11
स्वच्छता ही प्रथम महत्त्वाची आहे. - (रोज आंघोळ करणे, नखे कापणे.एकमेकांचे कपडे वापरु नये.भरपूर पाणी प्यावे...)

गजकर्ण, नायटयाचा भाग गरम पाणी व साबणाने स्वच्छ धुऊन नायटा मलम (व्हिटफिल्ड) रोज चोळून लावावे. व्हिटफिल्ड मलमाने सुरुवातीला आग होते, पण दोन-तीन आठवडयांत आराम पडतो व चट्टा जातो. नंतर आठवडाभर तरी मलम लावत राहावे. नाही तर नायटा परत उमटतो. व्हिटफिल्ड मलमापेक्षा मायकोल मलम जास्त चांगले आहे. याचा परिणाम लवकर (10 दिवसांत) होतो.

आयुर्वेद

गजकर्णासाठी उपाय करताना त्वचा कोरडी राहील अशी काळजी घेणे आवश्यक आहे. (अ) गजकर्णाच्या भागावर करंजतेलाचा बोळा घासावा.(ब) या बाह्य उपचाराबरोबर कोठा स्वच्छ राहण्यासाठी त्रिफळा चूर्ण (चमचाभर) कोमट पाण्याबरोबर रोज रात्री याप्रमाणे 10 दिवस घ्यावे.

अधिक त्रास होत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.
उत्तर लिहिले · 26/10/2017
कर्म · 458580