6
सरकार म्हणजे Government
शासन म्हणजे Governance
प्रशासन म्हणजे Administration

सरकार - आपण जे आमदार/खासदार निवडून देतो ते सरकार स्थापन करतात. जनतेच्या हितासाठी संविधानाच्या हद्दीत राहून कायदा आणि नियम बनवणे हे सरकारचे काम.
उदा: राज्यात असलेले फडणवीस सरकार, केंद्रात असेलेले मोदी सरकार.

शासन - सरकारने बनवलेले नियम आणि कायदे अमलात आणण्याची प्रक्रिया म्हणजे शासन. 
उदा: डिजिटल इंडिया हा भारत सरकारने Good Governance(शासन) साठी सुरु केलेला उपक्रम आहे.

प्रशासन - प्र म्हणजे समांतर. शासनाच्या समांतर एक व्यवस्था असते, जी सरकारच्या स्कीम्स/योजना/कायदे जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम करते. या व्यवस्थेला प्रशासन म्हणतात.
उदा: जिल्ह्याचा कलेक्टर हा प्रशासनाचा घटक असतो. सरकारच्या योजनांचा अंमल तो त्याच्या जिल्ह्यात करतो.
उत्तर लिहिले · 4/6/2017
कर्म · 283280