6
Answer link
नदी, तलाव यांचे पाणी खारट लागत नाही. परंतु नदी समुद्राला मिळाल्यानंतर पाणी खारट बनते आणि समुद्राचे पाणी मूलतः खारट असते. याला वैज्ञानिक कारण आहे.

जे पाणी आपण पिण्यासाठी वापरतो त्या पाण्यात काही प्रमाणात क्षार असतात. परंतु त्यांचे प्रमाण कमी असते. म्हणून त्यांची चव आपल्या जिभेला जाणवत नाही. म्हणून हे पाणी आपल्याला खारट लागत नाही.
नदीला मिळणारे पाणी हे पावसापासून मिळालेले पाणी असते आणि हे पाणी पाऊस पडल्यानंतर जमिनीतून, खडकांतून वाहते. असे होत असताना मातीतील, खडकांतील काही खनिजे, क्षार या पाण्यात मिसळतात आणि विरघळतात. हेच पाणी पुढे जाऊन समुद्राला मिळते. जेव्हा पृथ्वी निर्माण झाली तेव्हा अश्या नद्यांचे पाणी समुद्राला जाऊन मिळत राहिले. समुद्राच्या पाण्याचे बाष्पीभवन होते. भाष्पीभवन होताना फक्त पाण्याचीच वाफ होते परंतु त्या पाण्यात मिसळलेले क्षार आणि इतर खनिजे मात्र समुद्राच्या पाण्यात कायम राहतात. त्यांचे बाष्पीभवन होत नाही. हजारो वर्षे हि प्रक्रिया चालू राहिल्यामुळे या पाण्यात क्षाराचे प्रमाण वाढत राहिले आणि यामुळे समुद्राचे पाणी खारट बनले.

समुद्राच्या पाण्यातील क्षारांच्या प्रमाणानुसार खारटपणा कमी जास्त असतो. जगात मृत समुद्रात सर्वात जास्त क्षारांचे प्रमाण आहे. म्हणून या समुद्राचे पाणी सर्वात खारट आहे. क्षाराचे प्रमाण जास्त असल्यामुळे या पाण्याची घनता इतकी जास्त आहे कि या पाण्यावर माणूस तरंगू शकतो.