दिनविशेष दिनदर्शिका पक्षी पर्यावरण

जागतिक चिमणी दिवस कधी साजरा केला जातो?

6 उत्तरे
6 answers

जागतिक चिमणी दिवस कधी साजरा केला जातो?

5
२० मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिन (world sparrow day) म्हणून 
साजरा केल्या जातो. पहिला जागतिक चिमणी दिवस – २० मार्च २०१० रोजी साजरा केल्या गेला.

भारतात सर्वात जास्त संख्येने असणारा पक्षी म्हणून चिमणी परिचयाची आहे. नर चिमणीच्या कपाळाचा, शेपटीवरचा आणि पार्श्वभाग राखाडी, कानाजवळ पांढरा, चोच काळी, कंठ ते छातीच्या भागावर मोठा काळा भाग, डोक्यापासून खाली पोटाचा भाग पांढरा असून पाठीवर तपकिरी काळ्या तुटक रेषा असतात. मादी मातकट तपकिरी रंगाची असून तिच्या अंगावर काळ्या तपकिरी रंगाच्या तुटक रेषा असतात. तिची चोच फिकट तपकिरी रंगाची असते. हा पक्षी हिमालयाच्या २००० मी. उंचीपर्यंत भारतभर सर्वत्र आढळतो तसेच बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमारसह इतरही देशात आढळतो. भारतात काश्मिरी आणि उत्तर-पश्चिमी अशा याच्या किमान दोन उपजातीही आढळतात.

माणसाच्या अगदी जवळच राहणारा हा पक्षी असून कीटक, धान्य, मध, शिजवलेले अन्न असे सर्व प्रकारचे खाद्य खाते.. विणीचा हंगाम वर्षभर असू शकणारा पक्षी अशी ओळखही या पक्ष्याची आहे. गवत, कापूस, पिसे, मिळतील त्या वस्तू वापरून घराचे छत, वळचणीच्या जागा, दिव्यांच्या मागे, झाडांवर असे कुठेही घरटे बांधतो. मादी फिकट हिरव्या पांढर्‍या रंगाची, त्यावर तपकिरी ठिपके असलेली ४ ते ५ अंडी देते. अंड्यांच्या रंगात स्थानिक बदलही आहेत. नर-मादी घरटे बांधण्यापासून, अंडी उबविणे, पिलांना खाऊ घालणे वगैरे सर्व कामे मिळून करतात.
उत्तर लिहिले · 1/10/2018
कर्म · 2630
3


​🐦 चिऊताईला  चिमणी दिनाच्या शुभेच्छा !


_कधी काळी चिमण्यांच्या चिवचिवाटाने होणारी घराघरातील सकाळ आता केवळ आठवणीतील एक अनुभूती झाल्याची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर चिमण्यांचे संरक्षण आणि त्याविषयीच्या जागृतीसाठी 20 मार्च हा दिवस ‘जागतिक चिमणी दिन’ साजरा केला जातो._


🗓 आज 20 मार्च जागतिक चिमणी दिन. अस पाहिल तर  प्रत्येकाच्या  बालपणाशी चिऊताई जोडली गेलेली आहे. म्हणूनच ती आजही  जवळची वाटते.

💫 वाढत्या आधुनिकीकरणामुळे तिच शहरात दिसणंच कमी झालय. त्यामुळे आज पुन्हा तिने शहरात भिरक्या माराव्या असेच वाटते.

🏚 या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे आपुल्या

🎼 हे गाणे आजच्या परिस्थितीला अनुसरून आहे कि काय असेच वाटेत. काळाच्या ओघात चिमण्यांची संख्या झपाट्यानं घटत आहे. तसेच चिमण्यांचा चिवचिवाट कानी पडणे दुर्मिळ झाले.

🎑 पुढच्या पिढीला चिमणी फक्त चित्रांमध्येच दिसणार की काय अशी परिस्थिती निर्माण झालीय.

🏯 खरतर  शहरातील चिमण्याचा वावर नसेन यामागचे कारण  म्हणजे वाढते आधुनिकरण त्यात वृक्ष तोडून उभारलेल्या गगनचुंबी इमारत्या तसेच  मोबाइल टॉवरची प्रारणे अशी एक ना अनेक कारणामुळे  तिने आपला नवीन विश्व बनवलय. आणि तिथे वास्तव करायला सुरु केलाय.

🎊 हि परिस्थिती गेल्या काही वर्षापासून निर्माण झालीय. या चिमण्यांनी परत शहराकडे फिरकावं यासाठी २०१० सालापासून हा ‘वर्ल्ड स्पॅरो डे’ साजरा केला जाऊ लागलाय. त्याचेच फलश्रुत काहींनी आपल्या गगनचुंबी इमारतीत त्याचसाठी छोटे घरटे बांधण्यास सुरुवात कॆलीय.कुठेतरी हि संकल्पना चिमण्यांसाठी दिलासादायक ठरतेय.

_आजच्या जागतिक चिमणी दिनाच्या निमित्ताने प्रत्येकाने आपल्या बागेत, परसात जर त्यांच्या खाद्याची व्यवस्था केली तर आपल्याला चिमण्या दिसू लागतील. याचा अर्थ असा नाही की, आज आपण ‘बर्ड फिड’ ठेवले आणि उद्या लगेच 10-12 चिमण्या दिसतील लागल्या. चिमणीलाही ती सवय होण्यासाठी वेळ द्यावा लागतो. मात्र, यासाठी गरज आहे ती आपल्या इच्छाशक्तीची. आपण चिमण्यांसाठी काय करू शकतो? ते पाहूया…_

▪ _फ्लॅट, घराच्या टेरेसवर, खिडकीत चिमण्यांसाठी दाणा-पाणी ठेवा. चिमण्यांना पाण्यात खेळायला प्रचंड आवडते._

▪ _घरात काही वस्तूंची (बूट, चप्पल इत्यादी) रिकामी खोकी पडलेली असतात. त्यांना चिमण्या आत जाईल, असे भोक पाडून, घराबाहेर खिडकीच्यावर उंच जागेवर टांगले तर तेथे चिमण्या घरटे करतील._

▪ _शीतपेयांच्या रिकाम्या बाटल्यांपासून त्यांना खाद्य भरवायचे फिडर बनवू शकतो._

▪ _घराजवळच्या मोकळ्या भूखंडावर, कॉलनीतील रस्त्यांच्या कडेला लहान झुडुपवर्गिय रोपांची लागवड करा. व संवंर्धन करा._

▪ _चिमण्यांसाठी नैसर्गिक अधिवास उपलब्ध करून देण्यासाठी बाभूळ वृक्षाची लागवड व संवर्धन करा. यावर चिमण्यांचा अधिवास मोठ्या प्रमाणात आढळून येतो. बाभूळावर त्या आनंदाने वास्तव्यास असतात._

▪ _घराच्या टेरेस, बाल्कनीत कुंड्यात जेथे झाडे लावलेली आहेत अशा जागी बर्ड फिडर लावा. चिवचिवाटाने भकास, ओसाडपणा जाऊन जागेच्या सौंदर्यात भरच पडेल._

हा व्हिडीओ अवश्य पहा
https://youtu.be/bhdN_FbLnMo
उत्तर लिहिले · 20/3/2019
कर्म · 569225
0

जागतिक चिमणी दिवस दरवर्षी २० मार्च रोजी साजरा केला जातो.

हा दिवस चिमण्या आणि इतर सामान्य पक्ष्यांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी तसेच त्यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना करण्यासाठी साजरा केला जातो.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 980

Related Questions

एका गोगलगाईची तक्रार कुणी व का केली असावी?
पयाावरणीय समस्या स्पष्ट करा.?
भारतात कोणकोणते अभयारण्य आहेत?
हवा हे संसाधन सर्वत्र विपुल प्रमाणात आढळते, चूक की बरोबर?
कोणते उत्पादन वनातून मिळते?
वायु हमारे जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे?
सामाजिक वनीकरण प्रकार स्पष्ट करा?