22
संत्रे हे एक सामान्य शब्द आहे जो हायब्रिड फळे म्हणून वापरला जातो. तर मोसंबी(साइट्रस लिमेटा) हे भारतीय चे नैसर्गिक फळ आहे
सामान्यतः हे दोन्ही फळ लिंबूवर्गीय आहेत... यांचे गुणधर्म देखील आसपास सारखेच परिणाम आढळून येतात...
संत्री हे चविला गोड आंबट असते... याचा रंग नारंगी(केशरी) अश्या प्रकारे असतो... संत्र्यामध्ये अ जीवनसत्व, फोलिक आम्ल, कॅल्शियम, लोह, प्रोटीन, कार्बोहायड्रेट तसेच गंधक आदींची भरपूर मात्रेत आढळतात....
तर, मोसंबी हे अत्यंत गुणकारी फळ आहे... याचा रंग पिवळसर तथा हिरवा असा असतो... मोसंबीत ए, बी, सी ही जीवनसत्त्वे आढळतात... विशेषत: मुलांसाठी मोसंबी फायदेशीर आहे. मोसंबी सौंदर्यवर्धक आहे... मोसंबीच्या रसाने शरीराला शीतलता प्राप्त होते... मोसंबी पौष्टिक, मधुर, स्वादिष्ट, रुचकर, पाचक, दीपक, हृदयास उत्तेजना देणारी, धातुवर्धक आणि रक्तसुधारक आहे... मोसंबीच्या सालीतून सुगंधी तेल प्राप्त होते... सरबतासारखे थंडपेय तयार करण्यासाठी... मोसंबीचा रस उत्साहवर्धक असल्याने अशक्त, आजारी, वृद्ध आणि बालकांसाठी विशेष उपयुक्त ठरतो... अन्नपदार्थांना सुगंध आणि स्वाद आणण्यासाठी मोसंबीचा रस वापरतात... मोसंबीची ताजी साल चेहर्‍यावरील व्रण आणि मुरुमे घालवण्यासाठी उपयुक्त आहे... मोसंबीची साल वातहारक असते...

[इंग्रजी भाषेत या दोन्ही फळांना काय म्हणतात?]
संत्री     -   ORANGE(ऑरेंज)
मोसंबी  -   SWEET LIME(स्वीट लाइम)

उत्तर लिहिले · 20/6/2018
कर्म · 458560