5
*_📣अशी झाली नगरची स्थापना_*

पंधराव्या शतकाच्या अखेरीस दक्षिण भारतातील बहामनी राजवट फुटल्याने त्याचा एक भाग असलेल्या मलिक अहमद बहिरी (अहमद निजामशहा) याने स्वतःचे राज्य स्थापन करण्याचे प्रयत्न केले. त्याला नेस्तनाबूत करण्यासाठी बिदरचा सेनापती जहांगीर खान त्याच्यावर चालून आला. नगरजवळील भिंगार येथे हे तुंबळ युद्ध झाले व त्यात जहांगीर खानचा पराभव झाल्याने या आनंदाप्रित्यर्थ भिंगारजवळच भुईकोट किल्ला उभारण्याची व त्याच्याजवळ नगर शहर वसविण्याची मुहूर्तमेढ २८ मे १४९० या दिवशी मलिक अहमदने रोवली. हाच दिवस नगर शहराचा स्थापना दिन मानला जातो.

आजपर्यंतच्या ५२८ वर्षांच्या वाटचालीत निजामशाही, मोगलशाही, मराठेशाही, पेशवाई, ब्रिटीश व स्वातंत्रोत्तर स्वकियांचा कालखंड अनुभवलेल्या नगर शहराची तुलना कैरो व बगदाद या शहरांशी होत असे. सुलताना चाँदबिबी व तिचा पराक्रम य़ेथल्या मातीतच घडलेला. १९४२च्या चले जाव चळवळीत सहभागी पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेलांसह अन्य राष्ट्रीय नेत्यांना येथील किल्ल्यात स्थानबद्ध केले होते.

*_📍उत्कृष्ट हवामान असलेले हे शहर आता बदलत्या काळानुसार अत्याधुनिकतेकडे वाटचाल करीत आहे._*

*_😎 होय अभिमान आहे आम्ही अहमदनगरकर असल्याचा !_*


_होय अभिमान आहे आम्ही अहमदनगरकर असल्याचा..कारण आमच्या नगरच्या लोकांना बाकी काही कळों वा ना कळों पण माणुसकी मात्र खूप छान कळते आज आपल्या नगरचा वाढदिवस त्यानिमित्ताने जाणून घेऊयात काही खास गोष्टी_

◼पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा (येथील एकंदरीत सात जिल्हे) यांना सांधणारी भली मोठी बाजारपेठ म्हणजे अहमदनगर.

◼शिवकालापूर्वीपासून इतिहास असलेली वयोमानाबाबत अगदी पैठणशी स्पर्धा करणारी महाराष्ट्रातील प्राचीन नगरी.

◼नगरला भुईकोट किल्ला आहे जो सध्या लष्कराच्या ताब्यात आहे. याच किल्ल्यात पं जवाहरलाल नेहरू यांनी ते कैदेत असताना ‘डिस्कवरी ऑफ इंडिया’ हा ग्रंथ लिहिला

◼लष्कराचे मोठे ठाणे तसेच वाहन तपासणी व संशोधन अनुसंधान या अहमदनगर येथील दोन मोठ्या शासकीय संस्था.

◼एकोणिसाव्या शतकातला मराठीतील पहिला छापखाना अहमदनगर येथील

◼‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ ही जगप्रसिद्ध घोषणा लोकमान्य टिळकांनी नगरमधील व्याख्यानात सर्वांत प्रथम ३१ मे १९१६ रोजी दिली.

◼सकळ महाराष्ट्राला प्रवासवाहिनी म्हणून जी घावली, ती एस्टी म्हणून प्रसिद्ध पावली, सर्वप्रथम धावली ती पुणे-नगर या मार्गावर.

◼कायनेटिक स्कुटर तसेच लुना नावाची मोपेड फिरोदियांनी नगरमध्ये प्रथम उत्पादित केली.

*_📍शर्ट बाहेर येऊ दे, पण बनियन कसा घट्टच बसलेला हवा. आणि असे मानणारा तो खरा कट्टर नगरकर जगाच्या पाठीवर कोठेही जावो आपला मूळ स्वभाव बदलत नाही_*

*_😎अहमदनगरचा अभिमान...अहमदनगरचा ऐतिहासिक वारसा_*


*_◼सलाबतखान दुसरा यांची कबर (चांदबीबी महाल)_*
शाह डोंगरावर अहमदनगर शहरापासून 12 किलोमीटर अंतरावर, सलाबतखान दुसरा यांची कबर आहे.चौथे निजामशाहच्या (1565-88) कारकीर्दीत सलाबतखान  महान राजकारणी आणिअंतर्गत मंत्री होते.ही इमारत तीन मजली आणि अष्टकोनी आहे.

*_◼दमडी मशीद_*
अहमदनगर किल्ल्याजवळ स्थित, इ. स. 1567 मध्ये  साहिर खाननी दमडी मशिदीची स्थापना केली. मशिदीचा विस्तृत आकार आणि शिलालेख यासाठी प्रसिध्द आहे. येथे युरोप लोकांची  आणि इतर लोकांची कबरे  आहेत. मुगल पुरातन वास्तू – दमडी मशिदीची प्रतिकृती आहे गुजरातमध्ये आढळते.

*_◼कोटला 12 इमाम_*
उल्लेखनीय मशिदीला बारा इमामांचे कोताळा (बारा संतांचा किल्ला) असे म्हणतात.इ.स 1536 मध्ये बुर्हान निजाम शाह यांनी त्यांचे मंत्री शाह ताहिर यांच्या मार्गदर्शनाखाली बांधली होती. समतोल वास्तुकला, सुबक रचना आणि उत्तम कारागिरीचे हे अतिशय सुंदर उदाहरण आहे.

*_◼बाग रौझा_*
हे ऐतिहासिक स्मारक, काळ्या दगडांनी बांधलेले, अहमद निजामशाह यांचे निवासस्थान होते. हे ठिकाण एकेकाळी अहमद निजाम शाह यांचे एक घर होते. हे 16 व्या शतकात राजा निजामी यांनी बांधले होते. ही संपूर्ण स्मारक काळ्या दगडापासून बनलेली आहे.

*_◼फरिया बाग पॅलेस_*
हे स्थान निजामशाहचा मुलगा बुरहान शाह,जो सातव्या वर्षी 1508 मध्ये सिंहासनावर बसला होता त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बांधण्यात आला. हे महल प्राचीन काळातील कला व संस्कृतीची झलक दाखविते.

*_◼अहमदनगर भुईकोट किल्ला_*
या किल्ल्याला 500 वर्षांचा इतिहास असून  निजामशाहीचा संस्थापक अहमद  बादशाहाने शहर  वसविण्यापूवी इ.स.1490 मध्ये किल्ला बांधला. या किल्ल्याचा परिघ 1 मैल 80 यार्ड इतका असून किल्ल्यास 22 बुरुज आहेत.

*_◼सेंट जॉन कॅथलिक चर्च_*
सेंट जॉन कॅथलिक चर्च हे ब्रिटीश काळाशी संबंधित आर्किटेक्चरचे उत्कृष्ट प्रदर्शन आहे. चर्चच्या दफनभूमीत आपल्याला अहमदनगरमध्ये तैनात असलेल्या ब्रिटीश सैन्याचे अनेक कबर सापडतात. सेंट जॉन्स कॅथलिक चर्च हे अहमदनगरच्या बाहेरील भागात भिंगार येथे आहे.

*_◼औरंगजेब कबर_*
1680 च्या सुमारास शिवाजी महारांजाच्या मृत्यू झाल्यानंतर औरंगजेब संपूर्ण दख्खन साम्राज्य जिंकला आणि त्याच्या राजवटीखाली आणला. त्यांनी आपले राज्य भिंगार जवळ स्थापन केले आणि 1707 सालात  वयाच्या  91 पर्यंत तेथेच ते राहिले. येथे  त्यांना दफन करण्यात आले .

*_◼आनंद धाम_*
अहमदनगरची जमीन या भूमीवर जन्मलेल्या अनेक संतांनी पवित्र केली आहे. त्यापैकी एक जैन संत श्री आनंद ऋषिजी महाराज आहेत. 1992 मध्ये त्यांचा स्वर्गवास  झाला.आनंद धाम त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बांधण्यात आला.

*_◼अहमदनगर ऐतिहासिक संग्रालय आणि संशोधन केंद्र_*
अहमदनगर ऐतिहासिक संग्रहालय मे 1960 मध्ये स्थापन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील या संग्रहालयमध्ये या संग्रहालयात सूक्ष्म पेंटिंग, शिल्पे, शस्त्रं, पगडी आणि हस्तलिखित इत्यादिंचा एक अनोखा संग्रह आहे.

*_◼कवलरी टँक संग्रहालय_*
टैंक संग्रहालयमध्ये, ब्रिटीश शैलीतील तोफ आणि गोळे ठेवले आहेत. आशियातील एकमेव संग्रहालय आहे .अनेक राज्यकर्त्यांच्या कारकीर्दीदरम्यान वापरलेले दारुगोळा आणि शस्त्रे  येथे ठेवलेले आहेत. येथे 40 देशांतील टँकदेखील प्रदर्शित केले गेले आहेत जे अद्वितीय आहेत.

*_◼शुक्लेश्वर मंदिर, भिंगार_*
हे मंदिर हजारो वर्षांपूर्वीचे आहे. हे रामायण काळापासून आहे.  विश्वास पाटील यांनी त्यांचे पानिपत कदंबरीत भिंगारच्या शुक्लेश्वर मंदिराचा  उल्लेख केला आहे.

*_🚌 नगर मधून महाराष्ट्रात धावलेल्या पहिल्या एसटी बसची कहाणी_*


_तिला कुणी एसटी म्हणतं… कुणी लालपरी म्हणतं तर कुणी लाल डब्बाही म्हणतं… एसटीचा प्रवास, सुखाचा प्रवास… असा नारा सरकारने दिला. किंवा तिला बहुजन हिताय, बहुजन सुखाय असंही म्हटलं गेलं मात्र आपल्याला तिचा खरा इतिहास माहीत आहे का? महाराष्ट्रातील पहिली एसटी केव्हा सुरु झाली? ती कोणत्या दोन शहरांमध्ये धावली? तेव्हा एसटीचं तिकीट नेमकं किती रुपये होतं?_

◼महाराष्ट्राच्या रस्त्यावर पहिली एसटी बस धावली तो दिवस होता 1 जून 1948.

◼अहमदनगर आणि पुणे ही ती दोन भाग्यवान शहरं होती ज्यांच्या दरम्यान पहिली एसटी बस धावली होती.

◼किसन राऊत नावाच्या व्यक्तीला ही पहिली एसटी बस चालवण्याचा बहुमान मिळाला होता, तर लक्ष्मण केवटे नावाचे गृहस्थ वाहक होते.

◼जी बस पहिली एसटी बस म्हणून धावली तिची बॉ़डी आजच्यासारखी लोखंडी नव्हती किंवा आतमध्ये अॅल्युमिनिअमचं कामही नव्हतं. ती एक लाकडी बॉडी होती. आणि वरुन जे छप्पर होतं ते चक्क कापडी होतं.

◼लाकडी बॉडी असलेल्या या बसची आसनक्षमता 30 होती. सकाळी ठिक 8 वाजता ही बस अहमदनगरहून पुण्याच्या दिशेने निघाली होती.

◼या बसचं तिकीट होतं अडीच रुपये. आज तुम्ही विचार कराल की अहमदनगर ते पुणे तिकीट फक्त अडीच रुपये???

◼अहमदनगर ते पुणे प्रवासाच्या दरम्यान चास, सुपा, शिरुर, लोणीकंद अशी गावं लागली. लोक एसटी बस थांबवून प्रवास करण्याची इच्छा व्यक्त करत होते. मात्र आसनक्षमतेमुळे ते शक्य नव्हतं.

*_📍एसटीवर हल्ला होण्याची शक्यता होती. त्यामुळे पुण्यात एसटीने प्रवेश केल्यापासून म्हणजेच माळीवाडा वेशीपासून ही बस पोलीस बंदोबस्तात कॉर्पोरेशनपर्यंत आणण्यात आली_*
उत्तर लिहिले · 28/5/2019
कर्म · 569225