MPSC - राज्य लोकसेवा आयोग शब्द सामाजिक समस्या महिला समस्या

महिलांसमोरील आव्हाने या विषयावर राज्यसेवेसाठी ४०० शब्दांचा निबंध लिहून पाठवा?

3 उत्तरे
3 answers

महिलांसमोरील आव्हाने या विषयावर राज्यसेवेसाठी ४०० शब्दांचा निबंध लिहून पाठवा?

6
21व्या शतकातील स्त्रियांसमोरील आव्हाने!



शीर्षकावर नजर टाकल्यावर कदाचित हा एक गैरसमज होण्याची भीती नाकारता येत नाही की, आजवरच्या स्त्रीपुढील आव्हानं ही तिच्या आताच्या आव्हानांपेक्षा खूप वेगळी आहेत, पण तसं अजिबात नाही. बारकाईनं विचार केल्यास हे आपल्या लक्षात येईल की काळानुरूप ती स्वतः:ला बदलवत गेली तरी तिच्या मूळ आव्हानांत वाढच झालीय. 

हो! तुमची चढलेली भुवई, हे काय भलतंच! हा डोळ्यातला भाव पाहून ही, मी पुन्हा हेच म्हणेन की, तिच्या मूळ आव्हानांत वाढच झालेली आहे. नाही पटत! ठिकय! चला, बघूयात आपण. 

पूर्वीच्या काळी स्त्री ही उपभोग्य वस्तू, तिचा उपभोग घेणे हा पुरुषाचा मूलभूत हक्क. हा हक्क बजावण्यासाठी पुरुषजात कधीही, केव्हाही, कुठेही तत्पर असलेली. आपणास दिसून येते. पण - परिणाम? भोगायचे ते फक्त स्त्रीनेच. त्या परिणामातून उत्पन्न अन्य बाबींची जबाबदारी, फक्त आणि फक्त स्त्रीचीच. त्यासाठी शारीरिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक कुचंबणा पण फक्त तिचीच. आजही तिच्या या स्थितीत फारसा फरक नाही, तथाकथित शिक्षित, पुरोगामी समाज व अत्याधुनिक गर्भनिरोधकाच्या सोयी, सवलती असून सुद्धा स्वत:चा बचाव, पुरषाची मानसिकता मुळातूनच संस्कार, विचारानं बदलवण्याच आव्हान म्हणूनच पुरातन ही, पुरोगामी ही. 

आता बघूयात शिक्षणाकडे, प्राथमिक शिक्षणाचा हक्क मूलभूत आहे, पण निम्नस्तरातील मुलींना आईला घरकामात मदत, भावंड सांभाळण्याची जबाबदारी यामुळे त्यापासून वंचित राहावे लागते. मध्यमवर्गियात पण या बाबतीत तिला दुय्यम स्थानच. हे माहीत असूनही, ती झगडतेय, स्वत:ला शिक्षित करून घेण्यासाठी, सिद्ध करण्यासाठी. आपल्या परीनं उपलब्ध शासनमान्य सोयी सवलतींची माहिती घेण्याचा प्रयास करतेय. या आव्हानाला पेलण्यासाठी तिला सबंधितांनी मदत केली पाहिजे. म्हणजे पालक, शिक्षक, ग्रामसेवक, प्रसारमाध्यम, सामाजिक संस्था, कार्यकर्ते इत्यादीने.


स्त्रीसाठी 30% राखीव जागा ज्या आहेत त्याचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी स्वत:ला समर्थ केले पाहिजे हे आव्हान. 100%आरक्षणासाठी, सर्वंकष प्रयत्नांच आव्हान हे ही आहेच. 

आज कायद्यात तिच्यासाठी अनेकानेक चांगल्या तरदूती असलेल्या कागदावरती तरी आपणास दिसतात. पण त्याची समग्र माहिती, त्याचा उपयोग करून घेण्यासाठीची स्वत:ची मानसिकता तिला तयार करावयाची आहे. या बाबत तिचा आत्मविश्वास जगवायचं काम सामाजिक संस्था, कार्यकर्ते, कायदातज्ञांनी स्वत:ला झोकून देऊन केला पाहिजे. 

अन्यायग्रस्त महिलेचा पाठीशी केवळ तिच्या पालकांनीच नव्हे तर सर्व सखींनी, समाजाने उभं राहावे अस तिला वाटत असले, ते संस्कार रुजवण्याचं कामही तिलाच करावं लागणार आहे. न कंटाळता, अतीव धीरानं, कारण - हे बदल पटकन होणार नाहीत. हा अन्याय शारीरिक, आर्थिक, मानसिक, सामाजिक, कौटुंबिक, भावनिक सुद्धा असणार आहे. हे आव्हान हिमनगासारखे, 1/3 भाग यातला दिसणारा. प्रत्यक्षात किती खोल याचा अंदाज करणे कठिणच. 

स्वसंरक्षणासाठी तिला शारीरिक दृष्ट्या स्वत:ला फिट ठेवलंच पाहिजे. त्यासाठी जूडो, कराटे, लाठी शिक्षण. उपलब्ध सुविधांचा सुयोग्य, समयोचित वापर करणे. उदा: त्रास देणाऱ्या गुंडाविषयी, फोन वरून चटकन पालक, दक्षता समिती व पोलिस ठाण्यास माहिती देणे. स्वत:च्या पोशाख, हावभाव, आचरणातून चुकीचा संदेश जाणार नाही, याची काळजी घेणे. एकटीने प्रवास, वास्तव्य करताना आवश्यक ती काळजी घेणे. MM Sचे बळी तर होत नाहीत ना? याबाबत दक्ष राहणे. नोकरीच्या ठिकाणी स्वत:च्या हक्काविषयी, अधिकाराविषयी माहिती घेणं, जागरूक राहणं, स्वत:ला अपडेट करणं आव्हानच नं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज तिच अस्तित्वच चहू अंगाने नाकारायचा जो सर्वतोपरी प्रयत्न चाललाय, तो नेटानं नेस्तनाबूत करायचा. यामध्ये पुराणकालीन दाखले देणं. उदाहरणार्थ संकटकाळी देवांनी सुद्धा मोहिनी रूप म्हणजे स्त्री रूप घेऊन दुष्टांचा नाश केला. देवाला, संतांना माउली म्हणून हाक, जन्मदात्रीच महत्त्व, इंदिरा गांधी, लता मंगेशकर, पी. टी उषा, कल्पना चावला, इंद्रा नूयी, चंदा कोचर, मेधा पाटकर, मनीषा म्हैसकर, तेजस्वींनी, शीतल महाजन, किरण बेदी, सिंधुताई सकपाळ आदी कन्या घराण्याचा दीपिका म्हणून प्रकाशित, त्यासाठी दिव्यांची (कुलदीपक) गरज नाही. यात डॉक्टरांची भूमिका सर्वात महत्त्वाची. जनमत जागरण ही आवश्यकच. 

आज करियर घडविण्यासाठी ती धडपडतेय. निरनिराळ्या क्षेत्रातल्या संधी, दोन्ही हात पसरून तिला बोलावताहेत. वर उल्लेखित कन्यकांमुळे तिलाही वाटतंय I Can do it नव्हे I must do it. पण पुन्हा पुरूषप्रधान समाज, संस्कार, कुटुंबसंस्थेतील तिचा सहभाग, दुय्यम स्थान, ह्या शिवाय आपण ही काही क्षणांसाठी लहान मूल व्हावं. इतरांनी यांत पालक, भावंड, मित्रमैत्रिणी, सहचराने आपले लाड पुरवावे. ही नैसर्गिक ऊर्मी, मुळातच भावनाशील पिंड, मातृत्वाची ओढ, मानसिक, शारीरिक आधाराची ओढ... करियर साठी या साऱ्यांवर पाणी सोडायचं? कसावीस होतेय ती. घालमेल होतेय तिच्या जीवाची, कसा साधायचा समतोल? हे ही आव्हानंच न? 

शिक्षणानं, आर्थिक स्वातंत्र्यानं, तिला विचाराचं बळ दिलंय, संपूर्ण नाही पण काही निर्णय ती स्वत: ठामपणे घेण्याचा प्रयत्न करतीय. त्या बदलत्या सामाजिक परिस्थितीमुळे, सीमित कुटुंबामुळे आजही मुलींनी आईवडीलाचं घर सोडून सासरी राहणे समाजमान्य असल्याने, आपल्या आजारी आईबाबांची आर्थिक काळजी, वृद्धत्वात आधार-शाब्दिक, मानसिक, शारीरिक, सामाजिक हो! अगदी आर्थिक सुद्धा! घेण्याच आव्हान तिच्या पुढं आहे. यात तिला संनांधितांची साथ मिळेलच याची खात्री आपण ठामपणे देऊ शकत आही. कारण पुन्हा पुरूषप्रधान संस्कृती. पण हे शिवधनुष्य ती पेलतीय. आपण यात तिला मानसिक, सामाजिक आधार देऊन सक्षम करूयात. 

केवळ आधुनिक भैतिक सुखसुविधा, जीवनशैली, वस्त्रप्रावरण यांचा अंगिकार नव्हे तर स्वत्व, सत्त्व टिकवण्यासाठी आवश्यक विचारांना आपलंसं करण्याच आव्हान ही तिच्यासमोर ठाकलंय. 

पर्यावरण रक्षण, प्रदूषण, जलसंरक्षण या सारखी ही आव्हानं तिचा पाठलाग करताहेत. आपल्या व्यवस्थापनाच्या अंगभूत गुणानं हसवायचंय यांनाही- भारत महासत्ता बनू पाहतोय. पण त्यासाठी आवश्यक सशक्त, सक्षम, संस्कारित, सुशिक्षित युवापिढी घडवण्याच आव्हान तिला पेलायचंय. 

या सर्व बाबींचा विचार केला तर तिला खरोखरच अष्टभुजा दुर्गेचा रूप घ्यायचा आहे. मला वाटत, हे सावित्रीबाईंच्या डोळ्यातलं स्वप्न वास्तवात उतरताना, हळूवारपणे पूर्णत्वास येताना जाणवत आहे. आपण, आपल्या परीनं खारीचा वाटा उचलूया. 

जय हिंद! जय महाराष्ट्र! जय स्त्री शक्ती!
उत्तर लिहिले · 2/10/2018
कर्म · 2630
0
मो.नं. 7972741827
मी MPSC साठी Online class चालू केला आहे. तो सर्व विद्यार्थ्यांपर्यंत कमी खर्चात पोहोचवण्यासाठी काय करावं. कारण आम्ही सर्वात स्वस्त फक्त Rs 1300 मध्ये 18 Month साठी उपलब्ध करून देत आहोत. आणि Class Join विद्यार्थ्यांना कुठलेही पुस्तक/वर्तमानपत्र/मासिके घ्यायची गरज पडत नाही.
उत्तर लिहिले · 6/10/2019
कर्म · 1040
0

परिचय: आजच्या आधुनिक युगात महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, राजकारण, समाजकारण अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. असे असले तरी, आजही महिलांना अनेक प्रकारच्या आव्हानांना तोंड द्यावे लागते.

सामाजिक आव्हाने: भारतासारख्या देशामध्ये आजही अनेक ठिकाणी महिलांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते. बालविवाह, हुंडाबळी, भ्रूणहत्या, लैंगिक शोषण, कौटुंबिक हिंसा यांसारख्या अनेक समस्या आजही महिलांसमोर आहेत. शिक्षण आणि रोजगाराच्या संधींपासून वंचित ठेवले जाते.

आर्थिक आव्हाने: महिलांना पुरुषांच्या तुलनेत कमी वेतन दिले जाते. अनेक ठिकाणी महिलांना समान कामासाठी समान वेतन मिळत नाही. तसेच, महिलांना मालमत्तेचा अधिकार नसल्यामुळे आर्थिकदृष्ट्या त्या पुरुषांवर अवलंबून असतात.

राजकीय आव्हाने: राजकारणात महिलांचे प्रतिनिधित्व अजूनही कमी आहे. निवडणुकीत महिलांना उमेदवारी मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. तसेच, राजकारणात सक्रिय असलेल्या महिलांना अनेकदा सामाजिक आणि राजकीय दबावांना तोंड द्यावे लागते.

आरोग्यविषयक आव्हाने: ग्रामीण भागामध्ये आजही महिलांना आरोग्य सुविधा सहज उपलब्ध होत नाहीत. कुपोषण, रक्तक्षय, प्रसूतीदरम्यान होणारे त्रास अशा अनेक समस्यांमुळे महिलांचे आरोग्य धोक्यात येते.

निष्कर्ष: महिलांसमोरील आव्हानांचा सामना करण्यासाठी समाजाची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. महिलांना शिक्षण, रोजगार आणि राजकारणात समान संधी मिळायला हव्यात. तसेच, महिलांच्या आरोग्याची काळजी घेणे आणि त्यांना सुरक्षित वातावरण देणे आवश्यक आहे.

उपाय:

  • शिक्षणाचे महत्व: महिला शिक्षणाचे महत्व समाजात वाढवणे.
  • कायदेशीर संरक्षण: महिलांसाठी असलेल्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे.
  • आरोग्य सुविधा: ग्रामीण भागांमध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध करणे.
  • समान संधी: महिलांना प्रत्येक क्षेत्रात समान संधी देणे.

अखेरीस, महिला सक्षमीकरणामुळेच एक सशक्त समाज निर्माण होऊ शकतो.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 5240

Related Questions

भारतीय महिलाविषयक सामाजिक समस्या व तरतुदी काय आहेत?
महिला समस्या सामाजिक आहे का?