व्यक्तिमत्व व्यापारी उद्योग यशोगाथा

अंबानींची सक्सेस स्टोरी कोणी सांगेल का?

3 उत्तरे
3 answers

अंबानींची सक्सेस स्टोरी कोणी सांगेल का?

22
एका असामान्य जिद्दीची कहाणी – मुकेश अंबानी

‘Think big, think fast, think ahead. Ideas are no one’s monopoly.’ याचा अर्थ होतो. मोठा विचार करा. लवकर विचार करा आणि दूरचा विचार करा. विचारांवर कोणा एकाची सत्ता नसते. असे यशाचे प्रेरणादायी विचार देणारे भारतातील महान व्यक्तित्व म्हणजे ‘रिलाययन्स’ कंपनीचे संस्थापक मुकेश अंबानी. ज्यांचे संपूर्ण जीवन इतरांसाठी प्रेरणा आहे, अशा मुकेश अंबानींबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

संपूर्ण नाव- मुकेश धीरूभाई अंबानी
पित्याचे नाव – धीरूभाई अंबानी
आईचे नाव – कोकिलाबेन अंबानी
जन्मतारीख – 19 एप्रिल 1957
जन्मस्थान- उदेन (यमन)
पत्नीचे नाव – नीता अंबानी
बहीण-भाऊ-अनिल अंबानी,दीप्ती सलग,ओंकार,नीना

जन्मतःच एक अभूतपूर्व कार्यक्षमता घेऊन आलेले मुकेश अंबानी यांना लहानपणापासूनच मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न करण्याची सवय होती. वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी ते येमेन देशात एका पेट्रोल पंपावर काम करू लागले. त्यापूर्वी ‘बर्माशेल’ नावाच्या कंपनीत ते काम करत असत. ‘बर्माशेल’ सारखी स्वतःची एक कंपनी स्थापन करण्याचे स्वप्न त्यांनी त्यावेळी पाहिले होते. आणि अर्थातच आपल्या अथक प्रयत्नांच्या जोरावर त्यांना ते पूर्ण केले.



१९५८ मध्ये येमेनहून भारतात परतल्यानंतर त्यांनी स्वतःकडील १५,००० च्या रकमेमधून ‘रिलायन्स कमर्शियल कार्पोरेशन (Reliance Commercial Corporation)’ची स्थापना केली. सुरुवातीला कंपनी मसाले आणि अन्य वस्तूंची निर्यात करत असे. काही काळानंतर, सिंथेटीक कपड्यांची वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन, १९६६ साली त्यांनी अहमदाबादजवळील नरोडा येथे कपड्यांची गिरणी म्हणजेच मिल सुरू केली. या मिलने पहिल्याच वर्षी ९ कोटींचा व्यापार करून १३ लाखाचा नफा कमवला.

१९७५ साली ‘रिलायन्स’ ची उलाढाल त्यामानाने कमी होती. तिचे स्वरूप छोट्या कंपनीचेच होते. त्यावेळी भारतातील २४ कपड्यांच्या मिल्सचे परीक्षण करण्यासाठी विश्व बॅकचे शिष्टमंडळ आले होते. त्यांनी रिलायन्स मिलमधील कपड्यांची गुणवत्ता पाहून असा निष्कर्ष काढला की विकसित देशांमध्ये असलेल्या मिल्ससोबत तुलना होऊ शकेल अशी एकच मिल भारतात आहे, ती म्हणजे ‘रिलायन्स मिल.’ यावरूनच गुणवत्तेच्या बाबतीत मुकेश अंबानी पहिल्यापासूनच किती चोखंदळ होते, हे लक्षात येते. इ.स. १९९९-२००० मध्ये रिलायन्सने २५,००० कोटींची गुंतवणूक करून जामनगर, गुजरात येथे जगातील सर्वात मोठी रिफायनरी सुरू केली. हा प्रकल्प जगातील सर्वात मोठ्या प्रकल्पांपैकी एक गणला जातो.
१९७७ साली ‘रिलायन्स’ ने पहिल्यांदा स्वतःसाठी शेअर्स विकून पैसा उभा केला.



१९८२ नंतर तर कंपनीच्या प्रगतीचा आलेख वेगाने वर सरकू लागला आणि अजूनही हा आलेख वर चढतोच आहे. याचे बहुमोल श्रेय जाते मुकेश अंबानी यांच्या कार्यकुशलतेला.मुकेश अंबानी यांना लावलेल्या लहानशा रोपट्याचे रूपांतर एका मोठ्या वटवृक्षामध्ये झाले आहे. साल २०१२ पर्यंत रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये ८५,००० कर्मचारी काम करत होते. केंद्र सरकारच्या संपूर्ण करापैकी ५ टक्के कर फक्त रिलायन्सकडून भरला जात असे. २०१२ साली जगातील सर्वात मोठ्या आणि श्रीमंत म्हणवल्या जाणाऱ्या ५०० कंपन्यांच्या यादीत ‘रिलायन्स इंडस्ट्रीज्’ चा समावेश होता


१९७० ते ८० च्या दरम्यान निंयत्रित अर्थव्यवस्था होती. तेव्हाही ‘रिलायन्स’ मोठी कंपनी म्हणून विस्तारत होती. १९९१ नंतर मुक्त अर्थव्यवस्थेमुळे तर रिलायन्स उद्योगाच्या क्षेत्रात मोठ्या वेगाने धावू लागली. पेट्रोकेमिकल्स, ऑईल, रिफायनरी, तसेच दूरसंचार, वीज उत्पादन, रस्ते बांधकाम, बंदर, गॅस पाईप लाईन अशा जवळ जवळ सर्वच क्षेत्रात रिलायन्सने आपले पाय भक्कमपणे रोवले आहेत.


बहुराष्ट्रीय कंपन्यांशी असलेल्या स्पर्धेमध्ये भारतीय कंपन्या टिकू शकतात आणि यशस्वीही होऊ शकतात, हा विश्वास भारतीय उद्योजकांमध्ये निर्माण करण्यामागे मुकेश अंबानी यांचा फार मोठा हात आहे.

आपल्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी रिलायन्स आणि पर्यायाने विकसित भारतासाठी मोठी स्वप्ने पाहिली आणि ती प्रत्यक्षात खरी करून दाखवली.
उत्तर लिहिले · 31/8/2018
कर्म · 115390
14
देशातील आघाडीचे उद्योजक राहिलेले धीरजलाल ऊर्फ धीरूभाई हिराचंद अंबानी. 28 डिसेंबर 1932 रोजी धीरुभाईंचा जन्म गुजरात राज्यातील सौराष्ट्रच्या जुनागढ जिल्ह्यातील चोरवाड गावी झाला. त्यांचे वडील हिराचंद गोवर्धनदास अंबानी हे प्राथमिक शाळेत शिक्षक होते तर आई जमनाबेन या गृहिणी होत्या.

धीरूभाई हे आपल्या पाच भावंडातले मधले अपत्य. धीरूभाई शिक्षणात सर्वसामान्य विद्यार्थी होते. त्यांचे इंग्रजीचे ज्ञान चांगले तर गणित कच्चे होते. 1949 मध्ये आपले 10 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून धीरूभाई नोकरीच्या शोधात एडन येथे गेले. तेथे बर्मा शेल कंपनीची उपकंपनी म्हणून काम करणाऱ्या ए.बेस नावाच्या कंपनीत धीरूभाई मासिक 300 रुपये पगारावर पेट्रोल पंपावर नोकरी केली. ही कंपनी छोट्या मोठ्या अनेक उद्योगांमध्ये कार्यरत होती. आंतरराष्ट्रीय कंपनीचा भाग असल्याने तेथे अनेक देशांचे व्यापारी येत असत.

धीरूभाई यांनी तिथेच स्वतःची रिफायनरी स्थापन करावी, असे स्वप्न पाहण्यास सुरूवात केली आणि आज त्यांची स्वत:ची सगळ्यात मोठी खासगी रिफायनरी आहे. पुढे धीरूभाई यांनी व्यावसायिक हुशारीने गरिबीतून वर येऊन त्यांनी आपल्या चुलतभावासोबत रिलायन्स उद्योग समूह स्थापला. 1977 साली सार्वजनिक घोषित केलेल्या रिलायन्स कंपनीचा देशासह विदेशात विस्तार झाला आहे. धीरुभाईंच्या जीवनावर 'गुरु' हा सिनेमा बनवण्यात आला आहे.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लीक करा.
https://www.inmarathi.com/the-story-of-business-tycoon-dhirubhai-ambani/
उत्तर लिहिले · 13/11/2018
कर्म · 458580
0

रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) संस्थापक धीरूभाई अंबानी (Dhirubhai Ambani) यांच्यापासून सुरू झालेला हा व्यवसाय मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी यशस्वीपणे पुढे नेला. त्यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्सने अनेक मोठे प्रकल्प हाती घेतले आणि ते पूर्ण केले.

धीरूभाई अंबानी:

  • १९५८ मध्ये धीरूभाई अंबानी यांनी मसाले आणि पॉलिस्टरचा व्यवसाय सुरू केला.
  • १९६६ मध्ये त्यांनी रिलायन्स टेक्सटाईल्सची (Reliance Textiles) स्थापना केली.
  • १९७७ मध्ये रिलायन्सचा IPO (Initial Public Offering) आला आणि कंपनीने मोठी वाढ केली.

मुकेश अंबानी:

  • मुकेश अंबानी यांनी १९८१ मध्ये रिलायन्समध्ये (Reliance) सहभाग घेतला.
  • त्यांनी कंपनीला पेट्रोकेमिकल्स (petrochemicals), टेलिकॉम (telecom) आणि रिटेल (retail) क्षेत्रात विस्तारण्यास मदत केली.
  • २००२ मध्ये धीरूभाई अंबानी यांच्या निधनानंतर, मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजची धुरा सांभाळली.
  • २०१६ मध्ये रिलायन्स जिओ (Reliance Jio) सुरू करून त्यांनी भारतीय दूरसंचार क्षेत्रात क्रांती घडवली.

मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स इंडस्ट्रीजने जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांमध्ये स्थान मिळवले आहे.

अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 5240

Related Questions

यवतमाळ जिल्ह्यातील चांगल्या शाळेची यशोगाथा?
दोन मराठी उद्योजक भावांच्या 'क्विकहील'ची कहाणी?
शून्यापासून विश्व निर्माण करणार्‍या मराठी माणसाची सक्सेस स्टोरी?