स्वभाव
मानसशास्त्र
सामाजिक_विचार
मानसिक स्वास्थ्य
मला कोणाला कमी लेखायच नाही पण असं म्हणतात की, बाई अडाणी असो किंवा शिकलेली असो , दोघींची डोकी सारखीच चालतात, एका मर्यादेच्या बाहेर त्यांची विचार क्षमता नसते, हे खरं आहे का ?
2 उत्तरे
2
answers
मला कोणाला कमी लेखायच नाही पण असं म्हणतात की, बाई अडाणी असो किंवा शिकलेली असो , दोघींची डोकी सारखीच चालतात, एका मर्यादेच्या बाहेर त्यांची विचार क्षमता नसते, हे खरं आहे का ?
8
Answer link
नाही,प्रथम हा गैरसमज आपल्या डोक्यातून काढून टाका व एकाच तराजूत तोलण्याचा प्रयत्न करु नका.आपल्या भारत देशामध्ये अशा कितीतरी महीला आहेत त्या प्रत्येक क्षेत्रात आपले वरचस्य दाखवित आहेत उदाहरणार्थ ,औद्योगिक ,सामाजिक ,क्रीडाक्षेत्रात,कला ,नाट्य ,राजकारण ,विज्ञान या मध्ये काम करीत आहे खरोखर एक स्त्री शिकली तर एक कुंटूब सुशिक्षित होते .एक कुटूंब शिक्षित असेल तर एक गाव सुशिक्षित होते अशी साखळी आहे या प्रमाणे संपुर्ण देश साक्षर होवू शकतो केवळ एका सुशिक्षित बाईमुळे होऊ शकतो ,आपला देश पुरुष प्रधान आहे म्हणून बाईला कमी लेखण्याचा प्रयत्न फार जुन्या कालापासून चालत आला आहे. चुल आणी मुल याच चौकटीत ठेवले आहे ही मानसिकता बदलायला पाहीजे ...स्त्रीला आदर द्यायला पाहीजे ...धन्यवाद
1
Answer link
नाही. हा तुमचा गोड गैरसमज आहे. तो सर्वात पहिल्यांदा मनातून कायमचा काढून टाका. पुरुषांच्या मनातील न्यूनगंड आहे. स्त्री शिकली तर घरदार शिकेल. कर्तृत्ववान पुरुषांमागे एक स्त्री असते. हे कायमचे लक्षात ठेवा. आपल्या पेक्षा त्यांच्यात सहनशीलता जास्त असते. स्त्री यांना कमीपणा देणे, हा आपला मी पणा आहे. ती स्वतः पेक्षा इतरांचा विचार जास्त करत असते. शिको अगर न शिको धन्यवाद.