकारची सण आणि उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतो.

व्यवसाय:

  • माळी समाजाचा मुख्य व्यवसाय शेती आहे.
  • ते विविध प्रकारची पिके घेतात आणि ती बाजारात विकतात.
  • आजकाल माळी समाज शिक्षण आणि इतर व्यवसायांमध्येही पुढे आहे.

लोकसंख्या:

  • माळी समाज महाराष्ट्रात मोठ्या संख्येने आहे.
  • महाराष्ट्राव्यतिरिक्त, हा समाज भारत देशातील इतर राज्यांमध्येही आढळतो.

महत्व:

  • माळी समाजाने शेतीच्या क्षेत्रात खूप मोठे योगदान दिले आहे.
  • या समाजाने फळे, फुले आणि भाज्यांच्या उत्पादनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
  • अनेक समाज सुधारक आणि नेते या समाजात होऊन गेले, ज्यांनी समाजासाठी खूप चांगले काम केले.

माळी समाज हा एक मेहनती आणि प्रामाणिक समाज आहे. त्यांनी नेहमीच आपल्या कामातून देशाच्या विकासात मदत केली आहे.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 5240