15



  ?पुणे
महाराष्ट्र • भारत
—  शहर  —




 पुणे 
गुणक: 18°32′N 73°51′E / 18.53°N 73.85°E
प्रमाणवेळ
भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
• उंची
७०० चौ. किमी
• ५६० मी
जिल्हा
पुणे
लोकसंख्या
• घनता
५०,४९,९६८ (२००८)
• ७,२१४/किमी२
महापौर
मुक्ता टिळक
कोड
• पिन कोड
• दूरध्वनी
• आरटीओ कोड

• ४११००१
• +०२०
• MH-१२ (पुणे)
MH-१४ (पिंपरी चिंचवड)
MH-५३ (दक्षिण पुणे)
MH-५४ (उत्तर पुणे) (प्रस्तावित)
संकेतस्थळ: पुणे महानगरपालिका संकेतस्थळ
गुणक: 18°32′N 73°51′E / 18.53°N 73.85°E
पुणे (इंग्रजी :Pune)  उच्चार (सहाय्य·माहिती) हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम भागात, मुळा व मुठा ह्या दोन नद्यांच्या किनारी वसलेले असून येथे पुणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. नागरी सोयीसुविधा व विकासाबाबतीत पुणे हे महाराष्ट्रात मुंबईनंतर अग्रेसर आहे. या शहराच्या पुणं या नावाचे Poona हे इंग्रजी स्पेलिंग सुमारे १५० वर्षे प्रचलित होते. शहरात पूर्वापार चालत अालेल्या अनेक शिक्षणसंस्थांमुळे पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते.

शिवाजींच्या आधीच्या काळापासून ज्ञात इतिहास असलेले पुणे हे भारतातील सातवे मोठे शहर असून महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर आहे.[ संदर्भ हवा ]. समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले पुणे शहर ही महाराष्ट्राची 'सांस्कृतिक राजधानी'; शहरात असलेल्या नामांकित शिक्षणसंस्थांमुळे पुणे हे विद्येचे माहेरघर मानले जाते. पुणे शहर उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातसुद्धा अग्रेसर आहे. मराठी ही शहरातील मुख्य भाषा आहे.

पुण्यामध्ये लाल महाल, तुळशी बाग, शनिवार वाडा इत्यादी प्रसिद्ध ठिकाणे भेट द्यावी अशी आहेत.

नाव संपादन करा
पुणे हे नाव 'पुण्यनगरी' या नावावरून आले असल्याचे समजले जाते. इ.स. ८ व्या शतकात ते 'पुन्नक' (किंवा 'पुण्यक') नावाने ओळखले जात असल्याचे संदर्भ सापडतात. इ.स. ११ व्या शतकात ते 'कसबे पुणे' किंवा 'पुनवडी' नावाने ओळखले जाऊ लागले. मराठा साम्राज्याच्या कालखंडात या शहराचे नाव 'पुणे' , आणि बोलीभाषेत ’पुणं’ असे वापरले जात होते. त्यामुळे ब्रिटिशांनी ’पुणं’चे स्पेलिंग Poona असे केले. त्यावरून परप्रांतीय लोक पुण्याला 'पूना' असे संबोधू लागले. पुढे शहराच्या नावाचे स्पेलिंग Pune असे केले. पूर्वीपासूनच हे शहर पुणे याच मराठी अधिकृत नावाने ओळखले जात होते.

पुणे काबीज केल्यावर औरंगजेबाला ते खूपच आवडले. त्याने या शहराला ’मुहियाबाद’ नाव दिले होते. पण प्रत्यक्ष पत्रव्यवहारात तो या शहराचा उल्लेख ’शहर नमुना’ असा करीत असे. पुणे येथील शनिवार वाडा हे प्रसिद्ध ठिकाण आहे.

इतिहास संपादन करा

शनिवारवाडा
मुख्य पान: पुण्याचा इतिहास
आठव्या शतकात पुणे हे पुन्नक म्हणून ओळखले जात असे. शहराचा सर्वांत जुना पुरावा इ.स. ७५८चा आहे ज्यात त्या काळातील राष्ट्रकूट राजवटीचा उल्लेख आढळतो. मध्ययुगीन काळाचा अजून एक पुरावा म्हणजे जंगली महाराज रस्त्यावर असलेली पाताळेश्वर लेणी. ही लेणी आठव्या शतकातील आहेत.

१७ व्या शतकापर्यंत हे शहर निजामशाही, आदिलशाही, मुघल अशा वेगवेगळ्या राजवटींच्या अंमलाखाली होते. सतराव्या शतकामध्ये शहाजीराजे भोसले यांना निजामशहाने पुण्याची जहागिरी दिली होती.. या जहागिरीमध्ये शहाजीच्या पत्‍नी जिजाबाई वास्तव्यास असताना इ.स. १६३० मध्ये शिवनेरी किल्ल्यावर शिवाजीराजे भोसले यांचा जन्म झाला. शिवाजी महाराजांनी आपल्या साथीदारांसह पुणे परिसरातील मुलखापासून सुरुवात करत मराठ्यांचे स्वराज्य स्थापले. या काळात पुण्यात शिवाजीमहाराजांचे वास्तव्य होते. पुढे पेशव्यांच्या काळात इ.स. १७४९ साली सातारा ही छत्रपतींची गादी असलेली राजधानी राहून पुणे मराठा साम्राज्याची प्रशासकीय राजधानी बनली. पेशव्यांच्या या काळात पुण्याची मोठी भरभराट झाली. इ.स. १८१८ पर्यंत पुण्यावर मराठ्यांचे राज्य होते. लाल महाल शनिवारवाडा, विश्रामबाग वाडा ही पुण्यातील ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाची ठिकाणे आहेत. लाल महाल हे छत्रपति शिवाजी महाराजांचे, शनिवारवाडा हे थोरले बाजीराव पेशवे ते सवाई माधवराव पेशव्यांचे तर विश्रामबागवाडा दुसर्‍या बाजीराव पेशव्यांचे निवासस्थान होते.पुणे हे विद्येचे माहेर घर आहे

भूगोल संपादन करा
जगाच्या नकाशावरती पुण्याचे अक्षांश १८° ३१' २२.४५" उत्तर, आणि रेखांश ७३° ५२' ३२.६९ पूर्व असे आहेत.

पुण्याचा संदर्भ बिंदू (Zero milestone) हा पुण्यातील कॅम्प भागात असलेल्या जनरल पोस्ट ऑफिसच्या इमारतीबाहेर आहे. पुणे शहर हे सह्याद्री डोंगररांगाच्या पूर्वेस, समुद्रसपाटीपासून ५६० मीटर (१,८३७ फूट) उंचीवर आहे. भीमा नदीच्या उपनद्या मुळा व मुठा यांच्या संगमावर हे शहर वसले आहे. पवना व इंद्रायणी या नद्यादेखील पुणे शहराच्या वायव्येच्या भागांतून वाहतात. शहराचा सर्वोच्च बिंदु वेताळ टेकडी समुद्रसपाटीपासून ८०० मीटरवर आहे तर शहराच्या जवळ असलेल्या सिंहगड किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १३०० मीटर आहे. पुणे शहर हे कोयना भूकंपप्रवण क्षेत्रात येते. कोयना गाव पुण्याच्या दक्षिणेस १०० किलोमीटरवर आहे. पुण्याला मध्यम व लहान भूकंप झालेले आहेत. कात्रज येथे मे १७, २००४ रोजी ३.२ रिश्टर स्केल चा भूकंप झाला होता.

नद्या संपादन करा
पुणे शहराच्या हद्दीतून मुळा, मुठा, पवना, राम व देव या नद्या वाहतात.

पुणे शहराचा विस्तार:

पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये येणारा परिसर
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीमध्ये येणारा परिसर
पुणे छावणी
खडकी छावणी
पुण्यातील देऊळे
पुण्याच्या परिसरातील अन्य मंदिरे संपादन करा
अरण्येश्वर
थेऊरचा चिंतामणी - गणपती
पद्मावती (सातारा रस्ता, पुणे)
पुण्यातील मठ
पुण्यातील स्मारके, समाध्या संपादन करा
कस्तुरबा गांधी यांची समाधी (आगाखान पॅलेस)
गंगाधर केळकर यांच्या स्मरणार्थ त्यांच्या दहनभूमीवर त्यांच्या दिनकर आणि भास्कर या दोन मुलांनी १९२८मध्ये उभारलेला स्तूप (ओंकारेश्वर पुलाखाली बालगंधर्व मंदिराशेजारी)
गुंजाळ घराण्यातील सतीचे वृंदावन (हे लकडी पुलाच्या अलीकडे नारायण पेठेच्या बाजूला होते, पुलाच्या भरावात गाडले गेले)
जंगली महाराज यांची समाधी (जंगली महाराज रोड)
नानासाहेब पेशवे यांची समाधी (पर्वती)
नानासाहेब पेशवे यांची समाधी (मुठा नदीकाठी पूना हॉस्पिटलजवळ).
बाबा महाराज समाधी (मॉडेल कॉलनी)
मौलाना अबुल कलाम आझाद स्मारक (कोरेगाव पार्क)
लोकमान्य टिळकांना समर्पित केलेले टिळक स्मारक मंदिर हे सभागृह (टिळक रोड)
सवाई गंधर्व स्मारक (गणेशखिंड)
सावरकर स्मारक (नवी पेठ एस.एम. जोशी पुलानजीक)
नारायणराव पेशव्यांच्या दहनाची जागा दाखवणारा दगडी चौथरा (हा लकडी पुलाच्या अलीकडे नारायण पेठेच्या बाजूला होता; आता दिसत नाही)
पहिल्या महायुद्धात मरण पावलेल्या मराठी सैनिकांचे दगडी स्मारक (शनिवारवाड्यासमोर बाजीराव पुतळ्याच्या जागी होते. १९४० साली पुणे कॅन्टॉनमेन्टमध्ये हलवण्यात आले.) : १९२१मध्ये या स्मारकाचे भूमिपूजन प्रिन्स ऑफ वेल्सच्या हस्ते झाले होते. नोव्हेंबर १९२२मध्ये या स्मारकाचे उद्‌घाटन झाले. स्मारकासाठी तत्कालीन संस्थानिकांनी व नागरिकांनी निधी उभा केला होता.
१८५७सालच्या स्वातंत्र्ययुद्धात लढलेल्याच्या स्मरणार्थ उभारलेला क्रांतिस्तंभ (सारस बाग)
माधवराव पेशव्यांच्या पत्‍नी रमाबाई यांचे सतीचे वृंदावन (थेऊर)
संत ज्ञानेश्वरांची समाधी (आळंदी)
जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामध्ये रांजणगाव हे प्रसिध्द ठिकाण आहे.आणि या ठिकाणी वेहावेगल्या कंपन्या आहेत.
पुण्यातील असलेले नसलेले हौद
बगीचे आणि पोहण्याचे तलाव
पुण्यातील ’प्रवेशद्वारे नसलेली गेटे’ संपादन करा
एकेकाळी पुण्यात पोलीस चौकीला पोलीस गेट म्हटले जाई. अशीच काही पुण्यातील गेटे खालील यादीत आहेत. या बहुतेक गेटांच्या ठिकाणी आजही पोलीस चौक्या आहेत.[ दुजोरा हवा]

कोंढवा गेट
क्वार्टर गेट
जाईचे गेट (हे सदाशिव पेठेत होते, आता अस्तित्वात नाही.)
पूल गेट
पेरू गेट
फडगेट
मरीआई गेट
म्हसोबा गेट
रामोशी गेट
स्वारगेट
पुणे शहरातील बगीचे नसलेल्या बागा (Baugs) संपादन करा
आदमबाग
आनंद गार्डन (रेस्टॉरन्ट)
ओशो झेन बाग
कबीर बाग
कौसरबाग, कोंढवा
चिमण बाग
ठुबे पार्क, शिवाजीनगर
ढमढेरे बाग
‎तुळशीबाग
त्रिकोणी बाग, माडीवाले कॉलनी
नातूबाग
निर्मल पार्क (पद्मावती)
पटवर्धन बाग (या बागेच्या परिसरात श्यामाप्रसाद मुखर्जी नावाचे एक उद्यान झाले आहे.)
पुरंदरे बाग (आता अस्तित्वात नाही)
पेरूचा बाग
पेशवे बाग
फाटकबाग (म्हात्रे पुलाजवळ)
बेलबाग
भिडेबाग
भुजबळ बाग (बिल्डर्स)
माणिकबाग
मिलन गार्डन (हे धनकवडीमधील एक उपाहारगृह आहे)
मीनल गार्डन (ही दीनानाथ हॉस्पिटलजवळची एक वसाहत आहे)
मोतीबाग
योगी गार्डन (हॉटेल)
रमणबाग
राम बाग
वर्तक बाग, एरंडवणे
वसंतबाग
सॅलिसबरी पार्क
सारस बाग
सिताफळ बाग
सुपारीबाग
सोपानबाग
हिराबाग
डोंगर आणि टेकड्या
खिंडी
नद्या, तलाव, हौद आणि नाले
पूल
रेल्वे मार्गाच्या वरचे पूल आणि खालचे सबवे
उड्डाणपूल
पुतळे संपादन करा
पुणे शहरात रस्त्यारस्त्यात उभे केलेले शेकडो पुतळे आहेत. त्यांतील किमान ७७ पुतळे पुण्याच्या मध्यभागात आहेत. ३७ पूर्णाकृती व ४०० अर्धपुतळे आहेत. १३ पुतळे तर केवळ स्वारगेट-मार्केटयार्ड परिसरातच आहेत. या पुतळ्यांची देखभालही केली जात नाही.. शहरात वाहतुकीला अडथळा ठरू शकणारेही बरेच पुतळे आहेत. पुण्यात फक्त शिवाजी महाराजांचे कमीतकमी चाळीस पुतळे आहेत. त्यांशिवाय अन्य पुतळेही आहेत. फुले मंडईमध्ये अगदी मध्यभागी असलेला विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा अर्ध पुतळा मंडईतील समाजकंटक दलालांनी काही वर्षांपूर्वी उखडून नष्ट केला, तो परत बसवला गेला नाही. जिजामाता उद्यानातील एक मूर्तिसमूहात असलेला दादोजी कोंडदेवांचा पुतळा तोडून काढला, तोही परत बसवला गेला नाही. पुणे विद्यापीठामध्ये एका खासगी संस्थेने बसविलेला डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा चांगला नाही या कारणास्तव तो तोडून त्या जागी विद्यापीठ स्व-खर्चाने नवीन पुतळा बसवणार आहे.

गेल्या काही वर्षांत बरेच पुतळे काढून टाकले किंवा हलवून दुसर्‍या जागी नेले आहेत. उदाहराणार्थ, कोथरूडमधील महर्षी कर्वे यांचा पुतळा चौकातून हटवून कर्वे रोडच्या एका कोपर्‍यात प्रथापित केला आहे. स्वार गेट चौकातला केशवराव जेधे यांचा पुतळा हलवून स्वार गेट काॅर्नरला नेला आहे.

शिवाजी रोडवरील शनिवारवाड्याजवळचा काकासाहेब गाडगिळांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ झालेल्या अपघातात अथर्व डोंगरे या शाळकरी मुलाचा २००८ साली मृत्यू झाल्यानंतरही तो पुतळा अजून तेथेच आहे. त्या पुतळ्याची नीट निगाही राखली जात नाही.

पुणे महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणत पुण्यातील एकूण २३ पुतळे चौकाच्या मध्येच आढळले असून असून रहादारीला अडथळा करणारे आहेत. जिथे टिळक रोड आणि बाजीराव रोड मितात त्या पुरम चौकातील अभिनव शाळेजवळ वसंतराव पाटलांचा पुतळा आहे. तो पुतळा सणस मैदानात वसंतराव पाटलांच्याच स्मरणार्थ बांधलेल्या सभागृहात हलवावा अशी सूचना होऊनही, तो पुतळा तेथेच रहदारीला अडथळा करीत उभा आहे. दुरवस्थेत असलेला बाजीराव रोडवरील बाबुराव सणसांचा पुतळा हटवून सणस मैदानावर नेण्याचा ठरावही अजून बासनात आहे.

पुण्यात सध्या (२०१४) असलेल्या काही पुतळ्यांची जंत्री :

स्वारगेट-मार्केटयार्ड परिसरातील पुतळ्यांची यादी
सणस पुतळा - बाबूराव सणस (पुणे महापालिकेचे पहिले महापौर) : हा पुतळा सुस्थितीत नाही.
अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा
जमनालाल बजाज पुतळा
अहिल्यादेवी होळकर पुतळा
सावित्रीबाई फुले पुतळा
सावरकर पुतळा
फाटक गुरुजी पुतळा
काकासाहेब गाडगीळ पुतळा (शनिवारवाड्याजवळ)
वसंतदादा पुतळा (स्वारगेट चौकात)
जेधे पुतळा (स्वारगेट चौकात)
नेहरू पुतळा
भाऊराव पाटील पुतळा
शिवाजी पुतळा (श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल मधील)
अन्य ठिकाणचे पुतळे
कर्वे पुतळा, कोथरूड
पहिला बाजीराव पुतळा, शनिवारवाडा
झाशीची राणी लक्ष्मीबाई पुतळा, संभाजी उद्यान
प्रमोद महाले यांचा पुतळा, सुपर मार्केट चौक, पूर्वी दीप बंगला चौक (पुणे)
आचार्य अत्रे पुतळा, बालगंधर्व नाट्यगृहाजवळील सावरकर भवनपाशी
महात्मा फुले पुतळा, पुणे विद्यापीठ
शाहू पुतळा, एस्‌एस्‌पी‍ए्म्‌‍एस (पुणे)
सावरकर पुतळा, सारसबाग (पुणे),
संभाजीचा अर्ध पुतळा, गरवारे उड्डाण पूल,डेक्कन जिमखाना (पुणे), वगैरे.
पेठा संपादन करा
पुणे हे पेठांचे शहर म्हणून प्रसिद्ध होते. पुणे शहर हे पूर्वीच्या मध्यवस्तीतल्या नदीकाठच्या पेठांपासून वाढत जाऊन, नवीन उपनगरे जोडली जात विस्तारत गेले आहे. या पेठांची नावे बहुतकरून आठवड्यातील वारांनुसार, तसेच ज्यांनी या पेठा वसवल्या अशा इतिहासकालीन व्यक्तींच्या नावांवरून- नाना फडणीस, नारायणराव पेशवे, सदाशिवरावभाऊ, सरदार रास्ते- ठेवली गेली आहेत. इ.स. १६२५ मध्ये शहाजीराजे भोसले यांनी रंगो बापूजी धडफळे यांची पुण्याच्या प्रशासकपदी नियुक्ती केली. रंगो बापूजी धडफळे यांनी कसबा पेठ, सोमवार पेठ, रविवार पेठ आणि शनिवार पेठ या पेठा बांधल्या. इ.स. १६३० मधील आदिलशहाच्या हल्ल्यानंतर दादोजी कोंडदेव यांनी या पेठांची पुन्हा उभारणी केली. पुण्यातील पेठांची नामावली अशी:
कसबा पेठ, रविवार पेठ ऊर्फ मलकापूर पेठ, सोमवार पेठ (हिला शाहापूर पेठ म्हणत), मंगळवार पेठ (हिची जुनी नावे अष्टपुरा व शास्तापुरा पेठ), बुधवार पेठ ऊर्फ मुहियाबाद पेठ, गुरुवार पेठ ऊर्फ वेताळ पेठ, शुक्रवार पेठ (जुने नाव विसापूर), शनिवार पेठ, गंज पेठ ऊर्फ मीठगंज (महात्मा फुले पेठ ?), सदाशिव पेठ, नवी पेठ, नारायण पेठ, भवानी पेठ, मलकापूर पेठ (म्हणजेच रविवार पेठ), मुहियाबाद पेठ (म्हणजेच बुधवार पेठ), नाना पेठ, रास्ता पेठ (जुने नाव शिवपुरी पेठ), गणेश पेठ, वेताळ पेठ (म्हणजेच गुरुवार पेठ), सेनादत्त पेठ, नागेश पेठ (म्हणजेच न्याहाल पेठ), भवानी पेठ (टिम्बर मार्केट असलेली), घोरपडे पेठ. गुरुवार पेठ.

पुण्यातल्या रस्ते-चौक-वस्त्या आदींची खास नावे
गल्ल्या, बोळ, आळ्या
प्रसिद्ध वाडे संपादन करा
गायकवाड वाडा (केसरी वाडा) : हा लोकमान्य टिळकांनी विकत घेऊन तेथे केसरी-मराठा वर्तमानपत्रांचे कार्यालय काढले. टिळक तेथेच राहात.
नाना वाडा : हा नाना फडणविसांनी बांधला. येथे टिळक-आगरकर-चिपळूणकरांनी स्थापन केलेली डेक्कन एज्युकेशन सोसायटीची ’न्यू इंग्लिश स्कूल’ होती.
पुरंदरे वाडा - का कसबा पेठेत नव्यापुलाशेजारी आहे.
भिडे वाडा : हा वाडा भिड्यांनी जोतिबा फुले यांना मुलींची शाळा काढण्यासाठी दिला.
मुजुमदार वाडा : हा कसबा पेठेत मुजुमदारांच्या बोळात आहे. या वाड्यात होणार्‍या गणेशोत्सवात नामवंत संगीतकार हजेरी लावत असत.
रास्तेवाडा : हा वाडा माधवराव पेशव्यांनी बांधून सरदार रास्त्यांना दिला. हल्ली येथे ‘आगरकर हायस्कूल’ ही मुलींची शाळा आहे. कधीकाळी आचार्य अत्रे या शाळेचे मुख्याध्यापक होते, आणि अभिनेत्री वनमाला शिक्षिका.
विश्रामबाग वाडा : येथे एक संग्रहालय आहे. वाड्याच्या बाजूच्या भागात पोस्ट ऑफिस आहे. पूर्वी या वाड्याच्या दर्शनी भागात म्युनिसिपालिटीचे जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालय होते.
शनिवारवाडा : बाजीराव पेशव्यांनी बांधला. येथे पेशव्यांचे घर आणि कार्यालय होते.
होळकर वाडा : शनिवार पेठेतील या वाड्यात ‘अहिल्यादेवी गर्ल्स हायस्कूल’ आहे.
पडी, वड्या आणि वाड्या
उपनगरे
हवामान संपादन करा

सिंहगडचा पुणे दरवाजा
पुणे शहरात उन्हाळा, (मॉन्सून) पावसाळा व हिवाळा हे ऋतू अनुभवायाला मिळतात. उन्हाळा- मार्च ते मे (तापमान २५°-२९° से.) असतो व एप्रिल हा सर्वांत उष्ण महिना आहे. मे महिन्यात पावसाच्या सरी सुरू होतात. या महिन्यात उष्णता असतेच पण काही वेळेस दमटपणा अनुभवायला मिळतो. पुण्याच्या रात्री बर्‍यापैकी थंड असतात.

जून महिन्यातील अरबी समुद्रातून येणार्‍या मॉन्सून वार्‍यांमुळे पावसाळा सुरू होतो. पुण्याचे पर्जन्यमान वार्षिक ७२२ मि.मी. इतके आहे. जुलै महिन्यात सगळ्यात जास्त पाऊस पडतो. पर्जन्यमान मध्यम असले तरी अनेक वेळा पावसाच्या सरी पुणे शहरातील जीवनक्रम थांबवतात. पावसाळ्यात तापमान २०°-२८° सेल्शियस इतके असते.

मॉन्सूननंतर ऑक्टोबर महिन्यात दिवसाचे तापमान वाढते व रात्री थंड असतात. हिवाळा हा ऋतू नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यांपर्यंत असतो. पुण्याला भेट देण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. या काळात दिवसाचे तापमान २९°से तर रात्रीचे तापमान १०°से च्या खाली असते. डिसेंबर व जानेवारी महिन्यात तर तापमान ५-६°से पर्यंत उतरते. पुण्यात सर्वांत जास्त तापमान ४३.३°से इतके २० एप्रिल १९८७/७ मे १८८९ रोजी तर (१७८१-१९४० सालातील) सर्वांत कमी तापमान १.७°से १७ जानेवारी १९३५ला नोंदविले गेले. जानेवारी १९९१(?)मध्ये पुण्यात २.८°से इतके किमान तापमान नोंदवले गेले.

पुण्याच्या किमान तापमानाच्या काही नोंदी
२.८°से (२-१-१९९१)
४.०°से (३-१-१९९१)
४.४°से (१६-१-१९९४)
४.५°से (२१-२-१९९३)
४.७°से (२७-१-२००६)
४.८°से (२१-१-१९९७)
इसवी सन २००३ सालापासूनचे पुण्याच्या तापमानाचे नीचांक
२००३ : ६.९°से
२००४ : ८.२°से
२००५ : ५.९°से
२००६ : ४.७°से
२००७ : ८.३°से
२००८ : ५.८°से
२००९ : ८.५°से
२०१० : ६.५°से
२०११ : ५.३°से
२०१२ : ६.६°से
२०१३ (१४डिसेंबरपर्यंत) : ६.८°से
जैवविविधता संपादन करा
पुणे शहर टपाल कार्यालयापासून २५ कि.मी. त्रिज्येच्या परिसरात साधारणपणे, सपुष्प वनस्पतींच्या १०००, फुलपाखरांच्या १०४, पक्षांच्या ३५० आणि सस्तन प्राण्यांच्या ६४ प्रजाती आढळतात.

वृक्षसंपदा
दिल्ली हे भारतातील सर्वाधिक वृक्षसंख्या असलेले महानगर आहे. त्याखालोखाल बंगलोर, कलकत्ता, नागपूर आणि पुणे यांचे क्रमांक लागतात. असे असले तरी, पुणे शहर हे भारतातील सर्वाधिक वृक्षविविधता असलेले महानगर आहे असे वृक्ष‍अभ्यासक श्री.द. महाजन यांचे मत त्यांनी २००५साली एका राष्ट्रीय परिषदेत सादर केलेल्या निबंधात म्हटले होते. या वृक्षांपैकी ५० टक्के वृक्ष देशी आहेत.

पुणे महानगरात १९९८साली केलेल्या वृक्षगणनेनुसार सुमारे ३३ लाख वृक्ष होते. त्यांची जातिनिहाय नावे अशी :-

देशी वृक्ष
अंकोळ, अंजन, अंजनी, अजानवृक्ष, अर्जुन, अशोक, आईन (ऐन), आपटा, आंबा, आवळा, उंडी (कॅलोफिलम इनोफिल्युम), औदुंबर, धेड उंबर, कडुनिंब (नीम-लिंबोणी), कढीलिंब, बकान नीम (बकाणा), महानीम, कदंब, कनकचंपा, करंज, मोठा करमळ, कवठ, कहांडळ, कळम (कळंब), काकड, कांचन, पिवळा कांचन, रक्तकांचन, श्वेतकांचन, काजरा, काटेसावर किनई, काळा कुडा, पांढरा कुडा, कुंती, कुंभा, कुसुम (कुसुंब) किंवा कोशिंब, कोकम, खडशिंगी, खरवत, खिरणी, खेजडी म्हणजेच शमी (प्रोसोपिस सिनेरारिया), खैर, गरुडवेल, गुंज, रतनगुंज, गेळा, गोळ, घटबोर, चंदन, चंदनचारोळी, चारोळी, चाफा, नागचाफा, सोनचाफा, चिंच, चिचवा, चीड (सरल किंवा पाईन - पायनस एक्सेलसा), जांभूळ, जायफळ, टेटू, टेमरू, टोकफळ, डलमारा, ताड, तांबट, तामण, दहीवण, दालचिनी, देवदार, धामण, धावडा, महाधावडा, रेशीम धावडा, नाणा, नांद्रुक (नांदुरकी), निरगुडी, नेपती, पळस, काळा पळस (तिवस किंवा रथद्रुम), पांगारा, बूच पांगारा, रानपांगारा, पाचुंदा, पाडळ, पायर, पारिजातक, पिंपळ, परस पिंपळ, पुत्रंजीव, पेटरा, पेटारी, पोलकी, फणस, फणशी, फालसा, बकुळ, जंगली बदाम, बहावा, बाभूळ, दुरंगी बाभूळ, बारतोंडी, बिब्बा, बीजा, बुरगुंड, बुरास, बूच, बेल, बेहडा, बोर, भुत्या, भूर्जपत्र, भेरा, भोकर, भोमा, माड, भेरली माड, मारवा, मुचकुंद, मेडशिंगी, मोई, मोखा, मोह, दक्षिण मोह, रबराचे झाड, रिठा, रुद्राक्ष, रोजवुड (शीशम-शिसवीचे झाड), रोहितक, लकूच, वड, वानवृक्ष, वायवर्ण, वारंग, पिवळा वारस, वावळ, वाळुंज (सावरकर स्मारकाजवळ असलेले हे झाड एकमेव आहे), शिवण, शिरीष, काळा शिरीष, संदन, साग, सालई, सुकाणू, सुपारी, सुरंगी, सोनसावर ऊर्फ गणेर (कोच्लोस्पेरम रेलिजियोसम), हिरडा, हिवर, वगैरे.

परदेशी वृक्ष
अगस्ता (हादगा), अनंत (केप जॅस्मिन), ट्री अँटिगोनान, रोज ॲपल (जाम), स्टार ॲपल, अंब्रेला ट्री, खोटा अशोक (पानाचा अशोक, मास्ट ट्री), आँकोबा, ऑर्किड ट्री (बटरफ्लाय फ्लॉवर), हाँगकाँग ऑर्किड ट्री, ब्राझिलियन आयर्नवुड, ऑलिव्ह, ऑस्ट्रेलियन चेस्टनट (न्यू इंग्लिश स्कूल समोर पंताच्या गोटात हे दुर्मीळ झाड आहे), मोगली एरंड (जट्रोफा), सिल्व्हर ओक, ऊर्वशी (ॲमहर्स्टिया नोबिलिस), कँडल ट्री, कण्हेर, पिवळा कण्हेर (बिट्टी), कँपेची ट्री (लॉगवुड), कमरक (करंबोला), कॅशियाच्या अनेक जाती, गुलाबी कॅशिया, रेड कॅशिया, काशीद (सयामी कॅशिया), कॉपर पॉड ट्री, इंडियन कॉर्क ट्री, स्कार्लेट कॉर्डिया, कॉलव्हिल्स ग्लोरी, काशीद (सयामी कॅशिया), कैलासपती (कॅननबॉल ट्री), कनांगा (यांग यांग), क्रेप मिर्टल, क्लुसिया (फॅट पोर्क ट्री), ख्रिसमस ट्री (ऑराकरिया), गमग्वायकम (लिग्नम व्हिटी), गिरिपुष्प (ग्लिरिसिडिया), गुजबेरी ट्री, गोल्डन बेल (पिवळा टॅबुबिया), पांढरा चाफा (डेडमॅन्स प्लॉवर, टेंपल ट्री), कवठी चाफा, तांबडा चाफा (रेड फ्लँगिपनी), गोरखचिंच (बाओबाब), विलायती चिंच (इमली), चेंडूफळ (पार्किया), सिंगापूर चेरी, ऑस्ट्रेलियन चेस्टनट, जॅक्विनिया, जाम, टॅबुबियाच्या अनेक जाती, टॅबुबिया ॲव्हेलेनेडी, पिवळा टॅबुबिया (गोल्डन बेल), टिकोमा, आफ्रिकन ट्युलिप ट्री (स्पॅथोडिया), रोझी ट्रंपेट ट्री, ट्रॅव्हेलर्स ट्री, डाँबेया (वेडिंग प्लँट), डेडमॅन्स फ्लॉवर (टेंपल ट्री, पांढरा चाफा), ड्रासिना, तुती (मलबेरी), तुमा (मिलेशिया), जेरुसलेम थॉर्न, दिवी दिवी, निलगिरी (युकॅलिप्टस), पर्जन्य वृक्ष (रेन ट्री), ब्लॅक पर्ल, पामच्या अनेक जाती, अरेका पाम, चायनीज फॅन पाम, रॉयल पाम (बॉटल पाम), पावडरपफ, नीरफणस (ब्रेड फ्रूट ट्री), फिडल लीफ फ़िग, फिडल वुड ट्री, फ्लॉस सिल्क ट्री, बूच, तेल्पा माड (ऑइल पाम), गुलमोहर (फ्लँबॉयंट ट्री), नीलमोहर (जॅकारंडा), पीतमोहर (पेल्ट्रोफोरम), बटर फ्रूट ट्री (ॲव्होकॅडो), खोटा बदाम, बरसेरा (अत्तराचे झाड-लव्हेंडर ट्री), बिलिंबी, बिट्टी (पिवळा कण्हेर), बेगर्स बाऊल, बॉटल ब्रश, ऑस्ट्रेलियन बाभूळ, ब्रह्मदंड (सॉसेज ट्री), ब्लडवुड ट्री, ब्राउनिया, भद्राक्ष (गाउझुमा), मलबेरी (तुती), पेपर मलबेरी, महोगनी, आफ्रिकन महोगनी, मारखामिया, मोरपंखी (थूजा), राय‍आवळा, चेंजेबल रोज ट्री, लक्ष्मीतरू (सायमारुबा), शंबुकोश (सांबुकस), शेर (मिल्क बुश), संकासुर (शंखासुर, पीकॉक फ्लॉवर ट्री), मोठी सातवीण, गुलाबी सावर (शेविंग ब्रश ट्री), दिल्ली सावर, पांढरी सावर (कपोक), सॉसेज ट्री (ब्रह्मदंड), सुरू (कॅश्युरिना, खडसावर), सुबाभूळ (हॉर्स टॅमेरिंड, लुकेना), हुरा (सँडबॉक्स ट्री), स्पॅथोडिया (आफ्रिकन ट्युलिप ट्री), वगैरे.

हेही पहा : पुणे परिसरातील वृक्ष
पुण्यातील पक्षी संपादन करा
पुण्यात सुमारे ४०० जातींचे पक्षी आढळतात. त्यापैकी १५० जातींच्या पक्ष्यांची प्रभाकर कुकडोलकर यांनी काढलेली छायाचित्रे या ‘पुण्याचे पक्षी वैभव’ या पुस्तकात आहेत. या १५० जातींपैकी ४०हून अधिक जाती सहसा आढळून न येण्यार्‍या आहेत.

अर्थकारण
प्रशासन संपादन करा
नागरी प्रशासन संपादन करा

महानगरपालिका इमारत
पुणे शहराची व्यवस्था पुणे महानगरपालिका पाहते. महानगरपालिकेचे कार्यक्षेत्र नागरी प्रशासन व पायाभूत सेवा-सुविधा पुरवणे हे असते. प्रशासकीय प्रमुख या नात्याने बहुतांश कार्यकारी अधिकार महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या आय.ए.एस. अधिकारी दर्जाच्या महापालिका आयुक्ताकडे असतात. महानगरपालिका मतदारांनी निवडून दिलेल्या नगरसेवकांनी बनते. नगरसेवकांचे नेतृत्व महापौर या पदावरील व्यक्तीकडे असते. महापौर हे केवळ नाममात्र पद असून या पदाकडे अधिकार कमी असतात. पुणे महापालिकेचे क्षेत्र हे ४८ प्रभागात विभागले गेले असून प्रत्येक विभागाचे कामकाज साहाय्यक आयुक्त पहात असतात. राज्यातील जवळजवळ सर्व राजकीय पक्ष आपले उमेदवार महापालिकेच्या नगरसभेवर निवडून येण्यासाठी उभे करतात.

जिल्हा प्रशासन संपादन करा
अधिक माहितीसाठी पहा पुणे जिल्हा

पुणे शहर महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यात आहे. जिल्ह्याचा प्रमुख जिल्हाधिकारी हा असतो व त्याचे काम सातबारा, जमीनजुमल्याच्या नोंदी ठेवणे, राज्य सरकाराकरिता सारावसुली, करवसुली व निवडणुकीचे व्यवस्थापन करणे हे असते.

महानगर पोलीस यंत्रणा संपादन करा
पोलीस आयुक्त हा पुणे पोलिसांचा प्रमुख असतो. यो राज्याच्या गृह मंत्रालयाने नेमलेला एक आय. पी. एस्‌. अधिकारी असतो. पुणे पोलीस व्यवस्था ही महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत येते.

वाहतूक व्यवस्था संपादन करा

पुण्यातील रस्त्यावरील एक दृष्य

पुणे शहराबाहेरून जाणार्‍या मुंबई-बंगलोर महामार्गाचे चित्र
पुणे शहर भारताच्या इतर महत्त्वाच्या शहरांशी रस्ता, रेल्वे व हवाईमार्गाने चांगल्या प्रकारे जोडले गेले आहे. पुणे विमानतळावरुन एक मिलिटरी विमानतळ आहे. पूर्वी फक्त देशांतर्गत वाहतूक चालत असे पण आता सिंगापूर व दुबईला जाणार्‍या उड्डाणांमुळे, विमानतळ आंतरराष्ट्रीय झाला आहे.


पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक

रात्री दिसणारा सिंहगड रस्ता
नवा ग्रीनफिल्ड पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प महाराष्ट्र सरकार सुरू करणार असून तो चाकण व राजगुरुनगर या गावांमधील चांदूस व शिरोळी यांच्या जवळ (पुण्यापासून ४० कि.मी. अंतरावर) होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाची जबाबदारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे सोपवली गेली आहे.

 
पुणे उपनगरी रेल्वे
शहरात पुणे व शिवाजीनगर ही दोन महत्त्वाची रेल्वे स्थानके आहेत. पुणे स्थानकावर सर्व रेल्वेगाड्या थांबतात. पुणे व लोणावळादरम्यान उपनगरी रेल्वे वाहतूक चालते. त्यामुळे पिंपरी, खडकी व चिंचवड ही उपनगरे शहराशी जोडली गेली आहेत. पुण्याच्या उपनगरी गाड्या लोणावळ्यापर्यंत जातात तर मुंबईच्या कर्जत पर्यंत येतात. मध्ये फक्त घाटमार्ग आहे. रेल्वे प्रशासन लोणावळा व कर्जत/खोपोली ह्या गावांदरम्यानही स्थानिक उपनगरी गाड्या चालू करण्य़ाचा विचार करीत आहे. असे होऊ शकले तर, पुणे-मुंबईच्या दरम्यान असलेल्या कुठल्याही स्थानकावरून दुसर्‍या कुठल्याही स्थानकाला गाडी न बदलता जाता येईल. कर्जत-पनवेल लोहमार्ग तयार झाला असून त्यामुळे पुणे-मुंबई शहरातील अंतर २९ कि.मी.ने कमी झाले आहे. मात्र या मार्गावरून अजून फार गाड्या धावत नाहीत.

पुणे व मुंबई दरम्यानची रस्तावाहतूक मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गामुळे वेगवान झाली आहे. यामुळे दोन्ही शहरांदरम्यान केवळ तीन तासांचे अंतर राहिले आहे. शासकीय व खाजगी बससेवा पुण्याला मुंबई, हैदराबाद व बंगळूर या शहरांशी जोडतात. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे (एस.टी) बससेवा पुण्याला महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाशी जोडते.

पुणे शहर हे महत्त्वाचे आय.टी. (इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी) केंद्र आहे. पुण्यात चाकरमानी वाढत आहेत त्याचबरोबर गाड्या(कार)/दुचाक्यांची संख्या वाढत आहे. २००५ मध्ये पुण्याच्या १४६ चौ.कि.मी क्षेत्रफळात २०,००,०० कार (मोटारगाड्या) व १०,००,००० दुचाक्या होत्या असे एका अभ्यासात नमूद केले आहे.

तीन माणसे बसू शकतील अशा रिक्षा हे शहरांतर्गत वाहतुकीचे मुख्य साधन आहे. डिसेंबर २०१४ मध्ये पुण्यात सुमारे ५० हजार ऑटोरिक्षा होत्या. त्यांपैकी पेट्रोलवर चालणार्‍या ११,३१२, डिझेलवरच्या १,९८४, सीएनजी (काँप्रेस्ड नॅचरल गॅस)वरच्या २७,०९४ तर एलपीजी (लिक्विड पेट्रोलियम गॅस)वर चालणार्‍या ३,९५१ रिक्षा होत्या. हे आकडे पिंपरी-चिंचवडसाठी अनुक्रमे, १,५६८, ८०६, २,८२१ आणि ३६ होते.

पुण्यातील उपनगरे कल्याणीनगर, विमाननगर, मगरपट्टा, पिंपरी, चिंववड, बाणेर, वाकड, औंध, हिंजवडी, बिबवेवाडी, वानवडी, निगडी-प्राधिकरण झपाट्याने वाढत आहेत पण अरुंद रस्ते वाढत्या वाहनांना कमी पडत आहेत. रस्ता रुंदीकरण, उड्डाणपूल वगैरे प्रकल्प अनेक वर्षे प्रलंबित आहेत. काही पूल बांधून तयार झाले आहेत. तरीही, महापालिका प्रशासनाच्या दिरंगाईमुळे योजना अंमलात यायला खूप वेळ लागतो.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येसाठी अपुरी ठरत आहे. पी.एम.टी. (पुणे म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट) व पी.सी.एम.टी. (पिंपरी-चिंचवड म्युनिसिपल ट्रान्स्पोर्ट) या अनुक्रमे पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वाहतूक व्यवस्थांचे एकत्रीकरण होऊन आता पी.एम.पी.एल. (पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड) ही संस्था पुण्याची सार्वजनिक बस वाहतूक सांभाळते. वाहतूक-कोंडीमुळे मोटारगाडीचालक व दुचाकीचालक त्रस्त असतात, तर पार्किंगची अपुरी व्यवस्था त्यांना आणखी जेरीस आणते.

पुणे रेल्वे स्थानक
लोकजीवन संपादन करा
पुणे शहराच्या लोकसंख्येत गेल्या २० वर्षापासून मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. १९९१ च्या जनगणनेनुसार पुणे शहराची लोकसंख्या ११ लाख होती. २००१ साली ती २५ लाख झाली. २०११ साली ती ५० लाखाच्या वर जाण्याची शक्यता आहे, ज्यात पिंपरी चिंचवड ह्या जुळ्या शहराची लोकसंख्याही समाविष्ट आहे. पुणे हे भारतातील सातवे सर्वांत मोठे शहर आहे परंतु पुण्याच्या शहरी अर्थव्यवस्थेचा क्रमांक सहावा आहे. पुण्याचा दरडोई उत्पन्नाबाबत (per capita income) पहिला क्रमांक लागतो.

पुण्यात राहणार्‍यांना पुणेकर असे संबोधतात. शहराची मुख्य भाषा मराठी असून इंग्रजी व हिंदी भाषादेखील बोलल्या जातात. पुणे शहरात सॉफ्टवेअर व वाहननिर्मिती व्यवसायात झपाट्याने गुंतवणूक होत आहे. त्यामुळे नोकरीच्या शोधात परप्रांतीय शहरात दाखल होत आहेत व लोकसंख्येत भर पडत आहे. पुणे शहराच्या विकासाबरोबर पुणे शहरामध्ये गुन्हेगारीचे प्रमाणही वाढले आहे. शांत समजले जाणारे पुणे शहर १४/०२/२०१० रोजी झालेल्या बॉम्बस्फोटामुळे हादरले.

काही अपवाद वगळता पुणे हे भारतातील एक कायदा आणि सुव्यवस्था असलेले प्रगतीशील शहर समजले जाते.

पुण्याची भगिनी शहरे
संस्कृती
संगीत विद्यालये
संगीत विषयक कार्यक्रम करणाऱ्या संस्था आणि त्यांचे कार्यक्रम
धर्म-अध्यात्म
प्रसारमाध्यमे
शिक्षण संपादन करा

पुणे विद्यापीठ
भारताच्या स्वातंत्र्यानंतर पुणे हे शिक्षण व संशोधन क्षेत्रात आपले वर्चस्व गाजवू लागले. पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) या संस्था स्थापन झाल्यामुळे पुण्याला हे शक्य झाले. फर्ग्युसन महाविद्यालय, स.प. महाविद्यालय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय या संस्थांमुळे पुणे हे इ.स. १९०० पासुन नामांकित होतेच.

पुण्याला जवाहरलाल नेहरू यांनी पूर्वेकडचे ऑक्सफर्ड असे संबोधले होते. पुण्यात अनेक नामांकित शिक्षण संस्था आहेत. येथे शिकायला देशातून व परदेशातूनही विद्यार्थी येत असतात. पुणेकरदेखील उच्च शिक्षण-संशोधनाबद्दल जागृत आहेत.

शहरात सर्व विषयातील उच्च शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध आहेत. पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (NCL), आयुका (IUCAA), आघारकर संशोधन संस्था (ARI), सी-डॅक (C-DAC), राष्ट्रीय विषाणु विज्ञान संस्था (NIV), राष्ट्रीय कोषिका विज्ञान संस्था (NCCS), यशदा, भांडारकर संशोधन संस्था, द्राक्षे- राष्ट्रीय संशोधन केंद्र (NRC-Grapes), कांदा आणि लसूण- राष्ट्रीय संशोधन केंद्र (NRC- Onion and Garlic), राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था (NARI), भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (IISER), ईर्षा (IRSHA), वनस्पती सर्वेक्षण संस्था (BSI), सैन्यदलांचे मेडिकल कॉलेज (AFMC), राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्र (NCRA) सारख्या अनेक संस्था आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन करत आहेत.

शालेय व विशेष शिक्षण संपादन करा
पुणे महानगरपालिका अनेक शाळा चालवते. परंतु पालकांचा कल मुलांना खाजगी शाळेत घालण्याकडे असतो.

यातील सर्व शाळा या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (SSC Board) किंवा केंद्रीय बोर्ड (सीबीएसई) या संस्थांशी संलग्न असतात. काही शाळा सीनियर केंब्रिज पुरस्कृत ICSE अभ्यासक्रम चालवतात. पुणे हे जपानी भाषेच्या शिक्षणाचे भारतातील सर्वांत मोठे केंद्र आहे. पुणे विद्यापीठासह इतरही अनेक संस्था जपानी भा़षेचे शिक्षण देतात. जर्मन (मॅक्स म्युलर भवन), फ्रेंच (आलियाँस फ्राँसे द पूना) या भाषादेखील (कंसात दिलेल्या संस्थांमध्ये) शिकविल्या जातात. काही शाळा इयत्ता आठवीपासून रशियन, जर्मन व फ्रेंच या भाषा पर्यायी विषय म्हणून शिकवतात. रमण बाग प्रशाला,न्यू इंग्लिश स्कूल, ज्ञान प्रबोधिनी प्रशाला, अक्षरनंदन, नू.म.वि., साधना विद्यालय हडपसर या काही शाळा पुण्यात प्रसिद्ध आहेत.

 
ज्ञान प्रबोधिनी पुणे वास्तू कळस
उच्च शिक्षण संपादन करा
पुणे परिसरातील विद्यापीठे संपादन करा
विद्यापीठाचे नाव विद्यापीठाचा प्रकार व्यवस्थापन
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ (जुनी नावे - भारतवर्षीय महिला विद्यापीठ; इंडियन विमेन्स युनिव्हर्सिटी) वैधानिक विद्यापीठ राज्य शासन
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वैधानिक विद्यापीठ राज्य शासन
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (इग्नू) - अभ्यास केंद्र वैधानिक, मुक्त विद्यापीठ केंद्र शासन
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (वायसीएमओयु) - अभ्यास केंद्र वैधानिक, मुक्त विद्यापीठ राज्य शासन
डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी (डिआयएटी) अभिमत विद्यापीठ केंद्र शासन
गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था अभिमत विद्यापीठ खाजगी
टिळक महाराष्ट्र विद्यापीठ अभिमत विद्यापीठ खाजगी
डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठ राज्य शासन
भारती विद्यापीठ अभिमत विद्यापीठ खाजगी
सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ अभिमत विद्यापीठ खाजगी
डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ अभिमत विद्यापीठ खाजगी
डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी विश्वशांती विद्यापीठ  खाजगी विद्यापीठ खाजगी
एमआयटी आर्ट डिजाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ खाजगी विद्यापीठ खाजगी
विश्वकर्मा विद्यापीठ खाजगी विद्यापीठ खाजगी
अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठ खाजगी विद्यापीठ खाजगी
फ्लेम विद्यापीठ खाजगी विद्यापीठ खाजगी
स्पायसर ॲडवेंटिस्ट विद्यापीठ खाजगी विद्यापीठ खाजगी
सिंबायोसिस कौशल्य व मुक्त विद्यापीठ खाजगी विद्यापीठ खाजगी
पुणे परिसरातील स्वायत्त महाविद्यालये / संस्था संपादन करा
महाविद्यालय (कॉलेज) / संस्था (इन्स्टिट्यूट) प्रकार व्यवस्थापन
अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे संस्था राज्य शासन
विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी महाविद्यालय खाजगी
फर्ग्युसन महाविद्यालय महाविद्यालय खाजगी
सिंबायोसिस संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय महाविद्यालय खाजगी
जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालय संस्था खाजगी
इंडिअन इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट ॲण्ड मॅनेजमेंट स्टडीज ॲण्ड रिसर्च (इंडसर्च) संस्था खाजगी
कमिन्स अभियांत्रिकी महिला महाविद्यालय महाविद्यालय खाजगी
एमआयटी ॲकॅडमी ऑफ इंजिनियरिंग संस्था खाजगी
सेंट मीरा महिला महाविद्यालय महाविद्यालय खाजगी
पुणे परिसरातील इतर महत्त्वाची महाविद्यालये / अभ्यास केंद्रे संपादन करा
पुण्यातील बव्हंशी महाविद्यालये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न आहेत. काही महाविद्यालये अभिमत विद्यापीठांशी संलग्न आहेत.

कला/विज्ञान/वाणिज्य महाविद्यालये अभियांत्रिकी महाविद्यालये वैद्यकीय महाविद्यालये व्यवस्थापन महाविद्यालये इतर
नेस वाडिया महाविद्यालय एम.आय.टी. बी.जे. मेडिकल कॉलेज सिंबायोसिस राष्ट्रीय विमा अकादमी (नॅशनल इन्शुअरन्स अकॅडमी)
बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नोलॉजी लष्कराचे ए.एफ.एम.सी.(आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज) इंदिरा इन्स्टिट्यूट वाकड आय.एल.एस. विधि महाविद्यालय
आबासाहेब गरवारे महाविद्यालय भारती विद्यापीठाचे अभियांत्रिकी महाविद्यालय भारती विद्यापीठाचे वैद्यकीय महाविद्यालय पुणे विद्यापीठाचा व्यवस्थापनशास्त्र विभाग (पुम्बा) भारतीय विद्याभ्यास (आयुर्वेद व सामाजिक शास्त्रे)
नौरोसजी वाडिया महाविद्यालय आय.एम.डी.आर.
स.प. महाविद्यालय
मॉडर्न महाविद्यालय, पुणे
पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून दरवर्षी १०,००० इंजिनियर यशस्वी होऊन बाहेर पडतात.

संशोधन संस्था संपादन करा
पुणे विद्यापीठाव्यतिरिक्त पुण्यात अनेक सुप्रसिद्ध व महत्त्वाच्या संशोधन संस्था आहेत. विद्यापीठाजवळ राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आहे तर विद्यापीठाच्या आवारात आयुका, नॅशनल सेंटर फॉर रेडिओ स्ट्रोफिजिक्स व नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, राष्ट्रीय विमा अकादमी, केंद्रीय जल शक्ती संशोधन संस्था (Central Water and Power Research Station), उष्ण कटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, आघारकर संशोधन संस्था, ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया व राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था या संस्थाही पुण्यात आहेत.

 
भांडारकर प्राच्य विद्या संस्था
लष्करच्या शिक्षण व संशोधन संस्था संपादन करा
लष्करी शिक्षण देणार्‍या अनेक संस्था पुण्यात आहेत. श्री शिवाजी मराठा प्रिपरेटरी स्कूल (एस्‌‍एस्‌पीएम्‌‍एस), राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए), कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरिंग (सीएम्ई), आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल ट्रेनिंग वगैरे. लष्कराच्या आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजचे (ए.एफ.एम.सी. वैद्यकीय महाविद्यालयाचे) विद्यार्थी भारतीय लष्कराच्या सेवेसाठी रूजू होतात. आर्मामेंट रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट, डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी (जुने नाव - डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ आर्मामेंट टेक्नॉलॉजी), एक्सप्लोझिव्ह रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट लॅबोरेटरी, डिफेन्स रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन व आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या लष्कराशी संबंधित संशोधन करणार्‍या संस्था देखील पुण्यात आहेत.

संपादन करा
खेळ
पर्यटन स्थळे संपादन करा
संग्रहालये (एकूण ३० पैकी १६) संपादन करा
आगाखान पॅलेस संग्रहालय
पुणे रेल्वे स्टेशनजवळचे आदिवासी संग्रहालय
सिंबायोसिसमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्युझियम
आर्य नागार्जुन संग्रहालय
जोशी म्युझियम ऑफ मिनिएचर रेल्वेज
डेक्कन कॉलेज पुरातत्त्व संग्रहालय
दर्शन संग्रहालय* सिंबायोसिस सोसायटीचे ॲफ्रो एशियन कल्चरल म्युझियम
बाहुली संग्रहालय (निर्माणाधीन)
ब्लेड्स ऑफ ग्लोरी क्रिकेट म्युझियम (पर्वती पायथा)
भारत इतिहास संशोधन मंडळ संग्रहालय
भूमी अभिलेख संग्रहालय
राजा दिनकर केळकर संग्रहालय
सदर्न कमांडचे राष्ट्रीय लष्करी संग्रहालय
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी संग्रहालय
रे संग्रहालय (नवीन नाव महात्मा फुले संग्रहालय)
सुभेदार धर्माजी खांबे वस्तुसंग्रहालय
भेट देण्यासारखी अन्य स्थळे संपादन करा
कात्रज सर्प उद्यान, खडकवासला धरण, पर्वती, पाताळेश्वर लेणी, फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट, बंड गार्डन, महात्मा फुले वाडा, लाल महाल, विश्रामबाग वाडा, शनिवार वाडा, शिंद्यांची छत्री, सारसबाग

पुण्याची प्रसिद्धी संपादन करा
पुणेरी खवचटपणा
पुण्याची खाद्यसंस्कृती ([१]
पुणेरी जोडा
पुणेरी पगडी
पूना साडी (धारवाडी खणाचे कापड असलेली)
पुणेरी पाट्या
पुणेरी मिसळ ([२])
पुण्याची आंबा बर्फी
पुण्याची बाकरवडी
पुण्याची भेळ
पुणेरी मराठी
पुणेरी विनोद
पुण्याची वैशिष्ट्ये संपादन करा
खालील विधानांना [ संदर्भ हवा ]

पुण्याची मागील वीस वर्षात उच्चतम वाढ झाली.
आशियामध्ये सर्वात जास्त पब्स पुण्यात आहेत.
भारतातील सर्वात जास्त धुम्रपान करणारे पुण्यात आहेत.
पुण्यात सर्वात जास्त सॉफ्टवेअर कंपन्या आहेत - (पुणे-२१२)(बंगलोर-२०८)(हैद्राबाद-९७) म्हणून या शहरास महाराष्ट्राची सिलिकॉन व्हॅली म्हणतात.
एखाद्या शहरात असणाऱ्या सर्वात जास्त अभियांत्रिकी कॉलेजेसच्या संख्येत, ३५ या आकड्यासह, पुणे जगात आघाडीवर आहे.पुणे विद्यापीठाशी सुमारे ५७ अभियांत्रिकी कॉलेजेस संलग्न आहेत.
संरक्षण व वाणिज्यिक दोन्ही संस्था विमानोड्डाणासाठी एकाच धावपट्टीचा वापर करीत असणारे पुणे हे एकमेव शहर आहे.
पुण्यात सर्वात जास्त सहकारी व पब्लिक सेक्टर संस्था आहेत.
पुण्यात ३८% लोकसंख्या मराठी बोलणारी आहे. उरलेल्यांपैकी २०% उत्तर प्रदेशचे, १०% तमिळ बोलणारे, १४% तेलुगू बोलणारे, १०% केरळी, ८% युरोपियन, ५% आफ्रिकन, २% बंगाली, ६% इतर अशी आकडेवारी आहे.
पुण्यात वाहतूकीची घनता भारतात सर्वात जास्त आहे.
जगात सर्वात जास्त दुचाकी फक्त पुण्यात आहेत.
१५ विद्यापीठे एकाच शहरात असणाऱ्या भारतातील शहरांपैकी, पुणे एकमेव आहे.
पुणे जिल्ह्याला शिक्षणाचे माहेरघर असे म्हणतात.
पुणे शहरासंबंधी पुस्तके
हे सुद्धा पहा
संदर्भ
बाह्य दुवे
शेवटचा बदल १४ दिवसां पूर्वी Tiven2240 कडून
संबंधित लेख
चिंचवड
कसबा पेठ, पुणे
सातारा
भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक शहर


उत्तर लिहिले · 28/8/2018
कर्म · 35170