11
 अडखळत बोलणे 
_______________________ 

ळ शब्दाचा सराव करणे.

* वेखंड व अक्कलकाढा चूर्ण दिवसातून तीन वेळा मधातून देणे. 

* पाच काळीमिरी रोज चावून खाणे. 

* पाच बदाम रोज लोण्याबरोबर खाणे. 

* पिंपळाची पिकलेली चार ताजी फळे अथवा या फळांचे एक चमचा चूर्ण किंवा पिंपळाच्या सालीचे चूर्ण, मधाबरोबर सलग सहा महिने घेतल्यास वाणी स्पष्ट होते व तोतरेपणा, बोबडेपणा जातो. 

* दोन चमचे अख्खे धणे रात्री काचेच्या ग्लासमध्‍ये पाण्यात भिजवून ठेवावे, सकाळी ते पाणी धण्यासह अर्धे होईल इतपत उकळावे, कोमट झाल्यावर गाळून या पाण्याने गुळण्या(Gargles) कराव्या. 

* अंगठा व तर्जनी यांना मध लावावे. जीभ बाहेर काढून अंगठा जिभेखाली व तर्जनी जिभेवर ठेवून जिभेला आतून बाहेर अशी आठ-दहा वेळा मधाने मालीश (मसाज) करावी, या वेळेस मनात ‘ॐ’ चा उच्चार करावा. 

* वेखंडाचा (Sweet flag root) एक ग्रॅम तुकडा दिवसातून दोनदा एक महिना चोखल्याने हा विकार दूर होतो. 

* पाच बदाम रात्री पाण्यात भिजवुन ठेवावे, सकाळी त्याची साले काढुन पांढर्‍या लोण्याबरोबर किंवा गायीच्या तुपाबरोबर चावुन खावीत. 

* एक चमचा ब्राम्ही चूर्ण, मधातून किंवा दुधातून, दोनवेळा घ्यावे.
उत्तर लिहिले · 3/8/2018
कर्म · 458580