मराठी भाषा व्यक्तिमत्व उद्योग यशोगाथा

शून्यापासून विश्व निर्माण करणार्‍या मराठी माणसाची सक्सेस स्टोरी?

4 उत्तरे
4 answers

शून्यापासून विश्व निर्माण करणार्‍या मराठी माणसाची सक्सेस स्टोरी?

4
इडली विक्रेता ते पंचतारांकित हॉटेलांचा मालक
------------------------------
जगातलं पहिलं पर्यावरणीय पंचतारांकित "ऑर्किड' हे हॉटेल महानगरी मुंबईत सुरु केलं ते विठ्ठल कामत यांनी! जगातले दिग्गज हॉटेल व्यावसायिक असा त्यांचा लौकिक! त्यांच्या "ऑर्किड' हॉटेलनं अनेक पारितोषिकंही मिळवली आहेत. ते मुळचे कर्नाटकातले. पण वडील व्यंकटेश कामत पोटाची खळगी भरायसाठी मुंबईत आले. अपार परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर त्यांनी "कामत ग्रुप', हा हॉटेल व्यवसाय मुंबईत यशस्वी केला. त्यांचे विठ्ठल हे चिरंजीव! अभियांत्रिकीची पदवी घेतलेल्या विठ्ठल कामतांना आपल्या वडिलांच्या हॉटेल व्यवसायातच स्वारस्य होतं. वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी त्यांनी जगप्रसिध्द हॉटेल व्यावसायिक राव बहादूर ऑबेराय यांना, "मला तुमच्या हॉटेलपेक्षा खूप मोठं हॉटेल मुंबईत बांधायचं आहे', असं आत्मविश्वासानं सांगितलं होतं. हॉटेल व्यवसायातली मुळाक्षरं त्यांनी आपल्या वडिलांच्या व्यवसायातच गिरवली. या व्यवसायातले भले-बुरे अनुभव घेता घेता प्रामाणिकपणा, परिश्रम याशिवाय व्यवसायात यशस्वी होता येत नाही, अशी खूणगाठही मनाशी बांधली आणि जीवनात दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभं असतानाही त्यांनी या ब्रीदापासून माघार घेतली नाही.

वडिलांच्याकडनं फक्त लंडनचं विमानाचं तिकीट काढून घेवून, रिकाम्या खिशानं लंडन गाठलं. तिथल्याच हॉटेलात काम करून पैसे मिळवले, अनुभव घेतला. माणसं पाहिली आणि अनुभवली. जगभर ते फिरले. पण आपल्या भावालाच त्यांना काही ओळखता आलं नाही. याच भावाच्या अट्टाहासानं आणि एका चार्टर्ड अकौंटंटच्या कारस्थानानं ते एका रात्रीत रस्त्यावर आले. खिशात फुटकी कौडी नसताना, मुंबईतलं हॉटेल प्लाझा हे हॉटेल एक कोटी रुपयांना विकत घेणारे विठ्ठल कामत व्यवसायातनं बाजूला फेकले गेले. पुढं फक्त अंधार होता. आत्महत्येचा विचारही मनात आला. पण आपण काही करून दाखवायचं अशी जिद्द पुन्हा उसळली. हॉटेल प्लाझाच्या ठिकाणीच 250 खोल्यांचं हॉटेल ऑर्किड त्यांनी बांधलं.त्याची अफाट प्रसिध्दी झाली. पुन्हा विठ्ठल कामत हे नाव जगभरातल्या हॉटेल व्यवसायात झळकायला लागलं.

पण हे यश त्यांना सहज मिळालेलं नाही. त्यांच्या या विजय गाथेमागं प्रचंड परिश्रम आणि त्यांनी घेतलेल्या अचूक निर्णयांचा इतिहासही दडला आहे. पैसा हा व्यवसायाचा प्राणवायू. पण तो नसला म्हणजे मन सैरभैर होतं. पुढचं काही सुचत नाही. अशा वेळी न खचता पुढं जाणं हेच महत्वाचं असतं. तुमची जिद्द असेल तर यश मिळतंच! असं त्यांचं म्हणणं!

ज्यांनी संकटाच्या वेळी आपल्याला मदत केली, त्यांना कधीही विसरु नका. ज्यांच्या जीवावर आणि श्रमावर तुम्ही यशस्वी होता, त्या व्यवसायातल्या कर्मचारी-कामगारांचे संसार सुखी व्हावे, हेही लक्षात घ्या. आपण मालक नाही, तर त्यांचे सहकारी आहोत, हेही लक्षात ठेवा. ग्राहक आपला देव आहे, याचा विसर पडू देऊ नका. समस्यांच्या कोंडीत डोकं स्थिर ठेवा. पैसा आला म्हणजे उधळू नका. साधं रहा आणि साधंच जगा. असं केलं म्हणजे जीवनात यश मिळतंच, हे आपले अनुभवाचे बोल त्यांनी सातत्यानं सांगितले आहेत. माणसांना नेहमी देणारा असावा, घेणारा नाही, हा धडा आई-वडिलांनी दिला, तो जीवनात आचरणातही आणला. अपयश खुणावत असतानाही, त्याला पायदळी तुडवून यश मिळवलं आणि ते आपलं एकट्याचं नाही. त्यात पत्नी, मुलं आणि व्यवसायातले सहकारी यांचाही वाटा आहेच, असंही विनम्रपणे ते सांगतात. व्यवसायिक माणसांसाठी दोन धोकेबाज गोष्टी म्हणजे भावनेच्या आहारी जाणं आणि नको त्या गोष्टीवर विश्वास ठेवणं, हे दोन दुर्गुण व्यावसायिकांना दूर ठेवायला हवेत. जीभही जगातली सर्वात गोड आणि सर्वात कडू वस्तू आहे. तिचा उपयोग करताना शंभरदा विचार करा. तोंडातून शब्दांचे बाण सुटण्याआधीच ही गोष्ट लक्षात ठेवा, असा लोकसंग्रहाचा-यशस्वितेचा मूलमंत्रही त्यांनी सांगून ठेवला आहे. ज्या त्या वेळी काम करा, आळशी होऊ नका. यशस्वीतेपर्यंत पोहोचणारी शिडी एकाच दिवसात चढता येत नाही, हे लक्षात ठेवा, असंही त्यांचं म्हणणं आहे. चांगला विचार आणि आनंद देण्यानं वाढतो. तसाच सुखाचा मूलमंत्र दिल्यानं यश मिळतं, यावर आपली पूर्ण श्रध्दा आहे, असं पंचतारांकित हॉटेलांची साखळी निर्माण करणारे कामत यशाचा मूलमंत्र सांगून जातात. व्यवसायात यश आणि अपयश हे असतंच. पण अपयशानं डगमगून न जाता नव्या जिद्दीनं पुन्हा शून्यातून नवं विश्व उभारता येतं, हे कामत यांनी आपल्या यशस्वी व्यवसायानं सिध्दही करुन दाखवलं आहे.

- वासुदेव कुलकर्णी
----------------------------------------------------
उत्तर लिहिले · 28/9/2018
कर्म · 545
1
परिस्थिती माणसाला शिकवते की आपण किती प्रयत्न करायला हवे.
उत्तर लिहिले · 5/8/2018
कर्म · 20
0

शून्यापासून विश्व निर्माण करणार्‍या अनेक मराठी माणसांनी आपल्या कर्तृत्वाने इतिहास घडवला आहे. त्यापैकी काहीSuccess Story खालीलप्रमाणे:

लक्ष्मीकांत किर्लोस्कर:

लक्ष्मीकांत किर्लोस्कर (Kirloskar) हे किर्लोस्कर समूहाचे संस्थापक होते. त्यांनी लहान वयातच व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला सायकल दुरुस्तीचे दुकान टाकले. त्यानंतर त्यांनी स्वतःचा कारखाना सुरू केला. त्यांच्या अथक परिश्रमाने आणिInnovative mindsetमुळे, किर्लोस्कर समूह आज भारतातील सर्वात मोठ्या engineering कंपन्यांपैकी एक बनला आहे.

अधिक माहितीसाठी: किर्लोस्कर समूह

धीरूभाई अंबानी:

though धीरूभाई अंबानी गुजराती होते, त्यांचा जन्म सौराष्ट्र, गुजरातमध्ये झाला होता, परंतु त्यांचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र आणि संबंध मराठी लोकांशी जुळलेले होते. त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजची (Reliance Industries) स्थापना केली. अत्यंत गरीब परिस्थितीतून त्यांनी आपल्या व्यवसायाची सुरुवात केली आणि जिद्द, चिकाटीच्या जोरावर त्यांनी Reliance Industriesला भारतातील सर्वात मोठी कंपनी बनवले.

अधिक माहितीसाठी: रिलायन्स इंडस्ट्रीज

गुलाबराव पोळ:

गुलाबराव पोळ (Gulabrao Pol) हे एक IAS अधिकारी होते. त्यांनी नंदुरबार जिल्ह्यामध्ये कुपोषित बालकांना वाचवण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांनी 'मिशन बाल आरोग्य' (Mission Bal Arogya) सुरू केले, ज्यामुळे हजारो बालकांचे प्राण वाचले. त्यांच्या कार्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील बालमृत्यू दर कमी झाला.

प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे:

प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे (Prakash Amte and Mandakini Amte) यांनी छत्तीसगडमधील दुर्गम भागात आदिवासी लोकांसाठी Lok Biradari Prakalp सुरू केला. त्यांनी तेथे शाळा, रुग्णालय आणि प्राणी अनाथालय उघडले, ज्यामुळे हजारो लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आले.

अधिक माहितीसाठी: लोक बिरादरी प्रकल्प

उदय कोटक:

उदय कोटक (Uday Kotak) हे कोटक महिंद्रा बँकेचे (Kotak Mahindra Bank) संस्थापक आहेत. त्यांनी एका लहान फायनान्स कंपनीतून सुरुवात केली आणि आज Kotak Mahindra Bank ही भारतातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक आहे.

अधिक माहितीसाठी: कोटक महिंद्रा बँक

या व्यतिरिक्त, अनेक unknown लोकांच्या stories आहेत ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही हार न मानता आपले ध्येय साध्य केले.

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 5240

Related Questions

यवतमाळ जिल्ह्यातील चांगल्या शाळेची यशोगाथा?
दोन मराठी उद्योजक भावांच्या 'क्विकहील'ची कहाणी?
अंबानींची सक्सेस स्टोरी कोणी सांगेल का?