8
Answer link
आपली उंची वाढण्यामागे सर्वात मोठे योगदान ह्युमन ग्रोथ हार्मोन(HGH) म्हणजे 'एचजीएच' संप्रेरक चे असते. एचजीएच संप्रेरक पिट्युटरी ग्रंथीमधून निघते. पिट्युटरी ग्रंथी मेंदुजवळ असते.
HGH हे संप्रेरक सर्व अवयवांच्या वाढीसाठी मदत करते. यामध्ये शरीराचे विविध अवयव जसे कि हृदय, यकृत(Liver) ई, शरीराचे स्नायू तसेच हाडे या गोष्टी येतात. उंची वाढण्यासाठी हाडांची वाढ कारणीभूत ठरते.

कुमारावस्थेत येईपर्यंत शरीराची वाढ करणे आणि मुख्यतः उंची वाढवणे याचे काम HGH हे संप्रेरक(Harmon) करते.
जेव्हा कुमारावस्था संपत येते तेव्हा हेच संप्रेरक शरीराची वाढ आटोक्यात ठेवण्याचे काम करते. म्हणून काही ठराविक वयानंतर उंची वाढणे बंद होते.
काही लोकांमध्ये या हार्मोनचा अतिरेक झाल्याने त्यांच्या शरीराची खूप अनैसर्गिक वाढ झाल्याचे देखील बरेच उदाहरणे आहेत. तसेच हा हार्मोन कमी प्रमाणात निर्माण झाल्याने वाढ न होणारे लोक पण आपणाला दिसतात.