25
📖📚⚜
*GK जनरल नॉलेज ग्रुप*
⚜📚📖
_*9168390345*_
★_*रसुल खडकाळे*_★
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*JOIN GROUPS*
*1)🌹THE GREAT ISLAM🌹*
*2)📖GK जनरल नॉलेज📚*
*3)📰NEWS&UPDATES*
📚📖📚📖📚📖📚
*सोलापूर जिल्हा*
सोलापूर जिल्हा महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा असून तो राज्याच्या दक्षिण भागात आहे. सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर (महाराष्ट्राचे कुलदैवत व दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध्ध) व अक्कलकोटसारखी  सुप्रसिद्ध देवस्थाने आहेत. बार्शी तील भगवंत मंदिरदेखील प्रसिद्ध आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या चादरी विशेष लोकप्रिय आहेत. जिल्ह्याबाबत विस्मयकारक बाब ही की स्वातंत्र्य-प्राप्तीच्या आधी सोलापूर(शहराने) तीन दिवस स्वातंत्र्य उपभोगले आहे.संताची भूमी व ज्वारीचं कोठार म्हणून मंगळवेढा प्रसिद्ध आहे.

.....................
देश-भारत
राज्य-महाराष्ट्र
विभागाचे नाव-पुणे विभाग
मुख्यालय-सोलापूर

*तालुके*
१.उत्तर सोलापूर,२.दक्षिण सोलापूर,३.अक्कलकोट,४.बार्शी, ५.मंगळवेढा, ६. पंढरपूर, ७.सांगोला, ८.माळशिरस, ९.मोहोळ, १०.माढा, ११.करमाळा

*क्षेत्रफळ*
१४,८४५ चौरस किमी (५,७३२ चौ. मैल)

*लोकसंख्या*
३८,४९,५४३ (२००१)
*लोकसंख्या घनता*
२५९.३२ प्रति चौरस किमी (६७१.६ /चौ. मैल)
*शहरी लोकसंख्या*
३१.८३%
*साक्षरता दर*
७१.२
*प्रमुख शहरे*
करमाळा, बार्शी, पंढरपूर

*लोकसभा मतदारसंघ*
सोलापूर, माढा, उस्मानाबाद(काही भाग)

*विधानसभा मतदारसंघ*
१ सोलापूर शहर उत्तर, २ सोलापूर शहर मध्य, ३ सोलापूर दक्षिण, ४ बार्शी, ५ मोहोळ, ६ माळशिरस, ७ माढा, ८ सांगोला, ९ पंढरपूर, १० करमाळा, ११ अक्कलकोट
..............................
*राजकीय संरचना*

मतदारसंघांच्या पुनर्रचनेनुसार सोलापूर जिल्ह्यात एकूण २ लोकसभा व ११ विधानसभा मतदारसंघ आहेत. तसेच ६८ जिल्हा परिषद मतदारसंघ व १३६ पंचायत समिती मतदारसंघ आहेत.

*लोकसभा मतदारसंघ (२) :* सोलापूर, माढा
माढा लोकसभा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, सांगोले, माळशिरस या विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून सातारा जिल्ह्यातील माण व फलटण या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. बार्शी हा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहे.

*विधानसभा मतदारसंघ (११) :* मोहोळ, उत्तर सोलापूर शहर, दक्षिण सोलापूर शहर, मध्य सोलापूर शहर, अक्कलकोट, पंढरपूर , करमाळा, माढा, सांगोले, माळशिरस, बार्शी. नवीन वैराग तालुका प्रस्तावित आहे.
.....................................
*सोलापूर विशेष*


⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸ 

💐 *स्वामी समर्थ*💐 

श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी(प्रकटकाल : इ.स. १८५६-१८७८) हे इसवी सनाच्या १९ व्या शतकात होऊन गेलेले, महाराष्ट्रातील अक्कलकोट येथील दत्त संप्रदायातील एक थोर संत होते. श्रीपाद वल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्रीदत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार मानले जातात. गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्रीस्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले अशीही बर्‍याच भक्तांची श्रद्धा आहे. "मी नृसिंह भान असून श्रीशैलम्‌‍जवळील कर्दळी वनातून आलो आहे" हे स्वामींच्या तोंडचे उद्‌गार ते नृसिंह सरस्वतींचा अवतार असल्याचे सुचवतात. विविध ठिकाणी स्वामी विविध नावांनी वावरले. 

श्रीस्वामी समर्थ (अक्कलकोट) 

संप्रदायदत्त संप्रदाय 

भाषामराठी 

कार्यमहाराष्ट्र व कर्नाटकात दत्त संप्रदायाचा प्रसार 

प्रसिद्ध वचन* ' भिऊ नकोस, 
मी तुझ्या पाठीशी आहे' 

संबंधित तीर्थक्षेत्रे* अक्कलकोट, गाणगापूर 

✴ * जीवन

विद्यमान आंध्रप्रदेशातल्या श्री शैल्यम क्षेत्राजवळील कर्दळीवनातून ते प्रकट झाले, अशी मान्यता प्रचलित आहे. त्यांनी तेथून आसेतुहिमाचल भ्रमण केले. 

🔆 * स्वामी समर्थ प्रकट दिन

इ.स. १८५६ च्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले. ते मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोट नगरीत प्रवेशले, तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला.तो दिवस चैत्र शुध्द द्वितीया, शके १७७८, अनल नाम संवत्सरे,रविवार दि. ०६/०४/१८५६ हा होता. 

🔅 * वासुदेव बळवंत फडके* 

इ.स. १८७५ सालच्या सुमारास महाराष्ट्रात जेव्हा मोठा दुष्काळ पडला होता, तेव्हा क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आले होते, त्या वेळी त्यांनी फडक्यांना सध्या लढायची वेळ नाही असा सल्ला दिल्याचे सांगितले जाते. 

⚜ * महती

सबसे बडा गुरू... गुरूसे बडा गुरू का ध्यास... और उससे भी बडे श्री स्वामी समर्थ महाराज... तसेच स्वामी महाराजांनी त्यांच्या भक्तांना अभयदान दिले, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे...! अशा शब्दांंमधे स्वामी समर्थांंची महती वर्णन केली जाते. 

✴ * प्रकट पूर्वपिठिका

इ.स. १४५९ च्या सुमारास (माघ वद्य १, शके १३८०) श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज ह्यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर शैल यात्रेचे निमित्त साधून ते कर्दळीवनात अदृश्य झाले. ह्या कर्दळी वनात सुमारे ३०० वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली. ह्या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ निर्माण केले. एके दिवशी उद्धव नावाचा लाकूडतोडया त्याच कर्दळीवनात लाकडे तोडीत असताना त्याच्या हातून कुर्‍हाड निसटली व ती वारूळावर पडली. उद्धवाचे निमित्त साधून स्वामी महाराजांना पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी प्रगट व्हायचे होते. कुर्‍हाड वारूळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक आजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रगट झाली; तेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज होत असे मानले जाते. 

आपल्या हातून ह्या महापुरुषाला जखम झाली ह्या विचाराने उद्धवाला दुःख झाले व भय वाटू लागले; पण भक्तांसाठी माताच असलेल्या महाराजांनी उद्धवाला अभय व आशीर्वाद देऊन गंगातीरी प्रयाण केले. गंगातीरावर भ्रमण करता करता ते कलकत्त्यास गेले व तेथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले. नंतर काशी, प्रयाग असे भ्रमण करीत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले. 

✳ *दीक्षा* 

श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे त्यांनी शेगावचे श्री गजानन महाराज व शिर्डीचे श्री साई महाराज ह्यांना दीक्षा दिली. त्यानंतर स्वामी पंढरपूर, मोहोळ असे भ्रमण करीत सोलापुरास आले. त्यानंतर मंगळवेढे नामक गावास स्वामींनी काही काळ वास्तव्य केले व तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केले. भेटेल त्याला आपल्या लीलेने आगळ्यावेगळ्या पद्धतींनी दुःखमुक्त करून कार्यरत केले. 

💢 * अक्कलकोट प्रवेश* 

इसवी सन १८५६ मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला व तिथल्या बावीस वर्षांच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले. येथे त्यांनी जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले. 

❇ *अवतार कार्य समाप्ती* 

इसवी सन १८७८ मध्ये स्वामींनी अनेकांना कार्यरत करून त्यांचा एक आविष्कार संपविला असे भासवले. प्रत्यक्षात स्वामी महाराज आजदेखील भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करून कार्यरत करीत आहेत व अनंतकाळपर्यंत करीत राहतील अशी त्यांंच्या भक्तांंची श्रद्धा व धारणा आहे. 

💠 * स्वामी समर्थ पुण्यतिथी* 

श्री स्वामी समर्थ महाराज यांनी रविवार दि. ३० एप्रिल १८७८ रोजी (चैत्र वद्य त्रयोदशी, शके १८००, बहुधान्य नाम संवत्सर) अक्कलकोट येथे वटवृक्ष समाधी मठ स्थानी माध्याह्नकाली आपल्या अवतारकार्याची समाप्ती केली. नंतर श्री स्वामी समर्थ यांना श्री स्वामींचे परम शिष्य चोळप्पा यांच्या निवासस्थानाजवळ समाधिस्थ करण्यात आले. 

✡ * पूर्णब्रह्मस्वरुप अवतार* 

श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहेत असे मानले जाते. भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आहे. कोणाला श्री विठूमाऊलीच्या रूपात त्यांचे दर्शन घडले तर कुणाला श्री भगवान विष्णूच्या स्वरूपात तर कुणाला भगवती देवीच्या रूपात. महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखविल्या आहेत अशीही भक्तांंची धारणा आहे. 

🌀 *श्री स्वामी जयघोष* 

अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. 

अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त जय जय स्वामी समर्थ 

श्री स्वामी समर्थांचे वरील जयघोष जसे प्रभावी आहेत. त्याच प्रमाणे महाराजांचे स्वामी समर्थ तारक मंत्र हा सुद्धा फार प्रभावी आहे 

☸ *“ स्वामी समर्थ तारक मंत्र”* 

नि:शंक हो | निर्भय हो मना रे | प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे || अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी | अशक्य ही शक्य करतील स्वामी || १ || 
जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय | स्वयें भक्त प्रारब्ध घडवी ही माय || आज्ञेविना काळ ना नेई त्याला | परलोकी ही ना भीती तयाला || २ || 
उगाची भीतोसी भय हे पळू दे | जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे || जगी जन्ममृत्यू असे खेळ ज्याचा | नको घाबरू तू असे बाळ त्याचा || ३ || 
खरा होई जागा | श्रद्धेसहित | कसा होशी त्याविणा | तू स्वामीभक्त || कितीदा दिला बोल त्यांनीच हात | नको डगमगू | स्वामी देतील साथ || ४ || 
विभूती, नमन, नामध्यानाधी, तीर्थ स्वामीच या पंचप्राणामृतात || हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती | 

न सोडी कदा स्वामी जया घेई हाती || ५ || 

कोणतीही संकटे आल्यास स्वामींचा हा अद्भुत व निराळा तारक मंत्र म्हणावा. संकटे दूर होतात. 

⚛ *!!श्री स्वामी स्तवन!!* 

श्री गणेशाय नमः! श्री सरस्वत्यै नमः! श्री गुरुभ्यो नमः! श्री कुलदेवतायै नमः! श्री अक्कलकोटनिवासी-पुर्णदत्तावतार-दिगंबर-यतिवर्य स्वामीराजाय नमः!! 

ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमुर्तिम्‌! द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्वमस्यादिलक्ष्यम्‌‍! एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतं! भावातीतं त्रिगुणरहितं सद्‌गुरुं तं नमामि!!

ॐ रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदन कथा- टोपी- च माला कमण्डलुधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्रीस्वामीसमर्थावतारधारक पाहि माम्‌! पाहि माम्‌! 

आता करुया प्रार्थना! जयजयाजी अघहरणा! परात्परा कैवल्यसदना! ब्रह्मानंदा यतिवर्या! जयजयाजी पुराणपुरुषा! लोकपाला सर्वेशा! अनंत ब्रह्मांडधीशा! देववंद्या जगद्गुरु!! सुखधामनिवासिया! सर्वसाक्षी करुणालया! भक्तजन ताराया! अनंतरुपे नटलासी! तू अग्नी तू पवन! तू आकाश तू जीवन! तूची वसुंधरा पुर्ण! चंद्र सूर्य तूच पै! तू विष्णु आणि शंकर! तू विधाता तू इंद्र! अष्टदिक्‌पालादि समग्र! तूच रुपे नटलासी! कर्ता आणि करविता! तूच हवी आणि होता! दाता आणि देवविता! तूच समर्था निश्चये! जंगम आणि स्थिर! तूच व्यापिले समग्र! तुजलागी आदिमध्याग्र! कोठे नसे पाहतां! असोनिया निर्गुण! रुपे नटलासी सगुण! ज्ञाता आणि ज्ञान! तूच एक विश्वेशा! वेदांचाही तर्क चाचरे! शास्त्रातेही नावरे! विष्णु शंकर एकसरे! कुंठित झाले सर्वही! मी केवळ अल्पमती! करु केवी आपुली स्तुती! सहस्रमुखी निश्चिती! शिणला ख्याती वर्णितां! दॄढ ठेविला चरणी माथा! रक्षावे मजसी समर्था! कृपाकटाक्षे दीनानाथा! दासाकडे पाहावे! आता इतुकी प्रार्थना! आणावी जी आपुल्या मना! कृपासमुद्री या मीना! आश्रयदेईजे सदैव! पाप ताप आणि दैन्य! सर्व जावो निरसोन! इष्टलोकी सौख्यदेवोन! परलोकसाधन करवावे! दुस्तर हा भवसागर! याचे पावावया पैलतीर! त्वन्नाम तरणी साचार! प्राप्त होवो मजला ते! आशा मनीषा तृष्णा! कल्पना आणि वासना! भ्रांती भुली नाना! न बाधोत तुझ्या कृपे! किती वर्णु आपुले गुण! द्यावे मज सुख साधन! अज्ञान तिमिर निरसोन! ज्ञानार्क हृदयी प्रगटो पै! शांती मनी सदा वसो! वृथाभिमान नसो! सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी! भवदुःखे हे निसरो! तुझ्या भजनी चित्त वसो! वृथा विषयांची नसो! वासना या मनाते! सदा साधु समागम! तुझे भजन उत्तम! तेणे होवो हा सुगम! दुर्गम जो भवपंथ! व्यवहारी वर्तता! न पडो भ्रांती चित्ता! अंगी न यावी असत्यता! सत्ये विजयी सर्वदा! आप्तवर्गाचे पोषण! न्यायमार्गावलंबन! इतुके द्यावे वरदान! कृपा करुनि समर्था! असोनिया संसारात! प्राशीन तव नामामृत! प्रपंच आणि परमार्थ! तेणे सुगम मजलागी! कर्ता आणि करविता! तूची एक स्वामीनाथा! माझिया ठाई वार्ता! मीपणाची नसेची!! 

"गुरुब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः! गुरुः साक्षात्‌ परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः!!" 

!!श्री स्वामी समर्थार्पणमस्तु!! 

🔰 * महाराजांची काही चरित्रे* 

स्वामी चरित्र सारामृत (पारायणासाठी पोथी, लेखक - विष्णू बळवंत थोरात) 

🎞 * चित्रपट

स्वामी समर्थ यांच्या आयुष्यावर ’देऊळ बंद’ हा चित्रपट २०१५ साली निघाला. त्यात स्वामींची भूमिका मोहन जोशी यांनी केली होती. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण तरडेव प्रणीत कुलकर्णी यांनी केले आहे.तत्पूर्वी २०१२ साली ’कृपासिंधू श्री स्वामी समर्थ’ ही दूरचित्रवांणी मालिका ’मी मराठी’ या वाहिनीवर आली होती. हिचे प्रसरण शंभराहून अधिक भागांत झाले होते. 
👍👆 *_वरील माहिती आपणांस आवडल्यास किंवा फायद्याची वाटल्यास शेअर करायला विसरू नका!_* 
👌🏼👌🏼📍👌🏼👌🏼📍👌🏼👌🏼 
श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर

' सोन्नलगी ' आजचे सोलापूर शहर , म्हणजे आमचं शहर. या शहरात कोणी ही उपाशी पोटी झोपत नाही अशी या शहराची महिमा आणि अनुभव आहे. याला कारण म्हणजे हे शहर ज्यानीं वसवले ते येथील आमचे ग्रामदैवत श्री. शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज !!

बाराव्या शतकात मुदगौडा व सुगलादेवी या दाम्पताच्या पोटी पुत्ररत्न जन्मले. यावेळी मुदगौडा यांचे वय 75 तर सुगलादेवी यांचे वय 65 होते. त्यांनी या बाळाचे नाव धुळीमहांकाळ असे ठेवले. पण वयाच्या तेराव्या वर्षा पर्यन्त धुळीमहांकाळ हे कोणाशी बोलत नव्हते , अन्न पाण्याला ते कधी शिवले नाही , त्यांनी पापण्या कधी झापल्या नाहीत , ते कधी रडले नाही , हसले नाही , आणि सगळ्यात विशेष म्हणजे त्यांची सावली कधी जमिनीवर पडली नाही. असे चमत्कारित होते धुळी महांकाळ.

एकदा ते असेच जनावरे चरायला घेऊन गेले असता. श्रीशैलमचे मल्लिकार्जुन ( भगवान शंकर ) यानीं साधुच्या रुपात त्यांची भेट घेतली व माझे नाव " मल्लय्या "आहे असे म्हणत त्याच्यां जवळ दहिभात खाण्याची इच्छा व्यक्त केली. तेंव्हा धुळी महांकाळ हे प्रथमच आनंदाने दहिभात आणण्यासाठी घराकडे धावत निघाले . घरी येऊन 13 वर्षात प्रथमच त्यानीं माता सुगलादेवी कडे दहिभाताची मागणी केली तेंव्हा त्यांची मंजुळ वाणी प्रथमच मुखी आलेली ऐकून सुगलादेवीनी आनंदाने दहिभात बांधून दिले .

जेंव्हा धुळी महांकाळ धावत दहिभात घेऊन जिथे मल्लय्या भेटले होते तिथे आले , पण तो पर्यन्त मल्लय्या तेथून निघुन गेले होते . तेंव्हा धुळी महांकाळ हे हताश होऊन सगळी कडे त्यानां शोधत निघाले . मल्लय्या कुठेच दिसेना तेंव्हा ते खुप दुःखी झाले .

तेंव्हा तेथून काही लोक " मल्लय्या .... मल्लय्या .... चा जयघोष करत तिथून जात होते , तेंव्हा धुळी महांकाळ यानीं त्यानां विचारले ... " कुठे आहे माझा मल्लय्या ??... तेंव्हा त्यांच्यातल्या एकाने उत्तर दिले ... श्रीशैलम मध्ये आहे , आम्ही त्याच्या दर्शनाला जात आहोत .मग धुळी महांकाळ ही त्यांच्या मागे निघाले . एक महीना ते चालत होते श्रीशैलम पर्यन्त , आणि या एक महिन्याच्या काळात ते कुठे ही एक क्षण बसले नाही हे विशेष .

श्रीशैलम ला पोहोचल्यावर जेंव्हा लोकानीं धुळी महांकाळ यांना भगवान शंकराचे लिंग दाखवत म्हटले , " हा बघ तुझा मल्लय्या !! " .... तेंव्हा धुळी महांकाळ यानीं नकारार्थी मान हलवीत म्हटले , " हा माझा मल्लय्या नाही ... " असे म्हणत ते मंदिरातून हताश होऊन धावत बाहेर पडले व श्रीशैलम येथील " कमरी मठ " या डोंगरावरून जीव देण्यासाठी उडी मारणार इतक्यात भगवान शंकर अर्थात मल्लय्या यांनी त्यांना मागून येऊन त्यांचे हात धरले . आणि त्यांनी धुळी महांकाळ यानां साक्षात दर्शन दिले . आणि उपदेश केला की , तू तुझ्या जन्मगावी सोन्नलगीला जाउन धर्म कार्यास आरंभ कर , 68 लिंगाची स्थापना कर , जेंव्हा तू तुझ्या ध्यान योगाने मला प्रसन्न करशील , तेंव्हा आत्मलिंगाच्या स्थापनेला मी सोन्नलगी ( आजचे सोलापूर ) ला स्वत: येईन . त्यांनी धुळी महांकाळ यांचे नाव बदलून सिद्धेश्वर असे ठेवले . सिद्धेश्वर याचा अर्थ ज्याच्या आत्म्यात ईश्वर सिद्ध असतो .

आज ही तुम्ही श्रीशैलम ला गेलात तर श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरानी ज्या डोंगरा वरुन उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केला , ती जागा " कमरी मठ " म्हणून प्रसिद्ध आहे . आज ही गुढी पाडव्याच्या आधी महीना भर सोलापुरातून हजारो श्री सिद्धेश्वर भक्त 600 ते 650 km पायी चालत जातात श्रीशैलम ला . सोबत श्री सिद्धरामेश्वर यांचे नंदिध्वज ही असतात .

धन्य आहोत आम्ही जे या पुण्यनगरी जन्म घेतले . सोलापूर मधे जन्म घ्यायला य़ोग लागतो.

जन्मासी येऊनी, पहा रे पंढरी !! असे पंढरपूरबाबत म्हटले जाते, ज्या पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातील भाविकच नव्हे, तर दक्षिणेकडील राज्यांतील भाविकही येत असतात असे पंढरपूर तीर्थक्षेत्र सोलापूर जिल्ह्यात आहे. यावरूनच सोलापूर जिल्ह्याचे स्थान लक्षात येते. अनेक संतांच्या अस्तित्वामुळे सोलापूर जिल्ह्याला संतांची भूमी म्हटले जाते.[२]

पूर्वीचे गिरणगाव, हुतात्म्यांचा जिल्हा; सध्याचे ज्वारीचे कोठार, तेलुगू, कन्नड व मराठी असा भाषा-त्रिवेणी संगम झालेला बहुभाषिक जिल्हा आणि टॉवेल, चादरी निर्माण करणारा जिल्हा म्हणून सोलापूर प्रसिद्ध आहे. जागतिकीकरणाच्या प्रभावाच्या काळात आधुनिकतेचा स्पर्श काहीशा कमी वेगाने सोलापूरला होत असला, तरीही अगत्य, मनमोकळेपणा, थोडासा साधे-भोळेपणा, पारंपरिकता, बहुभाषिकत्व हे इथल्या मातीचे गुण आहेत. पर्यटन, फलोत्पादन, कृषिप्रक्रिया उद्योग, शिक्षण, आरोग्यसेवा व कापड उद्योग (हातमाग, यंत्रमाग) या क्षेत्रांमध्ये जिल्ह्याचा विकास साधण्याची क्षमता निश्र्चितच आहे.

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील अकलुज हि ग्रामपंचायत आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून नावारुपास आहे.

या जिल्हाल्यातील सर्वात श्रीमंत तालुका व दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जाणारा तालुका म्हणजे सांगोला , ज्या ताकुक्याचे नाव गिनीज बुकात नोंद आहे असा हा तालुका . जो दोन गोष्टीसाठी ओळखला जातो . एक म्हणजे डाळींबा साठी व दुसरे म्हणजे एका तालुक्य वर सर्वात जास्त वेळा आमदार म्हणनू विधान सभेवर जे निवडून गेले भाई गणपतराव देशमुख यांच्यामुळे ओळखला जातो .
........................
*शेती*
हा जिल्हा कमी पावसाच्या, पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो. येथे पावसाचे वार्षिक सरासरी प्रमाण ५०० ते ७५० मि. मी. (५० ते ७५ से.मी.) इतके कमी आहे. तसेच पावसाची विभागणीही असमान आहे, तरी उजनी धरणामुळे येथील बागायत क्षेत्र १८ ते २०% आहे. यावर प्रामुख्याने ऊस हे पीक घेतले जाते. एकूण ७५ ते ८२ % शेती लहरी पावसावर अवलंबून आहे.

सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचे कोठारच म्हटले जाते. रब्बी मोसमातल्या ज्वारीखालील क्षेत्र सुमारे ७ लाख हेक्टर आहे. खरीप ज्वारीचे क्षेत्र सुमारे १५०० हेक्टर आहे. ज्वारीची मालदांडी ३५-१ ही जात प्रसिद्ध आहे. १९९० मध्ये आलेल्या महाराष्ट्र  शासनाच्या फळबाग रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीमुळे सोलापूर जिल्ह्यात फळबाग क्षेत्रात क्रांती झाली. डाळिंब (सुमारे ३० हजार हेक्टर), बोर(सुमारे २० हजार हेक्टर) या पिकांसह आंबा (९ हजार हेक्टर), सीताफळ, आवळा, जांभूळ  यांच्या फळबागा, कमी पाऊस असूनही केवळ विशिष्ट हवामानामुळे जिल्ह्यात वाढत आहेत. तसे फळ-प्रक्रिया उद्योगाबद्दलही आकर्षण वाढते आहे. द्राक्षाचीही लागवड जिल्ह्यात अधिकाधइक होत आहे. मोहोळ, पंढरपूर इ. तालुक्यांत द्राक्षापासून बेदाणेही तयार केले जातात. सांगोला व पंढरपूर  तालुक्यांमध्ये बोर, डाळिंबाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते.

सोलापूर जिल्ह्यात मुळेगाव येथे (१९३३ साली पुण्याहून येथे आणण्यात आलेले) कोरडवाहू शेती  संशोधन केंद्र आहे. तसेच जिल्ह्यात रब्बी ज्वारी संशोधन केंद्र व डाळिंब संशोधन केंद्रही आहे. सोलापूर जिल्ह्यातील कृषितज्ज्ञ व कृषि-अधिकारी श्री.वि. ग. राऊळ यांनी प्रामुख्याने फळबाग क्षेत्रात केवळ सोलापूर जिल्ह्यातच नव्हे, तर महाराष्ट्रात क्रांती घडवून आणली. डाळींब, बोर तसेच सूर्यफूल, करडई या पिकांबाबत त्यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन करून त्यांना संघटितही केले.


सांगोल्याची डाळींब युरोपीय देशात पाठवण्याची तयारी सुरु

उत्तर भारत आणि महाराष्ट्रात असलेल्या हवामान बदलामुळे दरवर्षी चांगला दर मिळणाऱ्या डाळिंबाला सध्या कवडीमोल किमतीने विकण्याची वेळ डाळिंब उत्पादक शेतकऱ्यावर अली आहे. पण सांगोला तालुक्यातील एका तरुणाने मात्र या सगळ्यावर मात करत आपल्या बागेतील डाळिंब थेट यूरोपीय देशात पाठवण्याची तयारी सुरु केलीय.
...........................
*उद्योग*
संपादन करा

सोलापूर औद्यागिकदृष्ट्याही विकसित होत आहे. जिल्ह्यात सोलापूर (अक्कलकोट रोड, होटगी रोड), चिंचोली, बार्शी, कुर्डूवाडी येथे औद्योगिक वसाहती आहेत. पूर्वीच्या काळी येथील हातमाग कापड उद्योग प्रसिद्ध होता. सध्या येथील यंत्रमाग कापड  उद्योगही प्रसिद्ध आहे. येथील चादरी व टर्किश टॉवेल्स भारतभर प्रसिद्ध आहेत. काही यंत्रमागधारक यांची परदेशी निर्यातही करतात. कापडी वॉल हँगिंग्ज हे देखील येथील वैशिष्ट्य आहे. काही कंपन्या आपल्या मालाची १००% निर्यातही करतात. सोलापूर शहर व आसपासच्या भागात विडी उद्योग अनेक कुटुंबांसाठी महत्त्वाचा उद्योग आहे. सुती कापड उद्योग व विडी उद्योग यांमध्ये प्रामुख्याने तेलुगू भाषिक विणकर  समाजाचा मोठा वाटा आहे. रसायन निर्मिती उद्योग येथील वैशिष्ट्य आहे.

दूध डेअरी, कृषिप्रक्रिया उद्योग, गोमय उत्पादने व साखर कारखाने या उद्योगांच्या माध्यमातून लोकमंगल हा उद्योग जिल्ह्यात अनेकांचे रोजगाराचे साधन बनत आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यात बिर्ला सिमेंट कारखाना आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत सूत गिरण्या आहेत. कॅम शॅफ्ट्स बनवणारा प्रिसिजन उद्योग जिल्ह्यातील प्रमुख उद्योग बनू पाहतो आहे. तसेच सोलापूर शहराजवळ किर्लोस्कर कंपनीचा शिवाजी वर्क्स लिमिटेड हा इंजिन ऑटो पार्ट्‌स बनवणारा कारखाना आहे. केम येथील हळदीपासून बनवले जाणारे कुंकू प्रसिद्ध असून पंढरपूर, सांगोला व मंगळवेढा या तालुक्यांतील विणलेल्या घोंगड्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत.

सोलापूर शहर व जिल्ह्यात पूर्वी अनेक छोट्या-मोठ्या सूत गिरण्या होत्या. हळूहळू यंत्रमाग वाढत गेले. गिरणगाव ही सोलापूरची ओळख पुसट होत असली तरीही आजचे यंत्रमाग, कुशल व कष्टाळू कामगार व मोजके हातमाग यांच्या माध्यमातून मनमोहक साड्या, जेकॉर्ड चादरी, टर्किश टॉवेल्स, पडदे व वॉल हँगिग्ज यांचे उत्पादन आजही सोलापुरात मोठ्या प्रमाणावर होते आहे.
.................................
*पर्यटन*
धार्मिक व आध्यात्मिक दृष्टिकोनातून सोलापूर जिल्हा महाराष्ट्रात महत्त्वाचा ठरतो तो प्रामुख्याने दक्षिणेची काशी असलेल्या पंढरपूरमुळेच! आषाढी  व कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी विठ्ठलाच्या  दर्शनाला येतात. हे पूर्ण महाराष्ट्राचेच प्रमुख धार्मिक उत्सव आहेत.

महाभारतकाळात भगवान श्रीकृष्णाने मुचकुंद राजाला वर दिला. त्यानुसार भक्त पुंडलिकरूपी मुचकुंद राजाला, श्रीकृष्णाने विठ्ठलाच्या रूपात विटेवर उभे राहून दर्शन दिले, अशी कथा सांगितली जाते. येथे विठ्ठल व रुक्मिणीची मंदिरे वेगवेगळी आहेत. विठ्ठल मंदिर हे शिल्पकलेचा उत्तम नमुनाही मानले जाते. मराठी माणसाची संस्कृती, अध्यात्म व जीवन समृद्ध करणारे काव्य संत-कवींनी रचले, ते विठ्ठलाप्रती असलेल्या भक्ति-प्रेमातूनच! महाराष्ट्रात यादव काळापासून जी सामाजिक व आध्यात्मिक क्रांती सुरू झाली, तिचे प्रमुख केंद्र चंद्रभागेचे वाळवंटच होते. पंढरपूर सोलापूर-कोल्हापूर मार्गावर असून सोलापूरपासून ६७ कि.मी. अंतरावर आहे.

सोलापूर शहरात कंबर तलाव या ठिकाणी असलेल्या महात्मा गांधी प्राणी संग्रहालयात अनेक प्रकारची पशु-पक्षी, प्राणी हे पहावयास मिळतात. येथे सिंह, बिबट्या, मगर, माकडे, काळविट व हरणे हि मोठ्या प्रमाणावर दिसून येतात.

जिल्ह्यात मंगळवेढा येथे श्री दामाजीपंतांचे मंदिर आहे. तसेच माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे अर्धनारी नटेश्र्वराचे एकमेवाद्वितीय असे हेमाडपंती स्थापत्यशैली मंदिर आहे. बाराव्या शतकात यादव काळात या मंदिराचा जीर्णोद्धार केला गेल्याचा उल्लेख आढळतो. दक्षिण सोलापूर तालुक्यात हत्तरसंग कुडल येथे भीमा-सीना संगम झालेला आहे. या ठिकाणी झालेल्या पुरातत्त्वीय संशोधनामुळे हे आज जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे. येथे संगमावर अकराव्या शतकात बांधलेली (कोरलेली) हरिहरेश्वर व संगमेश्वर ही अजिंठा-वेरूळची लेणी वेरुळच्या  शिल्पकलेशी साम्य असलेली महादेव मंदिरे आहेत. या ठिकाणी उत्खननात जगातील एकमेव असे दुर्मीळ शिवलिंग सापडलेले आहे. या ४ फुटी शिवलिंगावर शिवाची ३५९ मुखे व अन्य मूर्ती कोरल्या आहेत. या मंदिराच्या बांधकामाचे वैशिष्ट्य असे की, महाशिवरात्रीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी अनेक दरवाजे ओलांडून सूर्यकिरणे शिवलिंगावर पडतात.

भारतात विष्णूची मंदिरे अतिशय कमी ठिकाणी आहेत. या जिल्ह्यात ते बार्शी येथे आहे. या हेमाडपंती स्थापत्यशैली मंदिरामुळे बार्शीला भगवंताची बार्शी म्हणतात. एकादशीला पंढरपुरात विठोबाचे दर्शन घेणारा वारकरी द्वादशीला बार्शीच्या भगवंताचे दर्शन घेतल्याशिवाय आपल्या गावी परत जात नाही. जिल्ह्यातील सोलापूर-मंगळवेढा रस्त्यावर, भीमा नदीच्या तीरावर माचणूर येथे महादेवाचे पुरातन मंदिर आहे. अकलूज येथे नीरा नदीच्या काठी प्रेक्षणीय किल्ला असून करमाळा  येथेही प्रसिद्ध भुईकोट किल्ला व अष्टकोनी विहीर आहे. मध्ययुगीन काळात बहामनी राजवटीत सोलापुरात बांधला गेलेला भुईकोट किल्ला हे जिल्ह्याचे खास वैशिष्ट्य. किल्लाबांधणी शास्त्राचा उत्कृष्ट नमुना असलेला हा किल्ला १४ व्या शतकात बांधला गेल्याचे इतिहासकार सांगतात. १६८५-८६ या काळात औरंगजेब सुमारे वर्षभर या किल्ल्यावर राहिला होता. येथेच त्याच्या टांकसाळीतून चांदीची नाणी निर्माण झाल्याचे पुरावे आढळतात. ही नाणी आजही कोलकता येथील म्युझियममध्ये आढळतात. १७९५ ते १८१८ या काळात हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. दुसरा बाजीराव पेशवा  यांचा निवास या किल्ल्यावर होता. इंग्रजांनी सोलापूरवर आक्रमण करून बाजीरावाचा पाडाव मे, १८१८ मध्ये केला. ( इंग्रज आणि मराठे यांच्यातील शेवटची लढाई जिल्ह्यात मोहोळ तालुक्यातील आष्टी  येथे १८१८ मध्ये झाली आणि मराठेशाहीचा अंत झाला.)

हत्तरसंग कुडल तालुका-दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर

भिमा आणि सीना या दोन नदींच्या संगमावर दोन प्राचीन मंदिरे आहेत.संगमेश्वर आणि हरिहरेश्वर आशी त्या मंदिरांची नावे आहेत.

हरिहरेश्वर मंदिर पुर्ण पणे मातीत गाडले गेले होते, सोलापूर येथील दयानंद महाविद्यालयाचे प्रा.गजानन भिडे यांनी हरिहरेश्वर मंदिराची उत्खनन करून ते उजेडात आणले. हि दोन्ही मंदिरे अद्वितीय शिल्प कला आणि वास्तू कलेच्या द्रुष्टीने महत्त्वाचे आहेत.
जिल्ह्यातील माळढोक पक्षी अभयारण्य व धर्मवीर संभाजी उद्यान तलाव (कंबर तलाव) पक्षी अभयारण्य - ही अभयारण्ये प्रसिद्ध आहेत. सोलापूर शहरातील कंबर तलावात (संभाजी तलाव) दुर्मीळ पक्षी येत असल्याचे येथील पक्षीतज्ज्ञ बी. एस. कुलकर्णी यांनी अभ्यासले, तसेच त्यांनी नान्नज येथे माळढोकही शोधून काढला. कंबर तलाव हा सोलापूरचे एक फुफ्फुस आहे. येथे ६५ प्रकारचे पाणपक्षी असून, हिवाळ्यात येथे १४ जातींची रानबदके परदेशातून येतात. मध्य आशिया, सैबेरिया, चीन, युरोप येथून ही रानबदके येतात. ढोक, ढिबरा, कव्हेर जातीचे मासेही या तलावात मुबलकपणे आढळतात. सुप्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ कै. सलीम अली यांचे हे आवडते ठिकाण होते. याच तळ्याच्या परिसरात १४ उपवनांसह स्मृतिवनही तयार करण्यात आले आहे. आम्रवन, चंपक वन, अशोक वन, गणेश वन इत्यादी उपवने सामाजिक वनीकरण खात्यामार्फत विकसित करण्यात आली आहेत. हे स्मृतिवन देशविदेशातील पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे.

१९७९-८० मध्ये नान्नज (उत्तर सोलापूर तालुका) येथे माळढोक पक्षी अभयारण्य जाहीर करण्यात आले आहे. तीन फुटी उंची व २० ते २५ कि. वजनाचे माळढोक आज जगात फक्त सुमारे ५०० संख्येनेच उरलेले आहेत. त्यातील सुमारे २५ माळढोक नान्नज येथे आढळतात. जिल्ह्यातील माढा, मोहोळ व करमाळा हे तीन तालुके या अभयारण्यांतर्गत येतात.रेवणसिध्येश्वर मंदिर वनविहार प्रसिद्ध आहे.
.................................
*सामाजिक/विविध*

सोलापूर जिल्ह्याची सीमा कर्नाटकला लागलेली आहे, तसेच आंध्र प्रदेश हे राज्यही सोलापूर जिल्ह्याला जवळ आहे. साहजिकच कन्नड भाषिक लोकांची संख्या येथे लक्षणीय आहे. तसेच तेलुगू भाषकांची संख्याही या जिल्ह्यात जास्त आहे. सोलापूर जिल्ह्यात मराठी, कन्नड व तेलुगू भाषांचा व संस्कृतींचा संगम झाल्याचे चित्र दिसते. येथील मराठी बोली विशिष्ट हेलकाव्यांसह (हेल काढून) बोलली जाते. मराठी बोली भाषेच्या उच्चारशैलीवर प्रामुख्याने कानडी भाषेचा प्रभाव जाणवतो. येथील लोक परस्परांशी मराठी, कन्नड, तेलुगू व हिंदी अशा सर्व भाषांत सहजतेने बोलताना आढळतात. येथे लिंगायत, पद्मशाली व धनगर जातीचे लोक मोठ्या प्रमाणावर आढळतात. बंजारा(गोरमाटी) तांड्यामध्ये राहतात.

येथील कन्नड व तेलुगू लोक गेली अनेक वर्षे महाराष्ट्रात राहत आहेत. ते इथल्या मातीशी समरस होऊन गेले आहेत. त्यांची केवळ बोली कन्नड किंवा तेलुगू आहे. बहुतांश लोक कन्नड / तेलुगू लिहू शकत नाहीत. बहुभाषिक लोक सोलापूर जिल्ह्यात राहत असूनही येथे कोणत्याही कारणांवरून मराठी, कन्नड,तेलुगू लोकांमध्ये संघर्ष झाल्याचे दिसत नाही. परंपरा मानणार्या लोकांमुळे व शहरीकरण फारसे वेगाने न झाल्यामुळे जिल्ह्याचा तोंडावळा पारंपरिक व ग्रामीण आहे.

सोलापूर शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्रीसिद्धरामेश्र्वर यांच्या समाधी मंदिराबरोबरच सोलापूरची या मंदिराशी जोडलेली गड्ड्याची यात्रा  सोलापूर जिल्ह्यात व कर्नाटकातील काही भागांत प्रसिद्ध आहे. या यात्रेस काठीची यात्रा किंवा योगदंडाची यात्रा असेही म्हटले जाते. सिद्धरामेश्र्वरांच्या योगदंडाचा विवाह सोहळा (किंवा अक्षता सोहळा) सोलापुरात मकर संक्रांतीच्या काळात तीन दिवस (भोगी, संक्रांत, किंक्रांत) साजरा केला जातो. १८ व्या शतकात संत शुभराय यांनी संपूर्ण वाळूच्या विठ्ठल मूर्तीची स्थापना करून सोलापूर भागात विविध धार्मिक उत्सवांना सुरुवात केली. आषाढी व कार्तिकी एकादशीची रथयात्रा ही गेल्या २०० वर्षांपासून सोलापूरचे सांस्कृतिक वैभव बनलेली आहे. जिल्ह्यातील ज्वारीच्या भरघोस उत्पादनामुळे ज्वारीची गरम भाकरी येथे प्रसिद्ध आहे. तसेच येथील शेंगदाणा चटणी, इडली, डोसा, उत्तप्पा हे दाक्षिणात्य पदार्थ, तसेच डिसेंबर-जानेवारी  महिन्यांतल्या हुरडा पार्ट्या प्रसिद्ध आहेत. चटणी-भाकरी व हुरड्याचा आस्वाद घेण्यासाठी अन्य जिल्ह्यांतूनही लोक येथे येतात. सोलापूर येथे आत्तापर्यंत अ.भा. मराठी नाट्य संमेलन व साहित्य संमेलन संपन्न झालेले आहे. उर्दू साहित्य संमेलन, धनगर साहित्य संमेलन, सावरकर साहित्य संमेलन अशी अनेक साहित्य संमेलने सोलापूरमध्ये झाली आहेत, होणार आहेत.
------------------–-----------------------------
[26/02 11:24 PM] रसुल खडकाळे: *GK जनरल नॉलेज ग्रुप*
_9168390345_
*रसुल खडकाळे*
----------------------  - - ----- -- --------
*★सोलापूर शहर माहिती★*
*सोलापूर*
-----------------------------------

उच्चार शहर हे दक्षिण महाराष्ट्रातील एक प्रमुख शहर असून ते पश्चिम महाराष्ट्र या विभागात येते. ते सोलापूर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. सोलापूरला कापड गिरण्यांचे शहर म्हटले जाते.सोलापूर या शहराला प्राचीन काळात सोन्नलागी किंवा सोन्नलापूर म्हणून सुद्धा ओळखले जात असे. विडी उत्पादनात सोलापूरचा महाराष्ट्रात वरचा क्रमांक आहे तर 'सोलापूरी चादरं' प्रसिद्ध आहेत.
...................................
क्षेत्रफळ
• उंची
१४,८८६ चौ. किमी
• ४५७ मी
-----------
जिल्हा
सोलापूर
लोकसंख्या
• घनता
४३,१७,७५६ (2011)
• २९०/किमी२
महापौर
सौ.शोभा बनशेट्टी
http://www.solapurcorporation.gov.in/

कोड
• पिन कोड- • ४१३००१
• दूरध्वनी - • +०२१७
• आरटीओ कोड- • एमएच-१३
.................................
सोलापूराचे प्राचीन म्हणजे १२व्या शतकातील रहिवासी श्री.शिवयोगी सिद्धेश्वर यांनी या परिसरात अडुसष्ट शिवलिंगांची स्थापना केली. आणि ते वीरशैव धर्माच्या (शैव पंथ) माध्यमातून समाज सुधारणांचे काम केले.सोलापूर तलाव बांधून त्यांनी सोलापूराची पाणी समस्या सोडवली. सोलापूर हे भारतातील मुख्य अशा उत्तर-दक्षिण रेल्वे मार्गावर असल्याने त्यास महत्त्व प्राप्त झाले आहे. स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वीच सोलापूर शहराने ९-११ मे १९३० या काळात ३ दिवसांचे स्वातंत्र्य उपभोगले. या घटनेमुळे स्वातंत्र्य संग्रामादरम्यान मलप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन व किसन सारडा यांना जानेवारी १२, १९३१ रोजी ब्रिटिशांनी सोलापूरमध्ये फाशी दिली. तेव्हापासून शहरास हुतात्म्यांचे शहर म्हणून ओळखले जाते.

पंढरपूर हे महाराष्ट्राचे कुलदैवत सोलापूरजवळ असून अक्कलकोटचे प्रसिद्ध स्वामी समर्थ मंदिर सोलापूर जिल्ह्यात आहे. येथील शिवगंगा मातेच्या मंदिराचा कळस शंभर तोळे सोन्यापासून बनलेला आहे, आणि दरवाजा ऐंशी किलो चांदीपासून बनलेला आहे. सोलापूर येथील भुईकोट किल्ला, सिद्धेश्वर मंदिर , मल्लिकार्जुन मंदिर , हुतात्मा बाग, इंद्रभुवन (महानगर पालिका इमारत) , शुभराय आर्ट गॅलरी ही भेट देण्यासारखी ठिकाणे आहेत. हुतात्मा स्मृती मंदिर येथे अनेक कला प्रदर्शन आणि नाट्यप्रयोग मोठ्या प्रमाणात होत असतात.सोलापूरमध्ये दरवर्षी सिद्धेश्वर यात्रा म्हणजेच" गड्डा " हि मोठी यात्रा असते . भारत सरकारच्या स्मार्ट सिटी अंतर्गत सोलापूरचे हि नाव या यादीत समाविष्ट झाल्याने आता सोलापूर हि स्मार्ट शहर बनण्याकडे वाटचाल करताना दिसतो आहे.
---–------------------------------
*इतिहास*
सोलापूरला एक ऐतिहासिक वारसाही लाभलेला आहे. इ.स.पू. २०० वर्षापासून सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, बहामनी, अहमदनगरची निजामशाही, आदिलशाही, मराठे-पेशवे व ब्रिटिश  या सर्व राजवटी सोलापूर जिल्ह्याने अनुभवल्या. यादवांच्या काळात या भागाला सोन्नलगी म्हटले जात होते. मुघल राजवटीत यास संदलपूर असेही म्हटले जात होते. ब्रिटिश काळात सोलापूर हे नाव रूढ झाले असावे असा अंदाज व्यक्त केला जातो. सोलापूरला सोन्नलगिरी, गिरणगाव अशा नावानेही ओळखले जाते. सोलापूरचा इतिहास रोमांचक आहे. मुंबई-चेन्नई रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असल्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रीय पातळीवरील सर्व राजकीय-सामाजिक घडामोडींचे पडसाद सोलापूमध्ये उमटत असत. पहिल्या महायुद्धानंतर भारतात कामगारांनी मोठा संप पुकारला. सोलापूरलाही जानेवारी, १९२० मध्ये कामगारांनी ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या विरोधात संप पुकारला होता.१९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीत सोलापूरकर हिरिरीने सहभागी झाले होते. या सत्याग्रहात दारुबंदीचा प्रचार करण्यासाठी काही तरुण कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. या वेळी शंकर शिवदारे हा तरुण तिरंगा हातात घेऊन पुढे धावला व ब्रिटिशांच्या गोळीबारात बळी पडला. हा शंकर शिवदारे सोलापूरचा पहिला हुतात्मा. या हौतात्म्यामुळे सोलापूरकर पेटून उठले. पण दि. ८,९ मे, १९३० या दोन दिवसांत तत्कालीन कलेक्टर नाईट याने जमावांवर अमानुष गोळीबार केला. अनेक नागरिक गोळीबारात बळी पडले. या आंदोलनादरम्यान दि.९,१०,११ मे, १९३० असे तीन दिवस सोलापूर ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली नव्हते, मुक्त होते. भारतातील (काही काळासाठी) ‘स्वतंत्र’ झालेला असा हा पहिला भाग! मे- जून, १९३० मध्ये सुमारे ४९ दिवस मार्शल लॉ हा कायदा सोलापूरला लागू होता. या काळात सोलापूरच्या ४ निरपराध युवकांना फाशी देण्यात आले. अब्दूल कुर्बान हुसेन, मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकिसन सारडा व जगन्नाथ शिंदे हे सोलापूरचे युवक दि. १२ जानेवारी, १९३१ रोजी धीरोदात्तपणे फासावर चढले. या प्रेरणादायी क्रांतिपर्वामुळेच सोलापूरला हुतात्म्यांचे शहर म्हटले जाते. पुतळ्यांच्या माध्यमातून आज या हुतात्म्यांची स्मृती सोलापुरात जतन करण्यात आली आहे. १९३०-३१ मधील या घटनांचे संदर्भ तत्कालीन ‘केसरी’ मध्ये आढळतात. १२ जानेवारी १९३१ रोजी या लढ्यातील चार वीर फाशी गेले. आजही तो दिवस सोलापूरकर हुतात्मा दिन म्हणून पाळतात. तसेच पूर्वीचे गिरणगाव, हुतात्म्यांचा जिल्हा; सध्याचे ज्वारीचे कोठार, तेलगू, कन्नड व मराठी असा भाषा-त्रिवेणी संगम झालेला बहुभाषिक जिल्हा आणि टॉवेल, चादरी निर्माण करणारा जिल्हा म्हणून सोलापूर प्रसिद्ध आहे. पर्यटन, फलोत्पादन, कृषी प्रक्रिया उद्योग, शिक्षण, आरोग्यसेवा व कापड उद्योग (हातमाग, यंत्रमाग) या क्षेत्रांमध्ये जिल्ह्याचा विकास साधण्याची क्षमता निश्र्चितच आहे.सोलापूर जिल्हा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो .[१] हुतात्मा जगन्नाथ शिंदे हे सोलापूर शहरात दक्षिण कसबा येथे शिंदे चौकात राहत होते.सोलापूर शहराचा स्वतंत्र लढ्यात मोठे योगदान असल्याचे दिसून येते.हुतात्मा शिंदे ज्या वास्तू मध्ये राहत होते ती वास्तू आज मोडकळीस आली आहे.तेथे आज कोणी वास्तव्यास नाही.त्यांना मुल नव्हती.त्याच्या भगिनी ताराबाई ह्या शिक्षिका होत्या.

१९३७ साली स्वतंत्र मजूर पक्षाच्या प्रचारा साठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोलापूरात आले होते.तसेच सोलापूर हे आंबेडकर चळवळीचे केंद्र आहे असे मानले जाते.
---------------------------
*नांव*
"सोलापूर" ह्या नावाचा उगम 'सोला (सोळा)' आणि 'पूर (गावे)' या दोन शब्दापासून झाला आहे. असे मानले जाते की, सध्याचे सोलापूर शहर हे अहमदपूर, आदिलपूर, काळजापूर, खडारपूर, खान्देरवाडी, चपळदेव, जामदारवाडी, फतेहपूर, मुहम्मदपूर, राणापूर, शेखपूर, सन्दलपूर, सोनापूर सोन्नलगी, सोलापूर आणि वैदकवाडी ह्या सोळा गावांपासून बनले आहे.
...............
*भूगोल*
सोलापूर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ १४८४४.६ चौरस किलोमीटर आहे.सोलापुरातील सरासरी पर्जन्यमान ५४५.४ मिलिमीटर (महाराष्ट्रातील सर्वात कमी) आहे. जिल्ह्याची लोकसंख्या ३८,४९,५४३(इ.स. २००१) आहे. भीमा नदी जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. जिल्ह्यात डोंगराळ भाग जवळजवळ नाही.

सोलापूर जिल्ह्याच्या उत्तरेस अहमदनगर व उस्मानाबाद; पूर्वेला उस्मानाबाद, दक्षिणेस सांगली  व विजापूर जिल्हा व (कर्नाटक) तर पश्र्चिमेस सांगली, सातारा व पुणे हे जिल्हे आहेत. जिल्ह्याच्या उत्तर, ईशान्य व पूर्व भागात बालाघाटच्या  डोंगररांगा आहेत. तसेच पश्चिम व नैॠत्य या भागांत महादेवाचे डोंगर आहेत. जिल्ह्याचा इतर भाग सपाट, पठारी आहे. या जिल्ह्याचे हवामान  सर्वसाधारणपणे उष्ण व कोरडे आहे. काही भागांत उन्हाळ्यात कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत जाते.

सोलापूर उच्चार (सहाय्य·माहिती) शहर हे दक्षिणी महाराष्ट्रातील एक प्रमुख शहर असून ते सोलापूर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. सोलापूरला कापड गिरण्यांचे शहर म्हटले जाते. विडी उत्पादनात सोलापूरचा महाराष्ट्रात वरचा क्रमांक आहे तर 'सोलापूर चादरी' प्रसिद्ध आहेत.

जिल्ह्यात वायव्येकडून आग्नेयेकडे वाहणारी भीमा नदी जिल्ह्याचे दोन भाग करते. भीमेची जिल्ह्यातील लांबी सुमारे २९० कि.मी. आहे. भीमा पंढरपूर येथे चंद्रभागा या नावाने ओळखली जाते. नीरा-भीमा संगम माळशिरस तालुक्यात, तर भीमा-सीना संगम दक्षिण सोलापूर तालुक्यात हत्तरसंग-कुडल येथे होतो. जिल्ह्यातून सीना, नीरा, भोगावती, हरणी, बोटी, माण या छोट्या-मोठ्या नद्या वाहतात.

सोलापूर-पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर माढा तालुक्यात उजनी येथे भीमा नदीवर धरण बांधण्यात आलेले आहे. या धरणामुळे सोलापूर शहरासह जिल्ह्याच्या पश्र्चिम व मध्य भागांत पाणीपुरवठा सुलभतेने होतो. १९८० मध्ये बांधून पूर्ण झालेल्या उजनी धरणाच्या जलाशयाला यशवंतसागर असे म्हटले जाते. शेतीसाठी सिंचन, पिण्यासाठी पाणी, उद्योगांना पाणी, साखर कारखान्यांना पाणी, विद्युतनिर्मिती असे अनेक उद्देश साध्य करणारा हा बहुउद्देशीय प्रकल्प आहे. या धरणाच्या परिसरात फ्लेमिंगो (रोहित) पक्षी आढळतात. भीमा-सीना जोडकालव्यामुळे जिल्ह्यातील सात तालुक्यांना लाभ होतो. भीमा-सीना बोगदा हा आशिया खंडातील सर्वांत मोठा(?) बोगदा आहे. उजनी धरणातून या बोगद्याद्वारे सीना नदीत पाणी सोडले जाते. याचबरोबर जिल्ह्यात सहा (६) मध्यम पाणीप्रकल्प आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यात एकरूखे (हिप्परगी) तलाव आहे. याचाही फायदा आसपासच्या भागांतील लोकांना होतो.सोलापूर हा जिल्हा धान्याचे कोठार आहे.

सोलापूरचे भौगोलिक समन्वय अक्षांश: 17 ° 40'17 "उ रेखांश: 75 ° 54'37 "पू समुद्रसपाटीपासूनची उंची: 473 मीटर = 1551 फूट दशांशमध्ये सोलापूरचे समन्वय अक्षांश: 17.671 5200 ° रेखांश: 75.9104400 ° सोलापूरचे डिग्री आणि दशांश मिनिटाचे समन्वय अक्षांश: 17 ° 40.2 912 'उ रेखांश: 75 ° 54.6264 'पू

मुख्य उपनगरे -

माढा
पंढरपूर,
मंगळवेढा बार्शी करमाळा अक्कलकोट सांगोला माळशिरस मोहोळ द.सोलापूर उ.सोलापूर
.............
*अर्थकारण-बाजारपेठ*

सोलापूर शहर हे बाजारपेठेच्या दृष्टीने फार महत्व आहे. कारण सोलापूर शहरात हातमागावर नऊ वारी साडी तयार करण्याची प्रथा आहे. या साडीचा पोत हा इतका सुंदर आहे की प्रत्येक स्त्रीयांना हवाहवासा वाटतो. त्यामुळे सोलापूरची बाजारपेठ आजही प्रसिद्ध असल्याचे दिसून येईल.इथल्या नऊवारी साडीला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. सोलापूर शहर हे कामगारची वस्ती म्हणून ओळखले जाते.याचे मुख्य कारण म्हणजे पूर्वी पासून चालत आलेला हातमाग व्यवसाय आणि आता सुरु असलेला पावर लुमचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू असून आज त्याबरोबरच महिला बिडी उद्योग यामुळे सोलापूरला हि ओळख प्राप्त झाली. सोलापूर जिल्हा हा ज्वारीचे कोठार म्हणून ओळखला जातो.बार्शी तालुक्यासह आजूबाजूच्या खेड्यातून मोठ्या प्रमाणातून ज्वारीची आयात केली जाते. यासाठी मंगळवेढा हा तालुका प्रसिद्ध आहे.

सोलापूरात सोलापूरी चादर हि तितकीच प्रसिद्ध आहे.
........
*लोकजीवन*
सोलापूर शहरात म्हशी पळवण्याची परंपरा अनेक वर्ष पासून सुरु आहे.कसब्यातील वीरशैव गवळी समाजाच्यावतीने दिवाळीमध्ये याचे आयोजन दरवर्षी केले जाते.भास्कर घराण्याच्या म्हशीला यावेळी पहिला मान असतो.म्हशी पळवण्याचा कार्यक्रम सोलापूर पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे.
........................
*संस्कृती-संगीत महोत्सव-रंगभूमी*
सोलापूर मध्ये "हुतात्मा स्मृति मंदिर" हे नाट्य गृह आहे. शहराच्या केंद्र स्थानी असलेल्या या नाट्य गृहात वेगवेगळे नाटकाचे तसेच सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात.हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर महानगर पालिकेच्या मालकीचे आहे.याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज रंगभवन याठिकाणी देखील सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.याचे व्यवस्थापन सोलापूर जिल्हा परिषदेकडे आहे. पूर्वी भागवत चित्रमंदिर येथे नाट्यप्रयोग होत असत.सात रस्ता येथे दमाणी सभागृह होते,सध्या त्याठिकाणी दुचाकी वाहनाचे शोरूम आहे.
.............
*चित्रपट*

सोलापूर हे कर्नाटक व आंध्र प्रदेशच्या सीमेवर असल्यामुळे येथे मराठी बरोबरच तेलगू व कन्नड चित्रपट पण प्रदर्शित होतात. सोलापूर हे बहुभाषिक शहर आहे. 'सैराट' हा २०१६ मध्ये प्रदर्शित झालेला बहुचर्चित चित्रपट ज्याने संपूर्ण महाराष्टाला तसेच संपूर्ण बॉलीवुडला वेड लावले त्याची निर्मिती सोलापुरातच नागराज मंजुळे या दिग्दर्शकाने केलेली आहे. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार हि मिळालेला आहे.
..........
*धर्म-अध्यात्म-भाषा*
सोलापूर शहर हे कर्नाटक व आताचे तेलंगण पूर्वीचे संयुक्त आंध्र प्रदेश च्या सीमेलगत असल्याने येथे विविध धर्माचे व भाषेचे लोक आढळून येतात.

*मुख्य भाषा :* मराठी ,कन्नड ,तेलुगू ,उर्दू .
*इतर भाषा :*हिंदी ,गुजराती ,सिंधी ,पंजाबी ,पारशी .तामिळ ,मल्याळम
*बोली भाषा :*कैकाडी ,पारधी ,गोरमाटी( बंजारा किंवा लमाण ) ,राजस्थानी ,मारवाडी ,वडारी .
--------------------------
सोलापूरात श्री शिवयोगी सिध्दरामेश्वर हे मंदिर प्रसिद्ध आहे.दरवर्षी १२ जानेवारी रोजी मल्लिकार्जुन मंदिरापासून यात्रेस सुरुवात होते.श्री सिध्दरामेश्वराच्या योग दंडाचे प्रतिक म्हणून नंधीध्व्ज उभारले जातात.चार दिवस चालणार्या या यात्रेस महाराष्ट्रसह कर्नाटक,आद्रप्रदेश येथून लोक येतात. यात्रेत सहभागी होणारे भक्त हे पाढरे वस्र्त परीधन केलेले असतात,यास बाराबंदी असे म्हटले जाते.१२ जानेवारीला सिध्दरामेश्वरानी स्थापन केलेल्या ६८ लिगाना तेलाभिशेक केला जातो.१३ जानेवारीला अक्षता सोहळा पार पडला जातो आणि नंतर पुन्हा ६८ लीगाना प्रदक्षिणा घातले जाते.१४ जानेवारी रोजी रात्री होम मैदानवरील होमकट्टा येते होमविधी सोहळा सपन्न केला जातो.१५ जानेवारी रोजी किंक्रांत असून या दिवशी रात्री शोभेच्या दारूकामाची आतषबाजी होते.१६ जानेवारी रोजी रात्री मालीकार्जुन मंदिरात निदीध्वजाच्या वस्त्रावीसर्जनाने (कप्पडकाळी) यात्रेतील धार्मिक कार्यक्रमाची सांगता होते.

सिध्दरामेश्वर हे १२व्या शतकातले एक युग पुरुष होते.एके दिवशी कुंभार कन्येने सिध्दरामेश्वर यांना तिचा मानस सांगीतला कि ती सिध्दरामेश्वर याबरोबर विवाह करू इच्छिते,सिद्धरामेश्वर यांनी तिला सागितले कि मी ब्रम्हचारी आहे , माझे विवाह महादेवाशी झाले आहे.तरीही ती कुंभार कन्या ऐकली नाही ,त्यावर सिद्धरामेश्वर तिला बोले की तू या माझ्या योगदांडा सोबत विवाह कर पण तुला विवाहाच्या दुसऱ्या दिवशी तुझा देह त्याग करावा लागेल.१३ जानेवारीला विवाह झाला आणि १४ जानेवारीला कुंभार कन्याने तिचा देह त्याग केला.

सोलापुर शहरातील विजापूर रस्त्यास लागून कंबर तलाव आहे.या तलावाच्या पाश्चिमेस समोरील बाजूस हे मंदिर आहे.
..........................
*मंदिराची रचना:*
मंदिर प्रशस्त जागेत असून प्राकार मोठे आहेत.याच्या चोहोबाजूस तटबंदी आहे.चारही बाजूस एक एक परवेशद्वार आहे.प्राकारच्या,आत मध्यभागी मंदिर आहे. मंदिराची बांधणी दुमजली सहश्य आहे.
...........
*गर्भगृह*
तळघरातील साधारण चौरस आकार गर्भगृह आहे.या गर्भगृहाला दोन प्रवेशद्वार आहेत.एका दारातून वरील मंडपसदृश्य जागेतून खाली येणाऱ्या गर्भगृहाकडे पायऱ्या आहेत. हे द्वार दक्षिणेकडे आहे. दुसरे द्वार गर्भगृहातून सरळ बाहेर जाते.
--------------
*सभामंडप*
इतर नगरशैली, द्राविडी शैलीतील मंदिराप्रमाणे या मंदिरास गर्भगृहाकडे मंडप अशी रचना आहे. मंडपात दोन देवकोष्टक आहेत .एकामध्ये नंदी आहे.
*शिखर*
मंडपावर एक चौरस छत आहे. जे मंडपाच्या लांबीरुंदीपेक्षा मोठेआहे.या छताला बाहेरून सजावट केली आहे.शिखरावर विविध मूर्ती बसवण्यात आले आहे. त्याच्या एकावर एक असे चार मजले आहेत.प्रत्येक मजल्यावर देवकोष्टक असून या मूर्ती आहेत. विमानावर ४थ्या मजल्यावर नंतर कमळाच्या पाकळ्याप्रमाणे रचना आढळते. साधारणतः आमलकासरखे दिसते, त्यावर पितळी शिखर आहे.
---------------
* *बाह्यबाजू:*

        प्रकाराच्या आत भिंतीला लागून आतील बाजूने चोहोकडील बाजूस ३मी.रुंद.व१.५मी उंचीचे सलग कट्टा आहे.या कट्ट्याच्या रुंदीएवढे छत आहे,यामध्ये कमानी आहेत . पूर्वेस, पश्चिमेस व उत्तरेस ६ तर दक्षिणेस ७ कमानी आहेत. प्रकाराच्या आतील हनुमान ,गणेश,नागदेवता,मूर्ती आहेत.प्राकाराच्या बाहेरून,भिंती(तटबंदीच्या) बाहय बाजूस रुंद अशा स्वरूपाचे चौथऱ्या प्रमाणे सपाट अशी रचना आहे.
[26/02 11:40 PM] *रसुल खडकाळे:*

*कुंभाराचा मान:*
सिद्धरामेश्वर आणि कुंभारकन्येच्या विवाह सोह्ल्यानिमित्त सकाळी मानकरी मल्लिकार्जुन कुंभार  यांच्या कुंभार वाड्यामध्ये गणपती व सिद्धरामेश्वराच्या प्रतिमेचे पूजन करून दिवे घातले जातात. कुंभार समाजाच्यावतीने चालत आलेल्या परंपरेने मातीच्या ५६ घागरी हिरेहब्बुकडे सुपूर्त केले जाते.१२ जानेवारीला तेलाभिषेकासाठी तेलाच्या घागरीचे पूजन मानकरी कुंभार यांच्या हस्ते होऊन ती मानकरी योगिनाथ शिवशेट्टी यांच्याकडे दिली जातात.१३ जानेवारी रोजी कुंभार यांच्या निवास स्थानी पंच्यामृत घागरीचे पूजन आणि मनाच्या पहिल्या नंदिध्वजास खोबरे-लीबाचे हार आणि बाशीग बांधून पूजा केली जाते.१४ जानेवारी रोजी होम कट्ट्यावरील लिंगाची विधिवत पूजा मानकरी कुंभार यांच्या कडून करण्यात येते.
............................
*राष्ट्रीय एकात्मता , सामाजिक समता:*
नंदिध्वज हे सिद्धरामेश्वर यांच्या योगदंडाचे प्रतिक असून यात्रेतील मिरवणुकीमध्ये मानाचे सातही नंदिध्वज सिध्देश्वर देवस्थनच्या मालकीचे असून पहिला नंदिध्वज {अगोदर वडार समाज कडे होत} आता  हिरेहब्बू यांचा कडे मानकरी मान आहे.दुसरा कसब्यातील देशमुख,तिसरा लिंगायत माळी समाजाचा आहे,चौथा व पाचवा नंदिध्वज विश्व ब्राम्हण समाजाचा सहावा व सातवा मातंग समाजाचा अशाप्रकारे मानकरी असून सर्व समाजातील जाती धर्मातील भाविक सहभागी होतात.
...............................
*प्रसारमाध्यमे*
सोलापूर शहरात सर्व प्रसार माध्यमे प्रकाशित होत असून त्यात लोकमत,सकाळ,दिव्य मराठी,संचार,तरुण भारत,पुढारी,जनमत,माणदेश नगरी,पुण्य नगरी अशा प्रकारचे अनेक वृत्तपत्रे प्रकाशित होतात. तसेच पुण्याहून येणारे लोकसत्ता,टाईम्स ऑफ इंडिया,द हिंदू,महाराष्ट्र टाईम्स,मुंबई चौफेर,संध्यानंद, डेक्कन क्रोनिकल इत्यादी वृत्तपत्रांना हि पसंती आहे.
..................................
*शिक्षण*
आज सोलापूर शहर शैक्षणिकदृष्ट्या एक उत्तम केंद्र बनू पाहत आहे. एक जिल्हा-एक विद्यापीठ या योजनेतील विद्यापीठ सोलापूर येथे निर्माण करण्यात आले आहे.सोलापूर विद्यापीठाची  स्थापना ऑगस्ट, २००४ मध्ये झाली. या अंतर्गत आज जिल्ह्यात एकूण ६१ विविध प्रकारची महाविद्यालये आहेत. त्यांपैकी सुमारे ३५ महाविद्यालये सोलापूर शहरात आहेत. शहरात वैद्यकीय, अभियांत्रिकी, कला व शास्त्र, व्यवस्थापन, विधी, समाजसेवा, उद्यानविद्या, स्थापत्यशास्त्र, शिक्षणशास्त्र, व वस्त्रविद्या - अशा सर्व शाखांमधील शिक्षण उपलब्ध आहे. संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून, तसेच मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद या भागांतून आणि कर्नाटकातील बिदर, गुलबर्गा व विजापूर या जिल्ह्यांतून शिक्षणासाठी विद्यार्थी सोलापूरला येत असतात.

                                                     ===हिराचंद नेमचंद वाचनालय ===
               सोलापूर शहरात हिराचंद नेमचंद सार्वजनिक वाचनालय आहे.या वाचनालयाने सोलापूर शहराच्या वैभवात भर टाकली आहे. ]]या वाचनालयाचे सभासद असणे प्रतिष्ठेचे मानले जाते.सुरुवातीला ३० सभासद असलेल्या वाचनालयाचे जवळपास ३००० सभासद आहेत. येथील ग्रंथसंपदा १ लाख १२ हजारांवर गेली आहे.१९४८ पासून येथे बालविभाग सुरु करण्यात आला.वाचन संस्कृतीबरोबरच विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका,सांस्कृतिक कार्यक्रमासाठी किर्लोस्कर सभागृह ,संगीत विभाग,वातानुकुलीत अम्फी थिएटर असा विकास झाला आहे.वाचनालयाच्या प्रगतीमध्ये प्रा.श्रीराम पुजारी यांचा मोलाचा वाटा आहे.
-------------------- ----- -  ---
*खेळ*
दिवंगत क्रिकेटपटू पॉली उम्रीगर यांच्या कारकिर्दीची सुरुवात सोलापुरात झाली पुढे ते राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकले. नुकतीच (२००८ मध्ये) कु. अनघा देशपांडे हिची भारतीय महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे. कु. अनघाने नुकत्याच झालेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. तसेच येथे आजकल एक नाही अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात.
...................................
*प्रसिद्ध व्यक्ती*
◆डॉक्टर नसीमा पठाण [ साहित्य शैक्षणिक क्षेत्र ]

◆डॉ.द्वारकानाथ कोटणीस १९३८ मध्ये चीन ला पाठवलेल्या वैद्यांपैकी एक प्रसिद्ध वैद्य. (दुसरे सिनो - जपानी युद्ध)

◆त्र्यं.वि.सरदेशमुख –साहित्य अकादेमी पुरस्कार प्राप्त लेखक (डांगोरा एका नगरीचा),
◆बी.एस.कुलकर्णी, निसर्ग तज्ञ , पक्षितज्ञ , १९७२ मध्ये माळढोक पक्ष्याचा शोध

■सोलापूरच्या इतिहासात नाव मिळवलेले *चार हुतात्मे* ते खूप महत्वाचे मानले जाते
त्यांची नावे *मलप्पा धनशेट्टी,किसन सारडा, जगन्नाथ शिंदे आणि कुर्बान हुसेन.*

◆आनंद बनसोडे, गिर्यारोहक(एव्हरेस्ट वीर)
◆कवी कुंजविहारी
◆कृ.भि.आंत्रोळीकर
◆भाई छन्नुसिंग चंदेले
◆जब्बार पटेल
◆अतुल कुलकर्णी-सिनेअभिनेता
◆फैय्याज-नाट्य अभिनेत्री
◆बाबूराव जक्कल-पत्रकार
◆रंगाआण्णा वैद्य-पत्रकार
◆अच्युत गोडबोले
◆अरुण टिकेकर
◆य.दि.फडके
◆रा.ना.पवार-कवी
◆दत्ता हलसगीकर-कवी
◆राम जोशी-पेशवेकालीन कवी
◆यु.म.पठाण
◆माधव पवार-कवी
◆प्रभाकर महाराज
◆निर्मलकुमार फडकुुुले
◆शुभराय महाराज
◆प्रा.गजानन भिडेे-इतिहास तज्ज्ञ
◆लक्ष्मीनाराायण बोल्ली् -तेेेलुुुगु मराठी कवी
___________¢_¢_______
*पर्यटन स्थळे*
■भुईकोट किल्ला,सोलापूर शहर
■सिद्धेश्वर मंदिर,सोलापूर शहर
■कंबर तलाव,सोलापूर शहर
■प्रेरणा भुमी,सोलापूर शहर
■संत दामाजी मंदिर,मंगळवेढा
■हत्तरसंग कुडल ,ता.दक्षिण सोलापूर.
■स्वामी समर्थ मंदिर,अक्कलकोट
■श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर,पंढरपूर
■सयाजीराजे पार्क,शिवसृष्टी(अकलूज )
-----–-----------------------------
पंढरपूर– महाराष्ट्रातील आध्यात्मिक श्री विठ्ठल मदिंर येथे आहे. दरवर्षीआषढी आणि कार्तिकी एकादशीला येथे लाखोच्या संख्येने महाराष्ट्राशिवाय शेजारच्या राज्यातून भाविक दर्शनासाठी येतात.
[{तुळजापूर }]- सोलापूर जिल्ह्यातून जाणारा उस्मानाबादला जाणाऱ्या रोडवर तुळजापूर हे गाव आहे. त्या गावात तूळजामातेचे मन्दिर आहे हे मन्दिर महाराष्ट्रातील लाखो लोकांचे आराध्य दैवत आहे. नवरात्रीच्या वेळेस येथे भक्तांची खूप गर्दी असते. येथे दर्शनासाठी महाराष्ट्रातून तसेच कर्नाटक व आंध्र प्रदेशातून भरपूर लोक येतात. हे एक महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानले जाते.

*सोलापुरातील महत्त्वाचे हॉस्पिटल नंबर *

सोलापूर  कोड ( 0217 )

सिव्हील        - 2731900
रेल्वे.            -2 62 70 52
मुळे             272 70 63
अश्विनी         2 31 99  00
यशोधरा.        2323005
विमा कामगार  2600560
सिद्धेश्वर कॅन्सर - 2600088
डफरीन-         2740386
माईन              2625566
वळसंकर         2380169
दीप                2323224
ढेपे स्किन         2313939
पुजार             2623974
नवले स्पीच       2313314
डॉ. कोरे         2725721
डेंटल सोसा. ऑफ इंडिया- 2317693
  गंगामाई हॉस्पिटल - 9765999855
सोलापूर सह. -2627312
यशोधरा-        2323005
प्रधान नेत्र-     2720350
डॉ.कुमठेकर   2300311
डॉ. झांबरे -     2327613
डॉ. खटावकर -942077100
डॉ. पाटणकर.    2724818
डॉ. रघोजी -       2319700
उत्कर्ष हॉ.-       2312312
शोभा नर्सिंग -     2745500
सीएनएस.   -   8806886699
आयुष्य .      -   9221074337
डॉ. सचिन जम्मा -  2732475
मनगोळी -   9822049518

👆 *_वरील माहिती आपणांस आवडल्यास किंवा फायद्याची वाटल्यास शेअर करायला विसरू नका!_*
👌🏼👌🏼📍👌🏼👌🏼📍👌🏼👌🏼
📖📚📖📚📖📚📖📚
*_GK जनरल नॉलेज ग्रुप*_
★+919168390345★
💠_*रसुल खडकाळे*_💠
🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷
*ग्रुप में शामिल होने के लिये आपका *FULL NAME&FULL ADRESS*
📞 *9168390345*
👆🏻☝🏻👆🏻☝🏻👆🏻☝🏻
_*इस नंबर पर भेजें मेरा नंबर भी सेव करें।जब तक मेरा नंबर आपके पास SAVE रहेगा आपको मेसेज मिलते रहेंगे।नंबर delete हुआ तो मेसेज मिलना बंद हो जायेंगे।*_ *याद रहे जो अपने बारे में पुरी जानकारी भेजेगा सिर्फ उसी को ग्रुप में ऍड किया जायेगा*
📖🌷🌹📚🌹🌷🌹🌷📚🌹🌷 —
उत्तर लिहिले · 27/2/2018
कर्म · 569225