16
Answer link
Steno म्हणजे Stenographer. स्टेनोग्राफर हा असा पेशा आहे ज्यात शब्दांचे सांकेतिक भाषेत भाषांतर केले जाते. आणि हीच सांकेतिक भाषा परत मूळ स्वरूपात बदलली देखील जाते. बऱ्याचदा हे भाषांतर २०० शब्द प्रति मिनिट इतक्या जास्त वेगाने देखील करावे लागते.
याला महत्व आहे का ?
आजमितीला तरी कुठलेही तंत्रज्ञान इतके विकसित झालेले नाही कि भाषांतर एखादे मशीन करू शकेल. त्यामुळे स्टेनोग्राफर व्यक्तीला कायम मागणी राहते.
कुठे नोकरी मिळू शकते ?
१. कोर्ट
२. प्रेस मिटींग्स
३. सरकारी कार्यालये
४. एखाद्या कंपनीच्या CEO चा सेक्रेटरी किंवा असिस्टंट
स्टेनोग्राफरचे कौशल्य जर चांगले असेल तर बऱ्याचदा महत्वाच्या निर्णय प्रक्रियेतदेखील त्यांचा सहभाग करून घेतात आणि बऱ्यापैकी कमाई यातून तुम्ही करू शकता.
स्टेनोग्राफर होण्यासाठी काय करावे हे खालील लिंक वर तुम्ही पाहू शकता: