10
हॉटेल व्यायवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला "फूड लायसन्स" ची आवश्यकता लागेल.

ज्‍या ज्‍या ठिकाणी खाण्‍याचे पदार्थ विकले जातात किंवा ठेवले जातात त्‍या सर्वांना हया लायसन्‍सची आवश्‍यकता असते. उदा. हॉटेल, बेकरी व इतर सर्व व्‍यावसायीक. 
फूड व्यवसाय हा चांगला उत्पन्न देणारा व्यवसाय आहे. ग्रामीण व शहरी भागातील तरुणांना स्वयंरोजगार उपलब्धतेच्या दृष्टीने हॉटेल व्यवसायाचा वाटा मोठा आहे. हॉटेल किंवा खाद्यगृह सुरु करणे सोपे असते.परंतु त्याची प्रत्यक्ष रीतसर कायद्याने नोंदणी करणेही महत्वाचे व बंधनकारक आहे. 

त्यासाठी पुढील कागदपत्रांची पूर्तता करून आपला व्यवसाय अधिकृत करता येईल:
१. दोन फोटो
२. आधार कार्ड  / पॅनकार्ड
३. लाइर्ट बिल

महा ई सेवा केंद्रात ही सेवा ऑनलाईन उपलब्‍ध आहे.

खाद्यपदार्थ विक्रेत्यांना आता Food Safety and Standard Authority of India (FSSAI) यांचे व्यवसाय मान्यता प्रमाणपत्र सक्तीचे केले असून हे प्रमाणपत्र तुमच्या जवळील महा ई सेवा केंद्रामध्ये उपलब्ध करण्यात आले आहे.
नागरिकांकडून जे पदार्थ खाण्यासाठी वापरले जातात त्या प्रत्येक पदार्थांची विक्री करण्यापूर्वी त्यांची विक्री करण्याची परवानगी केंद्र सरकारने सक्तीची केलेली आहे, अशा परवानगी शिवाय कोणतेही खाद्यपदार्थ विकणे,साठविणे,उत्पादन करणे बेकायदेशीर असून अशी बेकायदेशीर कृती करणारांवर गुन्हेही दाखल होऊ शकतात.यासाठी भारतीय खाद्य सुरक्षा एवं मानक प्राधिकरण (FSSAI) हे खाद्यपदार्थ विक्रीचा परवाना देवू करतात.हा परवाना मिळण्यासाठी पूर्वीच्या काळी खूप अडचणी येत असत.मात्र केंद्र सरकारने हे सर्व परवाने ऑनलाईन उपलब्ध केले असून सदर परवाने जवळच्या महा ई सेवा केंद्रामध्ये उपलब्ध करण्यात आलेले आहेत.हा परवाना १ ते ५ वर्षांसाठी मिळू शकतो. नंतर परत रिन्यू करून घेऊ शकता.

तुमच्या जवळील महा ई सेवा केंद्र तुम्ही खालील लिंक वर क्लीक करून शोधू शकता. नंतर तेथे जाऊन तुम्ही वरील कागदपत्रे देऊन अर्ज करू शकता. अर्जाची छाननी झाल्यावर तुम्हाला परवाना मिळून जाईल.
 https://www.mahaonline.gov.in/molweb/PublicApp/Utility/ViewSevaKendra.aspx
उत्तर लिहिले · 27/1/2017
कर्म · 283320