15
Answer link
चलन बदलून घेण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. चलन फक्त रिझर्व बँकेने ऑथेराईझ केलेल्या डीलर कडूनच बदलून मिळू शकते. सगळ्याच नॅशनलाईझ बँका ऑथोराइज्ड डीलर आहेत. तसेच काही प्रायव्हेट डीलर देखील आहेत जसे कि Thomas Cook किंवा अनेक टूर अँड ट्रॅव्हल्स चे ऑफिस देखील ऑथोराइज्ड डीलर आहेत.

तुमच्या परदेशी दौऱ्याच्या कारणाप्रमाणे(पर्यटन, बिझनेस, एज्युकेशन, इ. ) पैसे बदलून देण्याच्या अटी बदलतात.
तुम्ही फक्त फिरायला जाणार असाल तर खालील प्रक्रिया चालते:
प्रक्रिया:
१. वरीलपैकी कुठल्याही डीलर कडे जा
२. डीलर तुम्हाला तुमच्या परदेशी दौऱ्याचे व इतर पुरावे मागू शकतात - जसे कि विमानाचे तिकीट, विजा, पॅन कार्ड इ.
३. ५० हजारापर्यंत रु. पर्यंत तुम्ही कॅश देऊ शकता.
४. त्यापेक्षा जास्त रक्कम असेल तर तुम्हाला चेक किंवा डिमांड ड्रॅफ़्ट द्यावा लागेल.
५. दिलेल्या रकमेच्या बरोबरीने परदेशी चलन तुम्हाला बँक देईल.

६. फिरायला जाण्यासाठी तुम्हाला एका वर्षात जास्तीत जास्त १०,००० USD डॉलर्स इतकेच पैसे मिळू शकतात.