भारत सामान्य ज्ञान भारतीय स्वातंत्र्य दिन इतिहास

स्वतंत्र दिन आणि प्रजासत्ताक दिन याची पूर्ण माहिती मिळेल का?

3 उत्तरे
3 answers

स्वतंत्र दिन आणि प्रजासत्ताक दिन याची पूर्ण माहिती मिळेल का?

3
🧐 _*प्रजासत्ताक म्हणजे नक्की काय?*_



26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. पण प्रजासत्ताक म्हणजे नक्की काय? 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन का म्हणले जाते? याचे उत्तर अनेकांना बहुदा माहिती नसते. चला तर आज जाणून घेऊयात याबद्दल सर्वकाही...


🤔 *प्रजासत्ताक म्हणजे नक्की काय?* : प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता असणे होय. आणि प्रजासत्ताक दिन म्हणजे प्रजेची सत्ता स्थापन झाली तो दिवस.

पण प्रजेची सत्ता स्थापन होणे म्हणजे काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर प्रजेची सत्ता स्थापन होणे म्हणजे अशी लोकशाही स्थापन करणे जिथे प्रजा हीच राजा असेल. प्रजेच्या हिताचे राष्ट्र उभारणे आणि देश कोणी चालवायचा?, देशाचा कारभार कसा चालायला हवा? कोणते कायदे बनवायला हवेत? हे सार प्रजाच ठरवत असते.

🇮🇳 *26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन का म्हणले जाते?* : 26 जानेवारी 1950 या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले भारतीय संविधान आपण स्वीकारले आणि देशाचा कारभार कोण आणि कसा चालवणार? देशाचे कायदे काय असावेत हे ठरवले. संविधान भारतीय जनतेला मध्ये ठेवूनच लिहिले गेले आणि म्हणूनच 26 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय सन म्हणून देशभर साजरा केला जातो.

🇮🇳 _*26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून का साजरा केला जातो?*_

▪ _26 जानेवारी 1950 रोजी आपण भारतीय संविधानाचा स्वीकार केला आणि त्याची आठवण म्हणून आपण तेव्हापासून तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो._

▪ _प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधानाचा स्वीकार करून आपण प्रजेची सत्ता स्थापन केली असे मानले जाते._

▪ _डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले भारतीय संविधान स्वीकारून आपण भारताला लोकशाही राष्ट्र म्हणून स्वीकारले._

▪ _तसे पहिले तर संविधान बनवण्याचे काम अनेक वर्ष सुरु होते. मात्र 26 जानेवारी 1950 या दिवशी भारतीय संसदेमध्ये संविधान स्वीकारण्यात आले._

▪ _15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून आपण साजरा करतोच. पण त्याचसोबत आपण ज्या दिवशी देशाचा कारभार, कायदे हे सार कसे चालणार हे ठरवलं आणि लोकशाहीचा स्वीकार करत संविधान स्वीकारले तो दिवशी तितकाच महत्वाचा आहे. आणि म्हणूनच 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो._


📓 इतिहास

◼ भारतावर सन 1770 पासून इंग्रजांचे राज्य होते. 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. तर त्यानंतर 20व्या शतकात महात्मा गांधी ह्यांनी अहिंसेच्या मार्गाने 'चले जाओ आंदोलन' आणि अशी अनेक आंदोलने केली होती.

◼ दरम्यान, 1929 साली लाहोरच्या सत्रात काँग्रेसने 'संपूर्ण स्वराज्या'ची घोषणा केली. त्यावेळी त्यांनी २६ जानेवारी ही तारीख भारताचा स्वातंत्र्य दिन असेल अशी घोषणा केली होती.

◼ 1930 साली काँग्रेसने निवडणुका जिंकल्या व त्यानंतर संपूर्ण स्वराज्यासाठी सर्व नेत्यांनी असहकार आंदोलन केले.

◼ 1940 साली मुस्लिम कार्यकर्ते हे मुख्य प्रवाहापासून वेगळे झाले व त्यांनी ‘ऑल इंडिया मुस्लिम लीग’ची स्थापना केली.

◼ दुसऱ्या महायुद्धानंतर भारतावरचे राज्य व युद्धे हे सांभाळता येणार नाही असे ब्रिटिशांना लक्षात आले होते. तर भारतीय क्रांतिकारांचा जोर ही वाढला होता. त्यामुळे ब्रिटनच्या पंतप्रधानांनी भारताला 1948 साली स्वातंत्र्य देण्याती हमी दिली होती. त्यांनतर अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत पूर्णपणे स्वतंत्र झाला.

◼ स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होण्याचा मान जवाहरलाल नेहरू यांना मिळाला होता. तर पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद हे होते. तसेच रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले ‘जन गण मन’ हे भारताचे राष्ट्रगीत म्हणून पूढे आले. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेले ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत म्हणून ठरविण्यात आले.

◼  भारतात सर्व ठिकाणी स्वातंत्र्य दिनाची सार्वजनिक सुट्टी दिली जाते. सर्व शाळा, महाविद्यालये- कार्यालयांमध्ये ध्वजारोहण व ध्वजवंदन असते. भारताचे पंतप्रधान हे दरवर्षी लाल किल्ला येथे ध्वजारोहण करतात व भाषणही देतात.

__________________________________________
*_🇮🇳स्वातंत्र्यदिनी झेंडा फडकवणार आहात?... पण, 'हे' नियम ठाऊक आहेत का?_*


_73 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाची मूल्ये सांगणारा तिरंगा प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची भावना निर्माण करतो. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे बळकट लोकशाहीचे विचार रूजविणारा तिरंगा स्वातंत्र्यदिनी प्रत्येकाच्या हातात अभिमानाने मिरवला जातो. राष्ट्रध्वजातील रंगांचा अर्थ, हा झेंडा कसा तयार झाला?, झेंडा फडकवताना कोणते नियम आहेत हे जाणून घेऊया...._

🤔 _*🇮🇳 राष्ट्रध्वज असा बनला*_

💫 _भारतीय राष्ट्रध्वजाचा प्रवास हा 1921 साला पासूनच चालू झाला आहे. त्यावेळी भारतीय ध्वज पिंगली वैंकय्या यांनी तयार केला होता. त्या ध्वजामध्ये चरख्या, लाल आणि हिरवा रंग होता. त्यानंतर 1931 साली राष्ट्रीय ध्वज तयार केले होते. हा ध्वज तयार करण्यासाठी एक प्रस्ताव पारित करण्यात आला होता. मात्र, गांधीजींच्या संशोधनानंतर त्यात केसरी, पांढरा, हिरवा रंग आणि चरख्याच्या जागी अशोक च्रक ठेवण्यात आले व अखेर 22 जुलै 1947 रोजी भारताचा राष्ट्रध्वज निश्चित करण्यात आला._
राष्ट्रध्वज कसा व कोठे बनतो?
या बद्दल माहितीसाठी खालील लिंक उघडा.

https://www.facebook.com/238044912896496/posts/2621553224545641/?sfnsn=scwspmo
*_🇮🇳राष्ट्रध्वजातील रंगांचा अर्थ_*
◼भगवा किंवा केशरी हे त्याग आणि धैर्याचं प्रतीक आहे.

◼पांढरा प्रकाश, शांती आणि सत्याची भावना व्यक्त करणारा आहे.

◼हिरवा समृद्धी आणि निसर्गाचे भूमीशी असलेले नाते व्यक्त करणारा रंग आहे.

◼झेंड्यातील मधले निळे अशोकचक्र हे सागराची अथांगता आणि कालचक्राचे द्योतक आहे. हे अशोकचक्र म्हणजे जगाला विश्वशांतीचा संदेश देणारे बौद्ध धर्माचे प्रतीक असलेले धम्मचक्र आहे.

उद्या मोठ्या उत्साहाने आणि स्फूर्तीने देशभरात तिरंगा फडकवला जाईल. देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा राष्ट्रीय सण व अन्य महत्त्वपूर्ण दिवशी सन्मानपूर्वक फडकवला जातो.
◼  परंतु अनेकदा चुकून, नकळतपणे आपल्याकडून राष्ट्रध्वजाचा अवमानही होतो. हे टाळण्यासाठी राष्ट्रध्वज नक्की कसा फडकवावा हे आपल्याला माहिती हवे.
*_🇮🇳राष्ट्रध्वजासंबंधी नियम_*
◼भारतीय राष्ट्रध्वजाच्या लांबी व उंचीचे प्रमाण 3:2 असे आहे.

◼राष्ट्रध्वज खादीच्या अथवा रेशमाच्या कापडापासून बनवला जावा असा सरकारी नियम आहे

◼ध्वज फडकवताना तो सगळ्यांना दिसेल अशा सन्मानपूर्वक उच्च स्थानावरून फडकविला जावा

◼ध्वज फडकवताना ध्वजातील केशरी रंगांचा पट्टा हा वरच्या बाजूला हवा.

◼शासकीय इमारतींवर कोणत्याही हवामानात तो सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत फडकत राहावा व सूर्यास्तानंतर उतरविताना बिगूल वाजवून अगदी हळूहळू आदरपूर्वक उतरविला जावा.

◼केवळ प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनादिवशीच तो फुलांच्या पाकळ्या ठेवून फडकविला जातो.

◼राष्ट्रीय ध्वज फडकवताना अथवा उतरवताना उपस्थित नागरिक कवायतीच्या सावधान स्थितीत पाहिजेत.

💁‍♂  *झेंडा फडककावण्याच्या  नियमावली*

🔰   प्लॅस्टिकपासून तयार करण्यात आलेल्या झेंड्यांचा उपयोग करू नये.

🔰   ध्वज संहितानुसार जेव्हा राष्ट्रीय ध्वज फडकविला जातो तेव्हा त्याला सन्मानपूर्वक उच्च स्थान दिले पाहिजे.

🔰   रविवार व अन्य सुटीच्या दिवशीही सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत ध्वज फडकवला गेलाच पाहिजे. प्रतिकूल हवामानातही ध्वज फडकवणे आवश्यक आहे.

🔰   राष्ट्रध्वज नेहमी स्फूर्तीने फडकवला पाहिजे व आदरपूर्वक ध्वज हळूहळू उतरवला गेला पाहिजे.

🔰   ध्वज फडकवताना व उतरवताना बिगूल वाजविलाच पाहिजे.

🔰   कार्यक्रम झाल्यानंतर तेच झेंडे जमिनीवर इतरत्र फेकलेले दिसतात. ते टाळले पाहिजे.

*_💁भारतच नाही तर ‘हे’ देशही 15 ऑगस्टला साजरा करतात स्वातंत्र्य दिन_*


_भारताला स्वातंत्र्य मिळून आता 72 वर्ष पूर्ण होतील. इंग्रजांच्या शेकडो वर्षांच्या गुलामगिरीतून भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. परंतु भारताव्यतिरिक्त असे अन्य 4 देश आहेत जे 15 ऑगस्ट रोजी आपला स्वातंत्र दिन साजरा करतात. या देशांनाही 15 ऑगस्ट रोजीच स्वातंत्र्य मिळालं होतं._

◼दक्षिण कोरियाला जापानकडून 15 ऑगस्ट 1945, रोजी स्वातंत्र्य मिळाले होते.

◼बहरीनला ब्रिटनकडून 15 ऑगस्ट 1971, रोजी स्वातंत्र्य मिळाले होते.

◼कांगोला फ्रान्सकडून 15 ऑगस्ट 1960 रोजी स्वातंत्र्य मिळाले होते.

◼लिकटेंस्टीनला जर्मनीकडून 15 ऑगस्ट 1866 रोजी स्वातंत्र्य मिळाले होते.

*_📍ब्रिटन भारताला 1947 ऐवजी 1948 मध्ये स्वातंत्र्य देऊ इच्छित होता. परंचु माहात्मा गांधी यांच्या ‘भारत छोड़ो आंदोलना’नंतर त्यांनी 1 वर्ष आधीच म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य देण्याचा निर्णय घेतला._*

🕊 *15 ऑगस्टला 'या' पाच देशांचाही स्वातंत्र्यदिन!*


🇮🇳 तुम्हाला माहीत आहे का, की भारतासह आणखी पाच देश 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा करतात... भारतासह या पाच देशांचाही 15 ऑगस्ट या दिवशी स्वातंत्र्यदिन असतो आणि हे देश हा दिवस उत्साहात साजरे करतात...

🔎 *तर कोणते आहेत हे देश, बघूया...*

🇰🇵 *उत्तर कोरिया* :  उत्तर कोरिया या देशाला 74 वर्षांपूर्वी स्वातंत्र्य मिळाले होते. जपानी वसाहतवादापासून 15 ऑगस्ट 1945 लो दक्षिण कोरिया स्वतंत्र झाला. यावर्षी ते 75वा स्वातंत्र्यदिन साजरा करतील.

🇰🇷 *दक्षिण कोरिया* : उत्तर कोरिया प्रमाणेच 15 ऑगस्ट 1945मध्ये दक्षिण कोरियाला स्वातंत्र्य मिळाले होते. जपानी वसाहतवादातून ते 74 वर्षांपूर्वी मुक्त झाले होते, त्यामुळे ते या 15 ऑगस्टला 75वा स्वातंत्र्यदिन साजरा करतील.

🇨🇩 *रिपब्लिक ऑफ कोंगो* : मध्य अशियात असणारा कांगो हा देशही 15 ऑगस्टला स्वतंत्र झाला होता. रिपब्लिक ऑफ कांगो या देशाला 15 ऑगस्ट 1960मध्ये स्वातंत्र्य मिळाले होते. त्यामुळे यंदाच्या वर्षी हा देश 60वा स्वातंत्र्यदिन साजरा करेल

🇱🇮 *लिकटेंस्टीन* : लिकटेंस्टीन हा युरोपातील देश 15 ऑगस्ट 1940मध्ये स्वतंत्र झाला होता. त्यामुळे या 15 ऑगस्टला लिकटेंस्टीन हा देश 80वा स्वातंत्र्यदिन साजरा करेल.

🇧🇭 *बहारीन* : सौदी अरेबियामधील बहारीन या देशाला 14 ऑगस्ट 1971मध्ये स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे ब्रिटीश सरकारने 15 ऑगस्ट या दिवशी बहरीनचा स्वातंत्र्यदिन घोषित केला. मात्र बहारीनच्या नागरिकांनी तो नाकारून त्याच्या बादशहाच्या राज्याभिषेकाचा दिवस म्हणजेच 16 ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिन म्हणून जाहीर केला.

भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त गुगलने सादर केलेली १४ अफलातून डुडल्स.. मानलं राव..!!

https://www.bobhata.com/lifestyle/doodles-indian-independence-day-1275

उत्तर ->  *_😎भारताच्या इतिहासातील काही अभिमानास्पद गोष्टी..._*

https://www.uttar.co/answer/5d554e2b62230427a14cba28

*👍गुगलकडून भारताला 73 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा, आज गुगलचं भारतीय डूडल*


💁‍♂आज भारताचा 73 वा स्वातंत्र्यदिन आहे, संपूर्ण देशभरात हा दिवस विविध पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आज गूगलने डूडल तयार केले आहे.  भारतीय कलाकार शैवलिनी कुमार यांनी हे डूडल तयार केले आहे. या चित्रात शिक्षण, कला, धैर्य आणि करुणा यासारख्या भारतीय संस्कृतीचे जटिल परंतु सुसंवादी असं पॅचवर्क आहे.

👌भारताचं प्रतिक म्हणून भारतीय लोकसभा, रिक्षा, चांद्रयान, पतंग, मोरपंख आणि राष्ट्रीय प्राणी वाघ या सर्व गोष्टींचा या पॅचवर्कमध्ये समावेश केला आहे.गूगलसोबतच यंदा ट्विटरवर स्वातंत्र्यदिनानिमित्त वापरल्या जाणाऱ्या हॅशटॅगसोबत अशोकचक्राची इमोजीदेखील पाहायला मिळत आहे. मराठीसह देशातल्या 10 प्रमुख भाषांमध्ये (इंग्लिश, हिंदी, गुजराती, तमिळ, बंगाली, पंजाबी, मल्याळम, ओडिया, कानडी, तेलुगू) हॅशटॅग बनवण्यात आले आहेत.

*🧐पाहा गुगलच खास डूडल*
https://www.google.com/
उत्तर लिहिले · 14/8/2019
कर्म · 569225
1
ब्रिटिश साम्राज्यापासून दिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन' दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज उभारला जातो. देशभरातही अनेक ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.

भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. याला गणराज्य दिन असेही म्हटले जाते. भारताचे संविधान संविधान समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमला आणण्यासाठी निवडण्यात आला.२६ जानेवारी, इ.स. १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती.
उत्तर लिहिले · 28/2/2018
कर्म · 210095
0
स्वतंत्र दिन आणि प्रजासत्ताक दिन

स्वतंत्र दिन आणि प्रजासत्ताक दिन हे भारताचे दोन महत्त्वाचे राष्ट्रीय सण आहेत. ह्या दोन्ही दिवसांचे महत्त्व आणि इतिहास खालीलप्रमाणे:

1. स्वतंत्र दिन (Independence Day):

* तारिख: 15 ऑगस्ट

*महत्व: याच दिवशी 1947 मध्ये भारत ब्रिटिशांच्या राजवटीतून स्वतंत्र झाला.

*इतिहास:

  • 15 ऑगस्ट 1947 रोजी, भारताला ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आणि त्यांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा तिरंगा ध्वज फडकवला.
  • हा दिवस भारताच्या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करून देतो.

*साजरा करण्याची पद्धत:

  • भारताचे पंतप्रधान दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करतात आणि राष्ट्राला उद्देशून भाषण करतात.
  • देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
  • शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांमध्ये ध्वजारोहण आणि विविध कार्यक्रम होतात.

*उद्देश: स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करणे आणि देशासाठी त्याग करण्याची प्रेरणा देणे.

2. प्रजासत्ताक दिन (Republic Day):

*तारिख: 26 जानेवारी

*महत्व: 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान लागू झाले आणि भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र बनले.

*इतिहास:

  • 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान लागू झाले.
  • संविधान सभेने भारताचे संविधान तयार केले, ज्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते.
  • या दिवसापासून भारत एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक राष्ट्र बनला.

*साजरा करण्याची पद्धत:

  • दिल्लीत राजपथावर (Kartavya Path) भव्य परेड आयोजित केली जाते, ज्यात भारतीय सैन्यदल, विविध राज्यांचे सांस्कृतिक देखावे सादर केले जातात.
  • राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण होते.
  • वीर जवानांना शौर्य पुरस्कार प्रदान केले जातात.

*उद्देश: संविधानाचे महत्त्व आणि त्याचे पालन करण्याची प्रेरणा देणे.

दोन्ही दिवसांमधील समानता:

  • हे दोन्ही दिवस राष्ट्रीय सण आहेत आणि देशभरात उत्साहाने साजरे केले जातात.
  • या दिवशी शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांमध्ये ध्वजारोहण होते.
  • देशभक्तीपर गीते आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

दोन्ही दिवसांमधील फरक:

  • स्वतंत्र दिन भारताच्या स्वातंत्र्याचे प्रतीक आहे, तर प्रजासत्ताक दिन भारताच्या संविधानाचे प्रतीक आहे.
  • स्वतंत्र दिनी पंतप्रधान ध्वजारोहण करतात, तर प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती ध्वजारोहण करतात.
  • स्वतंत्र दिनी स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण केले जाते, तर प्रजासत्ताक दिनी संविधानाचे महत्त्व सांगितले जाते.

हे दोन्ही दिवस भारताच्या इतिहासातील महत्त्वाचे दिवस आहेत आणि प्रत्येक भारतीयाने ते आदराने साजरे केले पाहिजेत.

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 980

Related Questions

मराठी किती जुनी भाषा आहे?
औद्योगिक क्रांती कुठे झाली?
पंडित जवाहरलाल नेहरू हे आशियानचे संस्थापक होते का?
पूर्व युरोपातील सोव्हिएट रशियाच्या दबावाखालील ५ देशांची नावे लिहा?
पूर्व युरोपातील अनेक देश सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखाली होते का?
ॲनी बेझंट यांच्या होमरूल चळवळीचे भारतात झालेले परिणाम लिहा?
1975 चा पेठ मधील दुष्काळ?