44
सर्वात वरती पोलीस महासंचालक येतो. (DGP)
त्याखाली अतिरिक्त महासंचालक असतात(१४),
त्याखाली विशेष पोलिस महानिरीक्षक(SPECIAL IGP) हे महसुल आयुक्ताच्या दर्जेचे पद येते.
त्याखाली पोलिस उपमहानिरीक्षक (DIG),
त्यानंतर जिल्हास्तरावर पोलिस अधिक्षक(SP/DCP)
मग अतिरिक्त पोलिस अधीक्षक (ADD.SP)
मग पोलिस उपअधिक्षक(DySP/ACP) हे पद येते जे राज्यसेवेतून प्राप्त होते.
त्यानंतर मग वरिष्ठ पोलिस निरीक्षक (Sr.PI),
पोलिस निरीक्षक(PI),
मग सहाय्यक पोलिस निरीक्षक (API),
पोलिस उपनिरीक्षक (PSI),
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक (APSI),
शेवटी पोलिस हवालदार(POLICE HEAD CONSTABLE),
पोलिस नाईक(PN)
आणि पोलिस शिपाई(PC)
अशी क्रमावरित उतरंड आहे.
उत्तर लिहिले · 15/10/2018
कर्म · 458560