15
IBPS(Institute of Banking Personnel Selection) हि एक स्वायत्त संस्था आहे जी वेगवेगळ्या बँकांसाठी पदे भरण्यासाठी परीक्षा घेते. २०११ या वर्षांपासून हि संस्था पब्लिक सेक्टर बँका तसेच रिजनल रूरल बँकांसाठी क्लार्क तसेच प्रोबेशनरी ऑफिसर या पदांसाठी कॉमन रिटन एक्झाम (CWE) घेते. या पदांसाठी इच्छुक असणाऱ्यांना ऑनलाईन अर्ज भरून परीक्षेस बसता येते. 

या परीक्षेची काठिण्य पातळी जास्त असते आणि सिलेक्शन रेट २०० उमेदवारामध्ये १ असा आहे. पण योग्य दिशेने तयारी केल्यास हि परीक्षा पास होण्यास अवघडही नाही. 

परीक्षेसाठी पात्रता:

२०१७ परीक्षेसाठी पात्रता:
- कोणत्याही सरकारमान्य युनिव्हर्सिटी मधून बॅचलर पदवी आवश्यक 
- भारतीय नागरिकत्व असावे
- वयोमर्यादा : २० ते ३० वर्षे

परीक्षा पॅटर्न :

हि परीक्षा इंग्लिश तसेच हिंदी मध्ये देता येते. खाली दिल्याप्रमाणे परीक्षा घेतली जाते:



यासाठी परीक्षेची तारीख, फॉर्म भरण्याची मुदत, इत्यादी बघण्यासाठी http://www.ibps.in/ हि वेबसाईट तुम्ही बघू शकता.

खालील बँकांमध्ये IBPS द्वारे भरती केली जाते:

Allahabad Bank
Andhra Bank
Bank of Baroda
Bank of India
Bank of Maharashtra
Canara Bank
Central Bank of India
Dena Bank
IDBI Bank
Indian Bank
Indian Overseas Bank
Oriental Bank of Commerce
Punjab National Bank
Punjab and Sind Bank
State Bank of India
State Bank of Bikaner and Jaipur
State Bank of Hyderabad
State Bank of Mysore
State Bank of Patiala
State Bank of Travancore
Syndicate Bank
UCO Bank
Union Bank of India
United Bank of India
Vijaya Bank
उत्तर लिहिले · 27/1/2017
कर्म · 48240