9
🌎 *!! मोबाईल वर मराठी टायपिंग कसे करायचे? !!*  🌎

*मोबाईल वर मराठी टाइपिंग:*
अँड्रॉइड फोन वर मराठी टाइपिंग करण्यासाठी *Google Indic Keyboad* हे अधिकृत अँप गुगल ने डेव्हलप केलेले आहे.
▪१. या लिंक वर क्लीक करून ते अँप इन्स्टॉल करा:  https://goo.gl/7MxTyH
▪२. इन्स्टॉल केलेले अँप ओपन करा
▪३. त्यात तुम्हाला हे अँप कीबोर्ड म्हणून सेट करायचा ऑप्शन येईल. तो ऑप्शन सेट करा
▪४. नंतर जेव्हा तुम्ही टाईप करण्यासाठी कीबोर्ड वरती येईल तेव्हा कीबोर्ड मध्ये "ळ" किंवा दुसऱ्या देवनागरी अक्षराची टॅब दिसेल.
▪५. यातून मराठी भाषा सिलेक्ट करा.
▪६. आता तुम्ही "Namaste" टाईप केले कि ते "नमस्ते" असे टाईप झालेले असेल.


गुगल इंडिक कीबोर्ड
उत्तर लिहिले · 21/9/2018
कर्म · 569245