16
Answer link
गुळवेल किंवा गुडुची
(शास्त्रीय नाव: Tinospora cordifolia, टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया)
ही भारत, श्रीलंका, म्यानमार अशा उष्णकटिबंधीय प्रदेशांत आढळणारी एक वेल आहे.
हीला अमृतवेल म्हणतात. या वनस्पतीचे सत्त्व औषधी म्हणून वापरतात. त्याला गुळवेलसत्त्व असे नाव आहे.
औषधी उपयोग
नेत्र विकार, वमनविकार, सर्दी पडसे, संग्रहणी, पांडुरोग , प्रमेह, मूत्रविकार, यकृत विकार, ज्वर, कॅन्सर, त्रिदोषविकार, त्वचा रोग, मधुमेह, हृदयविकार, रक्तशर्कराविकार आदी विकारांवर गुळवेल हे एक उपयुक्त औषध आहे.
या वनस्पतीच्या कंदाचा आणि खोडाचा वापर औषधात केला जातो. या वनस्पतीची पानेही औषधी आहेत. गुळवेलीमध्ये टिनोस्पोरीन, टिनोस्पोरिन आम्ल, टिनोस्पोरिन गिलोइन, गिलोनिन ही रासायनिक गुणद्रव्ये आहेत. ही रसायने चवीला कडू असतात. तो कडवटपणा गुळवेलीच्या पानांत आला आहे.
गुळवेलीचे खोड मात्र चवीला कडू, तुरट आणि किंचित गोड असते. हिच्या अनोख्या गुणांमुळे आयुर्वेदिक औषधांमध्ये या वनस्पतीचा उपयोग करतात. जुलाब, पोटातील मुरडा, हगवण, कृमींचा त्रास, कावीळ, मधुमेह, मूळव्याध, अशक्तपणा, संधिवात अशा निरनिराळ्या व्याधींमध्ये गुळवेलीचा उपयोग होतो. त्यामुळे गुळवेल ही वनस्पती आयुर्वेदात 'अमृतकुंभ' म्हणून ओळखली जाते. वाढत्या उकाड्यामध्ये गुळवेलीच्या पानांची भाजी आरोग्यदायी ठरते. मेथीच्या भाजीप्रमाणे भाजी केली जाते. भाजीपासून केलेले पराठेही चवदार लागतात.
गुळवेलीमधील रासायनिक घटक- ग्लुकोसिन, जिलोइन, १.२ टक्के स्टार्च, बर्व्हेरिन, ग्लुकोसाइड, गिलोइमिन, कॅसमेंथीन, पामारिन, रीनात्पेरिन, टिनास्पोरिक उडणशील तेल, वसा, अल्कोहोल, ग्लिस्टोराल इत्यादी. या वनस्पतीमध्ये 'मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरकुलॉसिस' (Tuber Culosis) व 'एस्केनीशिया कोलाई' हे आतडे आणि मूत्रसंस्थेवर परिणाम करणारे रोगाणू, अन्य विषाणू समूह आणि कृमी आदी नष्ट करण्याची क्षमता आहे.
**सोबत गुळवेल चा फोटो दिला आहे.