शब्दाचा अर्थ भाषा शब्दार्थ

हॅलो याचा अर्थ काय? (इतिहास काय आहे?)

6 उत्तरे
6 answers

हॅलो याचा अर्थ काय? (इतिहास काय आहे?)

8
हॅलो' शब्दाचा इतिहास जाणून घेऊया



फोनवर बोलताना नेहमी पलीकडची व्यक्ती किती जरी जवळची असली तर त्याचे नाव न घेता हॅलो हा शब्द उच्चारत असतोच. बोलायची सुरूवात करायची म्हटल की आपण या छोट्याशा शब्दाचा वापर आपण पटकन करत असतो. पण या छोट्याशा शब्दाचा अर्थ, तो कसा कोणी शोध लावला माहिती आहे का? तर जाणून घेवुयात या छोट्याशा हॅलो शब्दासंदर्भात..

१९७३ मध्ये इस्त्राईल आणि एकत्र आलेले अरब देश यांच्यातील दीर्घकालीन लढा संपला आणि त्यावेळी 'हॅलो' शब्दाचा उपयोग झाला होता. जागतिक हॅलो दिवस हा जगात शांती आणि मैत्री वाढविण्यास साजरा करण्यात येतो. तब्बल 180 देशात हा दिवस साजरा करण्यात येतो.

इस्त्राईल आणि सौदी अरेबियामध्ये १९ दिवस युद्ध सुरू होते. या युद्धाला किप्पर युद्ध म्हणतात. युद्धामध्ये इस्त्राईलने हे युद्ध जिंकले असले तरी देान्ही देशात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हे सर्व वातवरण बदलण्यासाठी ब्रायनने शांती आणि मैत्री वाढविण्यासाठी हॅलो डे साजरा करण्याचा लोकांना सल्ला दिला. तेव्हापासून हॅलो हा दिवस साजरा केला जातो. तेव्हापासून दोन्ही देशात मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले.

◆हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश

जे काही वाद असतील ते शक्तीचा वापर करण्यापेक्षा संवादाने संपवता येऊ शकतील, जेव्हा आपण एखाद्याशी संवाद साधतो तेव्हा शत्रुत्व संपण्यास मदत होते, जागतिक हॅलो दिवस साजरा करण्यामागे हा विचार आहे.

◆'हॅलो'ला कोणत्या भाषेत काय म्हणतात?

Spanish - Hola

German - Hallo

Japanese - Konnichiwa

French - Bonjour

Italian - Ciao

Chinese - Nǐ hǎo

Russia - Privet

Korean- Yeoboseyo
उत्तर लिहिले · 21/11/2018
कर्म · 123540
8
एखाद्या शब्दाच्या नेमक्या उच्चाराबाबत मनात अनेकदा गोंधळ होतो. एखादा शब्द हा मास्टर कीसारखा असतो.. सर्वच कुलपांचा पत्ता ठाऊक असणारा. पृथ्वीतलावर वावरताना देशादेशातल्या भाषिक सीमारेषा जरी गडद असल्या तरी मास्टर कीप्रमाणे जो शब्द या साऱ्या भाषिक कुलपांना तोडून संभाषणास सुरुवात करायला मदत करतो तो शब्द म्हणजे हॅलो. आज आपण या शब्दाचा अचूक उच्चार शोधण्यापेक्षा या शब्दाच्या उच्चारांची विविध अर्थ शोधणार आहोत. याचं मुख्य कारण म्हणजे हेलो, हालो, हलाव, हलो अशा विविध रूपांत या शब्दाने संभाषणास सुरुवात होते आणि ही सर्व रूपं आपापल्या परीने अचूकच ठरतात.
या शब्दाचे मूळ रूप शोधण्याचा प्रयत्न केला तर नदीचे मूळ वा ऋषीचे कूळ हा नियम याला लागू करावा लागेल. याची मूळ रूपे विविध भाषांमध्ये विविध संदर्भासह जोडलेली आहेत आणि आधुनिक काळातील या शब्दाच्या वापराला खूप साऱ्या दंतकथाही चिकटल्या गेल्या आहेत. जुन्या जर्मन भाषेत hallo किंवा hollo नावाचा शब्द होता. बोटीतून प्रवास करणारे नावाडी एखाद्याचे लक्ष वेधून घेण्याकरिता या शब्दांचा वापर करत. हॅलोपासून संभाषणाची सुरुवात होते म्हणजे एक प्रकारे लक्ष वेधण्याचाच तो प्रकार असतो.
फ्रेंचमध्ये hola असा शब्द होता. त्याचा whoa there या उद्गारार्थी शब्दांसाठी पर्याय म्हणून वापर व्हायचा. तर hullo, hollo अशा उच्चारांचा वापर शिकारीच्या वेळी होई. एखादं सावज शिकाऱ्याला गवसलं किंवा त्याच्या नजरेच्या टापूत आलं की तो hullo, hollo असा उद्गार काढून इतरांना सूचना द्यायचे. भूतकाळातील या साऱ्या hallo, hollo, hola, hullo, hollaयांना इथे आमंत्रित करण्याचं कारण, आजचं हॅलो हे या शब्दांतूनच निर्माण झालंय. त्यामुळे विविध देशांत, प्रांतांत त्याचे जे विविध उच्चार होतात ते एक प्रकारे न्यायाचं ठरतं. एकाच उच्चाराचा आग्रह धरता येत नाही. पण त्यातल्या त्यात अगदी कॉमन उच्चार कोणता? तर हॅलो. पण ‘लो’ला अगदी हलकेच ‘अ’चं शेपूट ब्रिटिश वा अमेरिकन मंडळींनी जोडलंय. ‘हॅलोअ’ असा काहीसा उच्चार त्यातून तयार व्हावा.
‘हाय’ या अर्थाने वा एखाद्याला ग्रीट करण्याच्या हेतूने हॅलोचा वापर अगदी अलीकडचा. ग्राहम बेलच्या टेलीफोनच्या शोधानंतरचा आहे. त्यातही प्रसिद्ध संशोधक थॉमस अल्वा एडिसनने आपल्याला फोन करणाऱ्या मंडळींना ‘हॅलो’ने सुरुवात करण्याचा सल्ला दिला होता, असे सांगितले जाते. त्याकाळात टेलिफोन एक्स्चेंजमध्ये काम करणाऱ्या मुलींना ‘हॅलो गर्ल्स’ असे संबोधले जाई. टेलिफोनचा वापर जसजसा वाढत गेला तसतसं हॅलो आणि त्या हॅलोची विविध रूपं सर्वदूर होत गेली. आज दिवसभरात या शब्दाचा वापर न करणारी मंडळी फारच थोडकी असतील. तर अशा या मास्टर की हॅलोने एक खूपच सुंदर पूल जोडला आहे. अज्ञात भाषेच्या व आपल्या संभाषणाचा. परक्या देशात ती भाषा येत नसतानाही सुहास्य वदनाने केलेलं हॅलो, खूप काही साध्य करून जातं.
उत्तर लिहिले · 23/12/2017
कर्म · 210095
0

हॅलो (Hello) हा शब्द greetings (अभिवादन) करण्यासाठी वापरला जातो.

या शब्दाचा इतिहास:

  • हॅलो' हा शब्द 1827 पासून वापरात आहे.
  • 'हॅलो' शब्दाचा संबंध जुन्या जर्मन शब्द 'halâ' (म्हणजे 'bolne', 'पुकारणे') आणि फ्रेंच शब्द 'holla' (म्हणजे 'shabdh karne') यांच्याशी आहे.
  • थॉमस एडिसन यांनी फोनवर बोलताना 'हॅलो' वापरण्यास प्रोत्साहन दिले.
  • त्याआधी, अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांनी 'ahooy' (अहोय) हा शब्द वापरण्याचा सल्ला दिला होता, पण तो लोकप्रिय झाला नाही.

त्यामुळे, 'हॅलो' हा शब्द अभिवादन करण्यासाठी रूढ झाला.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 5240

Related Questions

हस्त या शब्दाचा अर्थ काय?
अश्विनी शब्दाचा अर्थ काय?
मशाल या शब्दाला मराठी भाषेत काय म्हणतात?
वल्लवने याचा अर्थ काय?
एअरपोर्टला मराठी मध्ये काय म्हणतात?
विरुद्धार्थी शब्द काय लावून तयार होतात?
मोक्कार म्हणजे काय?